Maharashtra Assembly Election 2024 LIVE : वैजापूरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा
LIVE Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, विधानसभेसंदर्भातील सर्व अपडेट्स आणि इतर महत्त्वाच्या घडामोडी 'मुंबई Tak'च्या या लाइव्ह ब्लॉगमध्ये जाणून घ्या फक्त एका क्लिकवर...
ADVERTISEMENT
Maharashtra Assembly Election 2024 News LIVE in Marathi : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. अशात ठिकठिकाणी प्रचारसभा सुरु आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज महायुतीसाठी प्रचार दौरा करणार आहेत. छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, जालना आणि मुंबईत महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी विविध सभा आणि रॅलीत उपस्थित राहणार आहेत.
ADVERTISEMENT
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बारामती विधानसभेचे उमेदवार अजित पवार यांचा आज गाव भेट दौरा होत आहे.
आज ते अनेक गावांना भेटी देणार आहेत. शरद पवार यांच्या उद्या नाशिक जिल्ह्यात तब्बल सहा जाहीर सभा होणार आहेत.
अशाच महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, विधानसभेसंदर्भातील सर्व अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर...
ADVERTISEMENT
- 03:05 PM • 11 Nov 2024
Maharashtra Assembly Election 2024 : छत्रपती संभाजी नगर शहरात मोदी यांची सभा
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती संभाजी नगर शहरात 14 नोव्हेंबर रोजी जाहीर सभा होणार आहे. छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील चौदा विधानसभा मतदारसंघासाठी नरेंद्र मोदी ही सभा घेणार आहे.
- 02:58 PM • 11 Nov 2024
Maharashtra Assembly Election 2024 : वैजापूरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा
वैजापूर विधानसभा मतदार संघाचे उमेदवार रमेश बोरणारे यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज वैजापूर शहरात जाहीर सभा पार पडत आहे. यावेळी मला कुणाचेही आव्हान वाटत नाही, मी अजूनही रामगिरी महाराजांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, अशी प्रतिक्रिया रमेश बोरणारे यांनी दिली आहे,
- 12:01 PM • 11 Nov 2024
Maharashtra Assembly Election 2024 : भाषणावेळी वीज जाताच शिवानी वडेट्टीवारांकडून शिवीगाळ
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील आकापूर गावात त्यांच्या भाषणादरम्यान गेली वीज, शिवानी यांचे वडील विजय वडेट्टीवार आहेत या जागेवरून काँग्रेसचे उमेदवार, वीज गेल्यावर संतापलेल्या शिवानी यांनी वीज मंडळ- भाजप आणि सरकारला केली अभद्र शिवीगाळ, राज्याचा विरोधी पक्षनेता पुढील मुख्यमंत्री असतो असे सांगत भाजप आणि वीज मंडळाला धडा शिकविण्याची केली भाषा, विजय वडेट्टीवार राज्यभर प्रचार दौरे करत असताना शिवानी यांनी सांभाळली आहे प्रचाराची धुरा, मात्र आकापूर येथील शिवीगाळीच्या वायरल व्हिडीओने शिवानी वडेट्टीवार अडचणीत, याआधी देखील आपल्या भाषणाने शिवानी आल्या होत्या चर्चेत, या वायरल व्हिडीओवर प्रतिक्रिया घेण्यासाठी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला शून्य
- 11:31 AM • 11 Nov 2024
Chief Justice Sanjiv Khanna : भारताचे 51 वे सरन्यायाधीश म्हणून संजीव खन्ना यांनी घेतली शपथ
संजीव खन्ना यांनी सरन्यायाधीश पदाची जबाबदारी घेतली आहे. राष्ट्रपती दौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत शपथविधी सोहळा पार पडला. खन्ना हे 13 मे 2025 पर्यंत सरन्यायाधीश पदावर असणार आहेत.
