Maharashtra Breaking News : शिवाजी महाराज पुतळा प्रकरण, 'वर्षा'वर तातडीची बैठक सुरु
Maharashtra Live News : महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, विधानसभेसंदर्भातील सर्व अपडेट्स तसंच हवामानाचा अंदाज 'मुंबई Tak'च्या या लाइव्ह ब्लॉगमध्ये जाणून घ्या सर्व फक्त एका क्लिकवर...
ADVERTISEMENT
Maharashtra breaking news in marathi : सिंधुदुर्गातील मालवणमध्ये 8 महिन्यांपूर्वी उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. या दुर्घटनेनंतर शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 4 डिसेंबर 2023 रोजी नौदल दिनाच्या निमित्ताने या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलं होतं. सध्या या मुद्द्यावरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विजय वडेट्टीवार, शरद पवार गटाचे अध्यक्ष जयंत पाटील, माजी खासदार विनायक राऊत आज राजकोट किल्ल्यावर जाणार आहेत. यावेळी ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी करणार आहेत.
ADVERTISEMENT
तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकासाआघाडीची आज तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. यावेळी जागावाटपाबद्दल निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशाच महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, विधानसभेसंदर्भातील सर्व अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर...
ADVERTISEMENT
- 09:40 PM • 28 Aug 2024
Shivaji Maharaj : शिवाजी महाराज पुतळा प्रकरण, 'वर्षा'वर तातडीची बैठक सुरु
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा बंगल्यावर तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण तसेच राज्याच्या मुख्य सचिव आणि नौदलाचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित रहाणार आहेत. शिवरायांचा पुतळा कोसळण्यामागे मुख्य कारणे कोणती आहेत? तसेच मालवण मधील कायदा सूव्यवस्था यांसदर्भातही बैठकीत चर्चा होणार आहे.
- 02:14 PM • 28 Aug 2024
Maharashtra News : वाऱ्याने शिवरायांचा पुतळा पडला हे कारण निर्लज्जपणाचा कळस- उद्धव ठाकरे
'वाऱ्याने पुतळा पडला हे कारण सांगणं निर्लज्जपणाचा कळस गाठणारं आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला होता. पण, कोश्यारींची टोपी वाऱ्याने उडाली असं कळसं नाही,' असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.
- 01:58 PM • 28 Aug 2024
Maharashtra News : उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची पत्रकार परिषद
“हे महाफुटीचं सरकार आहे. त्यांच्या भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे. कारभाराने किळस आणली आहे. आम्ही तीन दिवसांपूर्वी महाराष्ट्र बंद केला होता. पण कोर्टाच्या माध्यमातून त्यावर बंदी घातली होती. मालवणमध्ये पुतळा कोसळला. त्या घटनेचा निषेध करण्यासाठी मोर्चा करण्यता आला. त्या मोर्चात मोदी आणि शहांचे दलाल आणि शिवद्रोही आले,” अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी टीका केली.
- 01:02 PM • 28 Aug 2024
Live : मालवणच्या राजकोट किल्यावर तुफान राडा! मविआ-भाजपचे कार्यकर्ते भिडले
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने आज महाविकास आघाडीकडून मालवण बंदची हाक देण्यात आलीय. मालवणमध्ये मविआ आणि भाजपाचे कार्यकर्ते आमने-सामने आहेत. मालवणमध्ये मविआकडून निषेध मोर्चा. आदित्य ठाकरेंसमोर दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला.
- 11:49 AM • 28 Aug 2024
Maharashtra News : मातोश्रीवर उद्धव ठाकरे,शरद पवार,पटोलेंची तातडीची बैठक!
मविआमध्ये मुंबईतल्या जागांवरुन अद्याप चर्चा पुढे सरकलेली नाही. अशातच मातोश्रीवर एका तातडीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले यांच्यामध्ये ही बैठक होणार आहे. राज्यातील कायदा-सुव्यवस्था, लाडकी बहिण योजना, मालवणमधील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. या चर्चेला विधानसभेच्या जागावाटपाची किनार असण्याची शक्यता आहे.
मुंबईतल्या जागांचं वाटप झाल्यानंतर मग महाराष्ट्रातल्या जागांचं वाटप मविआ करणार अशी माहिती समोर येते. ठाकरे गटाकडून 20 ते 22 जागांची मागणी करण्यात आल्याचं तर काँग्रेस 15 ते 17 जागांवर अडून बसल्याची माहिती आहे. मुंबईच्या जागांवरच बोलणी अडकल्याने मविआच्या आणखी काही बैठका होण्याची शक्यता आहे.
- 10:19 AM • 28 Aug 2024
Maharashtra News : 'सुपारी घेणाऱ्यांनी माझ्या पराभवासाठी कट रचला', नवनीत राणांचा कोणावर आरोप?
बच्चू कडू यांनी सुपारी घेऊन माझा पराभव करण्याचा कट रचल्याचा आरोप भाजप नेते आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी केला आहे. कडू यांनी 20 वर्षात अचलपूर मतदारसंघात रोजगाराच्या बाबतीत काय केले, असा सवाल राणा यांनी केला. सुपारी घेणारे अधिकारी अचलपूर मतदारसंघाबाहेर असतील का, असा सवालही त्यांनी केला.
काही लोकांनी त्यांना सुपारी देऊन अमरावतीला १० वर्षे मागे ढकलले, असे राणा यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. या लोकांना ढोंगी आणि नाटकी ठरवून आता त्यांना जबाबदार धरले जाईल, असे त्यांनी सांगितले. माफीचा प्रश्नच येत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. दहीहंडीच्या कार्यक्रमादरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले, ज्यामध्ये भाजप नेते टी राजा देखील उपस्थित होते.
त्यांच्या पराभवाचा फायदा घेऊन काही लोक त्यांच्या प्रयत्नांना हरताळ फासण्याचा प्रयत्न करत असल्याचे राणा म्हणाल्या. ज्यांनी ठेका घेतला त्यांनी जिल्ह्याचा विकास खुंटला आहे, असा आरोप त्यांनी केला. जिल्ह्यात मेडिकल कॉलेज आणि टेक्सटाईल पार्क आणण्याचे काम केले असून शेवटच्या श्वासापर्यंत जिल्ह्याच्या विकासासाठी आपण कार्यरत राहणार असल्याचेही राणा म्हणाल्या.
- 10:13 AM • 28 Aug 2024
Maharashtra News : महाविकास आघाडीचा जनआक्रोश मोर्चा
सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कोसळल्या प्रकरणी महाविकास आघाडीचा आज जनआक्रोश मोर्चा आहे. भरड नाका इथल्या दत्त मंदिरापासून मोर्चा निघणार आहे. मालवण शहरातील पिंपळ स्टॉपजवळ या मोर्चाची मध्यवर्ती सभा होणार आहे. याच ठिकाणी महाविकास आघाडीच्या नेत्यांची भाषणे होतील.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT