लाइव्ह

Maharashtra Breaking News : 'बाळासाहेब हयात असते तर उध्दव ठाकरेला लाथ मारून...', नितेश राणेंची जहरी टीका!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Maharashtra breaking news in marathi : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. सध्या महायुती आणि महाविकासआघाडी या दोघांकडून जागावाटपाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. घटक पक्षांना किती जागा द्यायच्या? कोणत्या जागेवर कोणता उमेदवार योग्य? याचीही चाचपणी सध्या सुरु आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची भर चौकात हत्या करण्यात आली.

ADVERTISEMENT

‘औरंग्याच्या पिलावळीने दुसऱ्यांना शिवद्रोही बोलू नये. उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असताना पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या गेल्या. उध्दव ठाकरे पाकिस्तानी एजंट आहेत,’ असा आरोप त्यांनी केला. एवढंच नव्हे तर ‘ बाळासाहेब ठाकरे कडवट हिंदू होते. उध्दव ठाकरे बाळासाहेबांचे रक्त असूच शकत नाही. बाळासाहेब हयात असते तर उध्दव ठाकरेला लाथ मारून मातोश्री बाहेर काढले असते’ अशा शब्दांत नितेश राणे यांनी उध्दव ठाकरेंवर जहरी टीका केली.

अशाच महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, विधानसभेसंदर्भातील सर्व अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर...

ADVERTISEMENT

  • 02:27 PM • 02 Sep 2024

    Maharashtra News : वनराज आंदेकर यांच्या हत्येनंतर खासदार मुरलधीर मोहोळ यांची पोलिसांशी चर्चा

    पुण्यात वनराज वांदेकर यांची झालेल्या हत्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री मुरळीधर मोहोळ यांनी पुणे आयुक्तांशी चर्चा केली. गुन्हेगारांना अटक करुन त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, अशा सूचना त्यांनी दिल्या. पुणे शहराचा कायदा सुव्यवस्थेबाबत तडजोड होणार नाही, असे त्यांनी म्हटले.

     

  • 02:23 PM • 02 Sep 2024

    Maharashtra News : आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून पुन्हा एकदा समिती स्थापन

    समिती शेतकऱ्यांसोबत चर्चा करणार. पंजाब हरियाणा शंभू सीमा पुन्हा खुली करण्याचे प्रकरण. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांविरोधात राज्य सरकारने बंद केली होती सीमा. त्याविरोधात पंजाब हरियाणा उच्च न्यायालयाने सीमा खुली करण्याचे आदेश दिले होते

  • 01:25 PM • 02 Sep 2024

    Maharashtra News : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज कोल्हापूर दौऱ्यावर

    राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. त्या अंबाबाई देवीचे दर्शन घेणार आहेत. रक्षेच्या कारणास्तव सकाळी दहा वाजल्यापासून मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. मंदिर परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. राष्ट्रपतींसाठी मंदिरात रेड कार्पेट अंथरण्यात आले आहे.

     

  • 08:53 AM • 02 Sep 2024

    Maharashtra News : यवतमाळमध्ये मुसळधार पाऊस, पिकांना फटका

    यवतमाळ जिल्ह्यात काल झालेल्या मुसळधार पावसात

    अंदाजे 4 हजाराहून अधिक हेक्टरवर नुकसान

    सर्वाधिक नुकसान घाटंजी तालुक्यात

    त्या पाठोपाठ बाभुलगाव, पुसद, राळेगाव जिल्ह्यातही नुकसान

    कापूस, सोयाबीन, तूर पिकाला सर्वाधिक फटका

     

follow whatsapp

ADVERTISEMENT