- 10:29 AM • 11 Nov 2024
अमित ठाकरे वयानं लहान, त्यांनी शांतपणे निवडणूक लढावी – संजय राऊत
अमित ठाकरे वयानं लहान, त्यांनी शांतपणे निवडणूक लढावी… बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना भाजपनं शिंदेंना विकली… असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.
- 09:51 AM • 11 Nov 2024
Maharashtra Assembly Election 2024 : तुमची लायकी नव्हती म्हणून मंत्रीपद मिळालं नाही धैर्यशील मोहिते पाटलांचा थेट शिंदेंवर वार
माढा विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू आहे. काल अरण येथील सभेमध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांनी माढाचे आमदार बबनराव शिंदे यांच्या वरती निशाणा साधला सीना माढा उपसा योजना ही पवार साहेबांना आणली ती काय फक्त तुम्ही आणली नाही. असा टोला धैर्यशील मोहिते पाटील यांनी लागवला. यावेळेस बोलताना धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले तुमची लायकी नव्हती म्हणून तुम्हाला मंत्रीपद मिळालं नाही.त्याचबरोबर मतदार संघातील महिला प्रचारकांना दमदाटी होती अशी एक चिठ्ठी धैर्यशील मोहिते पाटील यांना दिली होती. यावर बोलताना धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले तुम्ही जिजाऊंच्या लेकी आहात तलवार काढा आणि सापससूप करून टाका...
- 09:50 AM • 11 Nov 2024
Maharashtra Assembly Election 2024 : विजयी उमेदवार म्हणून उद्धव ठाकरे यांचा जळफळाट - शहाजीबापू पाटील
सांगोला विधानसभा मतदार संघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा झाली. या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांना गुहाटीला पाठवण्याचे तिकीट द्या त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 23 तारखेनंतर भांडी घासावी लागतील अशी जहरी टीका केली होती या टिके चा शहाजी बापू पाटील यांनी समाचार घेतलाय शहाजी बापू पाटील म्हणाले आम्ही सत्ता बदल केले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाल्यापासून उद्धव ठाकरे आमच्यावरती टीका करत आहेत मात्र आम्ही स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव म्हणून त्यांच्यावरती बोलणार नाही. त्याचबरोबर झालेल्या सभेमध्ये जी गर्दी होती ती गर्दी बाहेरची होती त्यातील 30 टक्केच गर्दी ही दीपक आबा साठी आली होती. याचं मतांमध्ये रूपांतर होणार नाही या सभेमध्ये जे लोक आले होते ते माझ्यावरती उद्धव ठाकरे काय टीका करतात हे ऐकण्यासाठी आले होते असेही शहाजी पाटील म्हणाले.
- 09:50 AM • 11 Nov 2024
Maharashtra Assembly Election 2024 : उद्या शरद पवारांच्या नाशिकमध्ये सहा सभा
नाशिक जिल्ह्यात शरद पवार यांच्या उद्या तब्बल सहा जाहीर सभा होणार आहेत. स्व पक्षाच्या मतदारसंघात पवारांच्या चार, तर मित्र पक्षांच्या मतदारसंघात प्रत्येकी एक सभा होणार आहे. कळवण, दिंडोरी, निफाड,पिंपळगाव, येवला, सिन्नर, नाशिक पूर्व, या मतदार संघात शरद पवारांच्या जाहीर सभा होणार आहेत.
- 09:49 AM • 11 Nov 2024
Maharashtra Assembly Election 2024 : अविनाश लाड यांची 6 वर्षासाठी पक्षातून हकालपट्टी
रत्नागिरीत काँग्रेसचे बंडखोर उमेदवार अविनाश लाड यांची 6 वर्षासाठी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. अविनाश लाड राजापूर मतदार संघात अपक्ष उमेदवारी अर्ज भरत बंडखोरी केली. पक्षाच्या वरिष्ठांचे आदेश न मानता अविनाश लाड अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात आहेत. महाविकास आघाडीचा उमेदवार असताना अविनाश लाड अपक्ष उमेदवार आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही कारवाई केली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT