Maharashtra Breaking News: धक्कादायक... नरहरी झिरवळांनी मंत्रालयातील जाळीवर मारली उडी
Maharashtra Live News : महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, विधानसभेसंदर्भातील सर्व अपडेट्स तसंच हवामानाचा अंदाज 'मुंबई Tak'च्या या लाइव्ह ब्लॉगमध्ये जाणून घ्या सर्व फक्त एका क्लिकवर...
ADVERTISEMENT
Maharashtra breaking news in marathi : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सध्या राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत. आज अनेक राजकीय मोठ्या घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ADVERTISEMENT
केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरूवारी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला. या निर्णयामुळे जगभरातील मराठीभाषक, मराठीप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सध्या राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत.
अशाच महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, विधानसभेसंदर्भातील सर्व अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर...
ADVERTISEMENT
- 01:14 PM • 04 Oct 2024
Maharashtra News : आमदारांच्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या
राज्यातील राजकारणात खळबळजनक बातमी आली आहे. राज्यातील आदिवासी समाजातील आमदारांनी मंत्रालयातील जाळीवर उडी मारल्या आहे. एसटीच्या आरक्षणास धक्का लागू नये, ही मुळ मागणी आमदारांची आहे.
- 12:52 PM • 04 Oct 2024
Maharashtra News : नरहरी झिरवळांची आपल्याच सरकारवर नाराजी! मंत्रालयातील जाळीवर मारली उडी
सत्ताधारी पक्षात असलेले आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी सीताराम झिरवळ यांच्यासह दोन आमदारांनी मंत्रालयाच्या संरक्षक जाळीवर उड्या मारल्या. उड्या मारण्यापूर्वी झिरवळ यांच्यासह काही आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. ही भेट निष्फळ ठरल्यानंतर झिरवळ यांच्यासह दोन आमदारांनी जाळीवर उड्या मारल्या. मुख्यमंत्र्यांना आमचे ऐकावे लागेल ते ऐकत नसतील तर आमच्याकडे प्लॅन बी तयार आहे, असे काही तासांपूर्वी नरहरी झिरवळ यांनी म्हटले होते. एसटीच्या आरक्षणास धक्का लागू नये, ही मागणी आमदारांची आहे.
- 11:10 AM • 04 Oct 2024
Maharashtra News : पुणे प्रकरणातील आरोपींचं फडणवीसांनी एन्काउंटर करावं- संजय राऊत
'पुण्यातील आरोपींचाही एन्काउंटर फडणवीसांनी करावं. सिंघमच्या पोस्टरमधून फडणवीसांनी बाहेर यावं. जे बदलापूरला केलं मिंध्यांनी, फडणवीसांनी... पुण्यात एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार ही तर बदलापूरपेक्षाही भयानक घटना आहे. फडणवीसांनी त्यांच्या कंबरेला पिस्तूल असेल ते काढावं आणि पोस्टरमधून बाहेर यावं आणि एन्काउंटर करा.' असं संजय राऊत म्हणाले.
- 10:57 AM • 04 Oct 2024
Maharashtra News : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने नाशिकमध्ये शिवसेनाचा आनंदोत्सव
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने नाशिकमध्ये शिवसेनाचा आनंदोत्सव. शिवसेना शिंदे गटाकडून नाशिकच्या कुसुमाग्रज स्मारका बाहेर जल्लोष करण्यात आला. मराठी भाषेचा जयघोष करत, फटाक्यांची आतीषबाजी करत, पेढे भरवत आनंद साजरा करण्यात आला.
- 09:10 AM • 04 Oct 2024
Maharashtra News : मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याच्या मागणीसाठी आम्ही पाठपुरावा केला- शरद पवार
‘ मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा ही मागणी साहित्याच्या क्षेत्रातील सर्वांनी केली. साहित्य परिषदेमध्ये,अधिवेशनामध्ये ठराव करून तेथेही करण्यात आली होती. माझ्यासारखे अनेक सहकारी , ज्यांना या सगळ्या प्रकरणामध्ये आस्था आहे, आम्हीसुद्धा व्यक्तीगत पातळीवर केंद्र सरकारकडे मागणी करत यासंदर्भात आग्रह केला, पाठपुराव केला होता ‘, असे शरद पवार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT