लाइव्ह

Vinesh Phogat Petition Dismissed : विनेशला मोठा धक्का; कोर्टाने काय दिला निकाल?

मुंबई तक

ADVERTISEMENT

vinesh phogat Petition Dismissed
विनेश फोगटची याचिका क्रीडा लवादाने फेटाळली आहे.
social share
google news

Maharashtra breaking news in marathi : सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. यामुळे सर्वच पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर सध्या विविध पक्षांच्या बैठका, दौरे आणि रॅलींचे आयोजन करण्यात आले आहे.

ADVERTISEMENT

त्यासोबतच आज मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी नाशिकमध्ये शांतता रॅलीचे आयोजन केले आहे. मराठा आरक्षण शांतता रॅलीचा आज नाशिकमध्ये समारोप होणार आहे.

 

ADVERTISEMENT

  • 09:36 PM • 14 Aug 2024

    विनेशला मोठा धक्का; कोर्टाने काय दिला निकाल?

     भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट हीच्या केस प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. विनेश फोगटची याचिका क्रीडा लवादाने फेटाळली आहे. त्यामुळे आता भारताच्या रौप्य पदकाच्या आशा धुळीस मिळाल्या आहेत. 

  • 12:00 PM • 13 Aug 2024

    Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या सर्व याचिकांवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी!

    मराठा आरक्षणाविरोधात दाखल सर्व याचिकांवर आज मुंबई उच्च न्यायालयाच्या पूर्णपीठापुढे सुनावणी होणार आहे. आरक्षणाच्या विरोधात आणि समर्थनात विविध याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल आहेत. राज्य सरकारने मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात दिलेलं आरक्षण वैध की अवैध यावर सुनावणी होणार. या निकालावर राज्य सरकार विद्यार्थ्यांना देत असलेले प्रवेश आणि नोकरभरती अवलंबून असेल असं हायकोर्टानं आधीच स्पष्ट केलं.

  • 11:55 AM • 13 Aug 2024

    Sharad Pawar : माढा आणि करमाळा तालुक्यात शरद पवार गटाची यात्रा!

    राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची यात्रा आज सोलापूर जिल्ह्यातील माढा आणि करमाळा तालुक्यात असणार आहे. या यात्रेमध्ये खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, धैर्यशील मोहिते पाटील आदी नेते मार्गदर्शन करणार आहेत. काल मोहर मध्ये अमोल कोल्हेंना घेराव घातल्याच्या घटनेनंतर सोलापुरातील शासकीय विश्रामगृहामध्ये पोलीस सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

     

  • 11:48 AM • 13 Aug 2024

    Sangli News : हर घर तिरंगा अभियानांतर्गत सांगलीत सायकल रॅली

    हर घर तिरंगा अभियानांतर्गत सांगली जिल्हा परिषदे कडून आज तिरंगा सायकल रॅली काढण्यात आली. या सायकल रॅलीमध्ये जिल्हाधिकारी राजा दयानिधी , पोलीस अधीक्षक संदीप घुगे , महापालिका आयुक्त शुभम गुप्ता आणि जिल्हा परिषद सीईओ तृप्ती धोडमिसे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.

     

  • ADVERTISEMENT

  • 09:20 AM • 13 Aug 2024

    Majhi Ladki Bahin Yojana News: 'लाडकी बहीण' योजनेच्या लाभार्थींचा रविवारी साताऱ्यात मेळावा

    मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यासाठी येत्या रविवारी (ता. १८) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीत साताऱ्यात महिलांचा महामेळावा होणार आहे. सैनिक स्‍कूलच्या मैदानावर होणाऱ्या या मेळाव्यास पालकमंत्री शंभूराज देसाई, तसेच शिंदे गट शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी व जिल्ह्यातील महिला लाभार्थी यावेळेस उपस्थित राहणार आहेत.

     

  • 09:19 AM • 13 Aug 2024

    Maharashtra News : मराठा आरक्षण शांतता रॅलीचा आज नाशिकमध्ये समारोप

    मराठा आरक्षण शांतता रॅलीचा आज नाशिक मध्ये समारोप होत आहे. पाच लाख समाज बांधवांच्या उपस्थितीचा अंदाज आहे. तसंच, रॅलीमुळे निम्म्या शहरातील आज रस्ते बंद राहतील. शहरातील सर्व शाळांना जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टी जाहीर केली आहे.  सिटीलींक बसच्या अकराशे फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तपोवन ते सीपीएस सात किलोमीटर पर्यंत रॅलीचे आयोजन असेल.

     

follow whatsapp

ADVERTISEMENT