लाइव्ह

Maharashtra Breaking News : आरोपी अक्षयला कोणत्या चौकशीसाठी नेलं जात होतं? प्रकाश आंबेडकरांचे सवाल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Maharashtra breaking news in marathi : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला. माहितीनुसार, पोलीस व्हॅनमध्ये असताना आरोपी अक्षय शिंदे याने शेजारीच बसलेल्या पोलीस अधिकाऱ्याची बंदूक हिसकावून थेट त्यांच्यावरच गोळीबार केला. ज्यानंतर इतर पोलिसांनी स्व-संरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाला.

ADVERTISEMENT

या प्रकरणानंतर अक्षयच्या आई-वडिलांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार देत पोलिसांवर आरोप केले आहेत. तर दुसरीकडे विरोधकांनीही यावरुन जोरदार टीका करत मोठं षडयंत्र असल्याचे म्हटलं आहे. आता या घटनेनंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत.

विधानसभा निवडणुकीपूर्वी आता महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यामुळे सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे महायुतीत जागावाटप आणि मुख्यमंत्रिपदावरुन राजकारण सुरु झाले आहे.

अशाच महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, विधानसभेसंदर्भातील सर्व अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर...

ADVERTISEMENT

  • 04:17 PM • 24 Sep 2024

    Maharashtra News Live : मेहबूब शेख यांची नरहरी झिरवळ यांच्यावर टीका

    गोकुळ झिरवाळ शरद पवार गटाच्या व्यासपीठावर असतानाच मेहबूब शेख यांनी नरहरी झिरवाळ यांच्यावर टीका केली. छाती फाडून पाहिल्यावर शरद पवार दिसतील म्हणणारे झिरवाळ यांचं ऑपरेशन कोणी केले त्यांच्या छातीत गद्दारी कशी दिसते, असा सवाल त्यांनी विचारला.

     

  • 11:48 AM • 24 Sep 2024

    Maharashtra News Live : आरोपी अक्षयला कोणत्या चौकशीसाठी नेलं जात होतं? प्रकाश आंबेडकरांचे सवाल

    आरोपी अक्षयला कोणत्या चौकशीसाठी नेलं जात होतं ? पोलिसांच्या मांडीला गोळी कशी लागली ? कुणाला तरी वाचवण्यासाठी आरोपीचा बळी घेतला का ? असे सवाल उपस्थित करत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणी संशय व्यक्त केलाय.

     

  • 11:45 AM • 24 Sep 2024

    Maharashtra News Live : महाराजांचा नव्याने पुतळा उभारण्यासाठी मालवण राजकोट येथे हालचाली सुरू

    मालवण राजकोट येथे महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.  राजकोट किल्ला येथे नव्याने शिवपुतळा उभारण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने २० कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता कणकवली यांनी ही निविदा प्रक्रिया केलेली आहे.

    राजकोट किल्ला येथे उभारण्यात आलेला शिव पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळल्यानंतर तीव्र स्वरूपात शिवभक्तांच्या भावना संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशाभरात उमटल्या होत्या.

     

  • 09:41 AM • 24 Sep 2024

    Maharashtra News Live : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज नागपूर दौऱ्यावर

    केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नागपूर दौऱ्यावर आहेत.

    विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विदर्भातील सर्वच विधानसभा पदाधिकाऱ्यांची घेणार बैठक

    विदर्भातील 1500 पदाधिकारी बैठकीला उपस्थिती असणार

    आजी माजी आमदार खासदारांचा असणार समावेश

    विदर्भात लोकसभा निवडणुकीत भाजप ला कमी मताधिक्य मिळालं होतं, त्यावर सुद्धा चर्चा होऊन मताधिक्य वाढविण्यावर मंथन होण्याची शक्यता

    विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने असणार ही अतिशय महत्त्वाची बैठक

    निवडणुकीला कशा प्रकारे समोर जायचं विरोधकांना कसा प्रकारे उत्तर द्यायचं यावर सुद्धा चर्चा होण्याची शक्यता आहे

  • ADVERTISEMENT

  • 09:38 AM • 24 Sep 2024

    Maharashtra News Live : आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह शवविच्छेदनानंतर कुटुंबियांकडे येणार सोपवण्यात

    अक्षय शिंदेच्या मृतदेहाचा पंचनामा कळवा रुग्णालय येथे करण्यात येत आहे

    पोस्टमार्टम हे जे जे रुग्णालयात करण्यात येणार आहे.

    पोस्टमार्टम नंतर त्याचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांकडे सोपविण्यात येणार आहे.

     

follow whatsapp

ADVERTISEMENT