लाइव्ह

Maharashtra Breaking News : बदलापूर लैंगिक अत्याचार; आरोपी अक्षय शिंदेने गोळी झाडून घेतली

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Maharashtra breaking news in marathi : विधानसभा निवडणुकीपूर्वी आता महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यामुळे सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे महायुतीत जागावाटप आणि मुख्यमंत्रिपदावरुन राजकारण सुरु झाले आहे.

ADVERTISEMENT

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरु केले आहे. जालन्यातील अंतरवली सराटी या त्यांच्या मूळगावी त्यांचं उपोषण सुरु आहे. मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली आहे. तर दुसरीकडे आदिवासी समाजही आरक्षणासाठी मैदानात उतरणार असल्याचे बोललं जात आहे.

हवामान विभागाने  महाराष्ट्रामध्ये आजपासून मोसमी पाऊस पुन्हा एकदा सक्रिय होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. आज (23 सप्टेंबर) मुंबईत वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. 

अशाच महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, विधानसभेसंदर्भातील सर्व अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर...

ADVERTISEMENT

  • 06:54 PM • 23 Sep 2024

    आरोपी अक्षय शिंदेने गोळी झाडून घेतली

    बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपी अक्षय शिंदे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. अक्षय शिंदे यांनी स्वत: गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.या घटनेत एक पोलीस जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. 

  • 01:49 PM • 23 Sep 2024

    'मला मंत्रीपद मिळणार असतानाच एका आमदाराने दिली धमकी', भरत गोगावलेंनी केला गौप्यस्फोट!

    तुम्हाला मंत्रिपद मिळणार असेल तर मी लगेच राजीनामा देतो, असं म्हणत आमच्याच एका आमदाराने धमकी दिली, त्यामुळे मला मंत्रिपद मिळू शकलं नाही आणि आता त्याच आमदाराला मुख्यमंत्र्यांनी सिडकोचं अध्यक्षपद दिलं आहे, असं म्हणत शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी खळबळजनक गौप्यस्फोट केला. अंबरनाथमध्ये झालेल्या एका कार्यक्रमातील भाषणात शिवसेनेचेच आमदार संजय शिरसाट यांच्यावर गोगावले यांनी नाव न घेता निशाणा साधला.

    मुख्यमंत्र्यांनी मला एसटी महामंडळाचं अध्यक्षपद दिलं असून त्यात मी समाधानी आहे. मी कधीही काहीही मागितलं नाही. मात्र ज्या वेळेस मला मंत्रिपद देण्याची वेळ आली आणि मुख्यमंत्र्यांनी मला विचारलं, त्यावेळेस आमच्याच एका आमदाराने 'तुम्हाला मंत्रिपद मिळत असेल, तर मी लगेच राजीनामा देतो', असं म्हटलं आणि त्यामुळे मला मंत्रिपद सोडावं लागलं. आज त्याच आमदारांना मुख्यमंत्र्यांनी सिडकोचं अध्यक्ष केलं आहे, असं आमदार भरत गोगावले म्हणाले. सिडकोचे अध्यक्ष झालेले शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांच्यावर यावेळी गोगावले यांनी नाव न घेता निशाणा साधला. तर मला आणि आमदार डॉ. बालाजी किणीकर यांना दोघांनाही मंत्रिपद मिळणार होतं, मात्र आम्ही मोठा त्याग केला आहे. 'एक आमदार तर म्हणाले की मला मंत्रिपद मिळालं नाही, तर माझी बायको आत्महत्या करेल, मग आमच्या बायकांनी काय करावं?' असंही भरत गोगावले भाषणात म्हणाले. तसंच त्या आमदारासाठी आम्ही मंत्रीपद सोडलं, कारण कुणाचं घरदार उध्वस्त व्हायला नको, असंही भरत गोगावले म्हणाले. गोगावले हे अंबरनाथमध्ये शिवसेनेच्या वतीने आयोजित महाड पोलादपूर माणगाव वासियांच्या संवाद मेळाव्यासाठी आले होते. यावेळी बोलताना आपल्या भाषणात त्यांनी हे गौप्यस्फोट केले. आता यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट काय प्रतिक्रिया देतात? हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
     

  • 01:40 PM • 23 Sep 2024

    Maharashtra News : आरक्षणाच्या मुद्द्यावर धनगर समाज आक्रमक!

    धुळ्यातील धनगर समाजाच्या वतीने मुंबई आग्रा महामार्गावर रास्ता रोको… मुंबई आग्रा महामार्गावरील रेसिडेन्सी पार्क जवळ रस्ता रोको… धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळावे… शासनाने तात्काळ दाखल घेत लवकर निर्णय जारी करावा या मागणीसाठी करण्यात आला आंदोलन..

     

  • 11:01 AM • 23 Sep 2024

    Maharashtra News : दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या मुलाने घेतली मनोज जरांगेंची भेट

    दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांचा मुलगा रवींद्र चव्हाण यांनी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगेंची भेट घेतली.  त्यांनी जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

  • ADVERTISEMENT

  • 10:52 AM • 23 Sep 2024

    Maharashtra News : भाजपच्या निवडणूक समितीची आज बैठक

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज भाजपच्या निवडणूक समितीची बैठक होणार आहे.  आगामी विधानसभा निवडणूक तयारी बाबत आढावा घेतला जाईल.

     

  • 10:04 AM • 23 Sep 2024

    Maharashtra News : शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा आज धुळ्यात

    राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिव स्वराज्य यात्रा आज धुळ्यात असणार आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत सभा होणार आहे. शिवस्वराज्य यात्रेनिमित्ताने शिवतीर्थ चौकातून ट्रॅक्टर रॅलीचा आयोजन करण्यात आलं आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. हिरे भवन इथं सकाळी अकरा वाजता भव्य सभेचे आयोजन करण्यात आलं आहे.

follow whatsapp

ADVERTISEMENT