Maharashtra Breaking News : देशाचा मूड आता इंडिया आघाडीला लक्षात आलाय- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Maharashtra Live News : महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, विधानसभेसंदर्भातील सर्व अपडेट्स तसंच हवामानाचा अंदाज 'मुंबई Tak'च्या या लाइव्ह ब्लॉगमध्ये जाणून घ्या सर्व फक्त एका क्लिकवर...
ADVERTISEMENT
Maharashtra breaking news in marathi : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सध्या राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत. आज अनेक राजकीय मोठ्या घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ADVERTISEMENT
अमरावती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे लोकार्पण व रुग्णालयाचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. आज सकाळी 11 वाजता ऑनलाइन पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल राधाकृष्णन,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होईल.
जागावाटपासंदर्भात महाविकास आघआडीची 11 तारखेला पत्रकार परिषद होणार असून त्यावेळी शरद पवार, उद्धव ठाकरे , नाना पटोले संबोधित करणार आहेत. या पत्रकार परिषदेत मविआच्या जागावाटपाचा फॉर्म्युला समजण्याची शक्यता आहे.
अशाच महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, विधानसभेसंदर्भातील सर्व अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर...
ADVERTISEMENT
- 12:51 PM • 09 Oct 2024
Maharashtra News: हरियाणाचा पराभव दुर्देवी, यातून बरंच शिकण्यासारखं- संजय राऊत
“हरियाणाचा पराभव दुर्देवी आहे. यातून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. देशातील निवडणूक एकत्र लढवावी लागेल. कोणी स्वत:ला छोटा भाऊ, मोठा भाऊ समजू नये. लोकसभेचं यश हे इंडिया आघाडीचं यश आहे,” असं राऊत म्हणाले.
- 12:43 PM • 09 Oct 2024
Maharashtra News : देशाचा मूड आता इंडिया आघाडीला लक्षात आलाय- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
“काँग्रेस, ठाकरे गट शस्त्र चमकवून बसले होते. देशाचा मूड आता इंडिया आघाडीला लक्षात आलाय. विरोधकांच फेक नरेटिव्ह हरियाणात चाललं नाही. हम साथ साथ हैं, म्हणणारे हम तुम्हारे कौन” म्हणायला लागलेत. हरियाणा विधानसभा निवडणूक निकालावर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया.
- 12:42 PM • 09 Oct 2024
Maharashtra News: जागावाटपासंदर्भात महाविकास आघआडीची 11 तारखेला पत्रकार परिषद
जागावाटपासंदर्भात महाविकास आघआडीची 11 तारखेला पत्रकार परिषद होणार असून त्यावेळी शरद पवार, उद्धव ठाकरे , नाना पटोले संबोधित करणार आहेत. या पत्रकार परिषदेत मविआच्या जागावाटपाचा फॉर्म्युला समजण्याची शक्यता आहे.
- 12:17 PM • 09 Oct 2024
Maharashtra News: भाजपची पहिली यादी आठवडाभरात घोषित होणार?
विधानसभेच्या उमेदवार निश्चितीसाठी पुढील दोन दिवस भाजपच्या महत्त्वाच्या बैठका होणार आहेत. भाजपची उमेदवार निवड प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली असून आठवडाभरात भाजपची पहिली यादी घोषित होणार आहे.
काल रात्री सागर बंगल्यावर भाजपच्या निवडक नेत्यांची मॅरेथॉन बैठक पार पडली. मुंबई, कोकण विभागानंतर आज उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राच्या जिल्हा निहाय बैठका तर विदर्भ आणि मराठवाड्याच्या बैठकही 2 दिवसांत पार पडणार आहेत.
- 12:16 PM • 09 Oct 2024
Maharashtra News: अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये आज विविध विकासकामांचे उद्घाटन सुरु
पिंपरी चिंचवड शहरात अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये आज विविध विकासकामांचे उद्घाटन सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामध्ये पोलिसांसाठी नवीन वाहने देण्याचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला. यावेळी पिंपरी चिंचवड पोलिसांनी अजित पवार यांना मानवंदनाही दिली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT