लाइव्ह

Maharashtra Breaking News : मालवणमधील पुतळा दुर्घटनेवर मुख्यमंत्री शिंदेंचा माफीनामा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Maharashtra breaking news in marathi : मालवण तालुक्यातील राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्यामागची कारणे शोधणे व एकूणच या दुर्दैवी घटनेसंदर्भात विस्तृत कारणमीमांसा करण्यासाठी स्थापत्य अभियंते , तज्ञ, आयआयटी तसेच नौदलाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेली एक तांत्रिक संयुक्त समिती नेमण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. ही समिती जबाबदारी निश्चित करेल. छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांच्या कर्तुत्वाला साजेसा भव्य आणि अत्युत्कृष्ट पुतळा उभारण्याच्या दृष्टीने देशातील उत्तम शिल्पकार, स्थापत्य अभियंते, तज्ञ, नौदलाचे अधिकारी यांची एक समितीही नेमण्याचे निर्देश त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले.     

ADVERTISEMENT

बदलापूरमधील शाळेतील चिमुकल्या मुलींवर अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे याला दुसऱ्या गुन्ह्यात अटक होण्याची शक्यता आहे. एसआयटीने दोन पीडित मुलींचा जबाब नोंदवून दोन वेगवेगळे गुन्हे बनवले.कोर्टाकडून प्रोडक्शन वॉरंट मिळाल्यानंतर अटक केली जाण्याची शक्यता.

अशाच महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, विधानसभेसंदर्भातील सर्व अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर...

ADVERTISEMENT

  • 05:13 PM • 29 Aug 2024

    मालवणमधील पुतळा दुर्घटनेवर मुख्यमंत्री शिंदेंचा माफीनामा

    छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्या चरणांवर शंभरवेळा मी डोकं ठेवायला तयार आहे. 100 वेळा मला माफी मागायला मला कमी पणा वाटत नाही. तसेच त्यांचे आदर्श घेऊनच आम्ही राज्याचा कारभार करतो, असे विधान करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मालवणमधील पुतळा दुर्घटनेवर माफी मागितली आहे. 
     

  • 04:10 PM • 29 Aug 2024

    मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

    मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी 29 सप्टेंबरपासून पुन्हा एकदा आमरण उपोषण करणार असल्याची घोषणा केली आहे. सरकारने 28 सप्टेंबरपर्यंत आरक्षण दिले नाही तर मी 29 सप्टेंबरपासून उपोषणाला बसेन, ही आरपारची लढाई असेल,असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी सरकारला दिला आहे. 

  • 03:55 PM • 29 Aug 2024

    Maharashtra News : फडणवीस यांचा काटा काढणार- मनोज जरांगे

    भाजप नेते देवेंद्र फडवणीस हे डेंजर व्यक्ती आहे. त्यांना हलक्यात घेऊ नका. ते मोठ्या जाती संपवायला निघाला आहेत. त्यामुळे आता सर्व लोक त्यांचा काटा काढणार आहेत, असे मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.

     

  • 12:30 PM • 29 Aug 2024

    Maharashtra News : शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या दुर्घटनेनंतर ठाकरे गट आक्रमक, पुण्यात आंदोलन

    मालवण पुतळा दुर्घटनेनंतर ठाकरे गट आक्रमक झाला आहे. “राणेंनी त्यांचे संस्कार, इतिहास दाखवला. राणेंनी पोलिसांनाही दमदाटी केली. त्यांच्याकडून गुंडगिरीची भाषा वापरली गेली”, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.

     

  • ADVERTISEMENT

  • 08:37 AM • 29 Aug 2024

    Akshay Shinde : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण, आरोपीविरोधात दुसरा गुन्हा दाखल

    बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेविरोधात दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला दुसऱ्या गुन्ह्यात अटक होण्याची शक्यता. कोर्टाकडून प्रोडक्शन वॉरंट मिळाल्यानंतर अटक केली जाण्याची शक्यता. एसआयटीने दोन पीडित मुलींचा जबाब नोंदवून दोन वेगवेगळे गुन्हे बनवले.  हायकोर्टाने सूचना दिल्यानंतर दुसऱ्या पीडितेचा जबाब नोंदवून पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

     

  • 07:53 AM • 29 Aug 2024

    kalyaninagar news : कल्याणीनगर अपघात प्रकरणी मोठी अपडेट

    Pune News : कल्याणीनगर अपघात प्रकरणी मोठी अपडेट समोर आलेली आहे. अल्पवयीन आरोपीच्या कुटुंबीयांनी केली पासपोर्ट परत करण्याची मागणी करण्यात आली आहे. याआधी पोर्शे कार परत करा अशी मागणी अग्रवाल कुटुंबाने बाल न्याय मंडळाला केली होती. आता पासपोर्टसाठी अगरवाल कुटुंबीयांनी बाल न्याय मंडळाकडे अर्ज केला आहे. काल यावर सुनावणी होणे अपेक्षित होत मात्र ती पुढे ढकलण्यात आली आहे. बाल न्याय मंडळाच्या या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागलेय.

  • ADVERTISEMENT

  • 07:49 AM • 29 Aug 2024

    UPSC मध्ये होणारी फसवणूक रोखण्यासाठी केंद्र सरकारचा महत्वाचा निर्णय!

    UPSC उमेदवारांची आता आधारशी पडताळणी केली जाणार आहे.

    फसवणूक रोखण्यासाठी केंद्र सरकारचं महत्वाचं पाऊल उचलले आहे.

    केंद्र सरकारने केंद्रीय लोकसेवा आयोगाला (UPSC) नोंदणी, परीक्षा आणि भरतीच्या विविध टप्प्यांच्या वेळी ऐच्छिक आधारावर उमेदवारांची ओळख पडताळण्यासाठी आधार प्रमाणीकरण वापरण्याची परवानगी दिली आहे.

    पूजा खेडकरची फसवणूक प्रकरण समोर आल्यानंतर सरकारकडून महत्वाचं पाऊल उचलल्याच बोललं जात आहे.

    यामुळे फसवणूक रोखण्यास मदत होईल असा सरकारला विश्वास

     

follow whatsapp

ADVERTISEMENT