Maharashtra Breaking News : सिनेट निवडणुकीत ठाकरेंचा 9 वा उमेदवार विजयी
Maharashtra Live News : महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, विधानसभेसंदर्भातील सर्व अपडेट्स तसंच हवामानाचा अंदाज 'मुंबई Tak'च्या या लाइव्ह ब्लॉगमध्ये जाणून घ्या सर्व फक्त एका क्लिकवर...
ADVERTISEMENT
Maharashtra breaking news in marathi : विधानसभा निवडणुकीपूर्वी आता महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यामुळे सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे महायुतीत जागावाटप आणि मुख्यमंत्रिपदावरुन राजकारण सुरु झाले आहे.
ADVERTISEMENT
आजपासून दोन दिवस मनसे अध्यक्ष राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर आहेत. अमरावतीच्या हॉटेल ग्रॅड मैफिल इन वर राज ठाकरेंचा मुक्काम असणार आहे.
पोर्शे कार अपघातातील अल्पवयीन आरोपीच्या अडचणी वाढणार, अल्पवयीन मुलावर येरवडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात कलमवाढ होणार आहे. रक्ताचे नमुने बदलल्या प्रकरणी पुराव्यात छेडछाड, कट रचणे, खोटे दस्ताऐवज तयार करणे तसेच नमुने बदलण्यासाठी डॉक्टरांना लाच दिल्याने भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमासह विविध कायद्यांनुसार मुलावर कारवाई होणार. अपघात झाल्यापासून त्याच्या तपासातील अनेक टप्प्यांची माहिती देणारा पुरवणी अहवाल गुरुवारी पोलिसांकडून बाल न्याय मंडळास सादर केला. त्यात पोलिसांनी वाढविलेली कलमे नमूद करण्यात आली आहेत. या अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला होता.
अशाच महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, विधानसभेसंदर्भातील सर्व अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर...
ADVERTISEMENT
- 09:16 PM • 27 Sep 2024
ठाकरेंची 'या' निवडणुकीत बाजी, 9 वा उमेदवार झाला विजयी
सिनेट निवडणुकीत युवासेनेचा 9 वा उमेदवार विजयी ठरला आहे. परमात्मा यादव असे या उमेदवाराचे नाव आहे. आता एक जागा ठाकरेंच्या युवासेनेला जिंकायची आहे. त्यानंतर सिनेट निवडणुकीत ठाकरे गटाला एकहाती सत्ता मिळवता येणार आहे.
- 12:07 PM • 27 Sep 2024
Maharashtra Breaking News : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे अमरावतीत आगमन
मनसे अध्यक्ष राज ठाकरे विधानभा निवडणुकीच्या अनुषंगाने 'मिशन विदर्भ साठी रणनीती आखत आहेत. 27 आणि 28 सप्टेंबर रोजी दोन दिवस मनसे अध्यक्ष राज ठाकरे अमरावती दौऱ्यावर आसणार आहेत. यावेळी ते विदर्भातील सर्व 11 जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतील. 27 तारखेला पश्चिम विदर्भातील अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम आणि यवतमाळ या पाच जिल्हाचा आढावा त्यांच्याकडून घेण्यात येणार आहे. तर 28 तारखेला नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, आणि चंद्रपूर जिल्हाचा आढावा घेतला जाईल.
राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यापूर्वी 7 उमेदवार जाहीर केले आहेत. आता मनसे विधानसभा निवडणुकीसाठी विदर्भातून पहिली यादी राज ठाकरे जाहीर करण्याची शक्यता आहे. आज 27 तारखेला सकाळी 7.30 वाजता राज ठाकरे यांचं अमरावतीत रेल्वे स्टेशनवर आगमन होताच मनसे कार्यकर्त्यांनी ढोल ताशे, फटाके फोडत जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी कार्यक्रमा दरम्यान राज ठाकरे विधानसभा निवडणुकीसाठी विदर्भातील नेत्यांची यादी जाहीर करतील असे बोलले जात आहे.
- 11:53 AM • 27 Sep 2024
Maharashtra News : अंबादास दानवे यांची भाजपवर टीका
मागील जसे सरकार आले. तेव्हापासून काम करत होते, तेव्हा काय हाल झाले ? गडकरी लीड कमी, दानवे पराभूत सर्व मंत्री पराभूत झाले. आमिष शहा इथ येऊन काही करू शकत नाही. तुमचं नेतृत्व कुचकामी म्हणून तुम्हाला यावं लागत असल्याची टीका त्यांनी भाजपवर केली.
- 09:20 AM • 27 Sep 2024
कल्याण डोंबिवलीत मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस
- कल्याण डोंबिवलीत मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे.
- मुसळधार पावसामुळे सखल भागांत पाणी साचण्याच्या घटना
- मात्र अधूनमधून पावसाचा जोर कमी होत असल्याने साचलेल्या पाण्याचा निचरा होतोय
- 09:19 AM • 27 Sep 2024
Maharashtra News : रत्नागिरीत मुसळधार पावसाचा अंदाज
समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम मच्छीमारीवर
समुद्रात सध्या वादळी परिस्थिती, त्यामुळे मच्छीमारीला ब्रेक
गेल्या चार दिवसांपासून कोकण किनारपट्टीवरची मासेमारी ठप्प
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र जमिनीवर उतरले आहे
त्या क्षेत्राचे ट्रफ उत्तर कोकण किनारपट्टीवर
रत्नागिरी जिल्ह्यातील साडेतीन हजार मासेमारी बोटी किनाऱ्याला
तीन दिवसांपासून मासेमारी ठप्प असल्याने जवळपास 25 कोटीची उलाढाल ठप्प
ऐन मच्छीमारी हंगामात निसर्गाच्या लहरीपणाचा फटका मच्छी व्यवसायिकांना
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT