Ganeshotsav 2024 Live News : सोनाली कुलकर्णीच्या घरी बाप्पाचं जल्लोषात स्वागत
Ganesh Chaturthi 2024 Muhurat Live : राज्यात आज सर्वत्र गणेश उत्सव पहायला मिळत आहे. अशाच महाराष्ट्रातील गणेशोत्सवाच्या सर्व अपडेट्स 'मुंबई Tak'च्या या लाइव्ह ब्लॉगमध्ये जाणून घ्या सर्व फक्त एका क्लिकवर...
ADVERTISEMENT
Maharashtra breaking news in marathi : आज गणेश चतुर्थीनिमित्त देशभरात जल्लोषात बाप्पाचं स्वागत केलं जातंय. आज गणेश मंडळांसह घरोघरी बाप्पाचं आगमन झालं आहे. तसेच, आजच्या दिवशी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची मुंबईच्या सिद्धीविनायक मंदिरात प्रचंड गर्दी पाहायला मिळते. आज सकाळची आरती मंदिरात सुरु झाली आहे. आज सकाळपासूनच भाविकांचा ओघ मंदिरात पाहायला मिळत आहे.
ADVERTISEMENT
जगभरातील गणेशभक्तांचे अराध्य दैवत बनलेल्या लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी गणेशभक्तांची मोठी गर्दी उसळली आहे. यंदा लालबागचा राजाचा दरबार हा मयूर महालात आहे. तसेच लालबागचा राजा मयुरासनावर विराजमान झाला आहे. आज गणेश चतुर्थीचा पहिला दिवस असल्यामुळे लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी गणेशभक्तांची काल रात्रीपासूनच रांगा लावल्या होत्या.
अशाच महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, विधानसभेसंदर्भातील सर्व अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर...
ADVERTISEMENT
- 12:43 PM • 07 Sep 2024
Ganesh Chaturthi 2024 : लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकऱ्यांचे मला आशीर्वाद आहेत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
आज गणपत्ती बाप्पा आला आनंद झाला आहे, राज्यात आनंदमय वातावरण आहे. मी सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतो. राज्यात अनेक विकास प्रकल्प सुरू आहेत, विकास आणि कल्याणकारी योजनेची सांगड घालण्याचे काम केले आहे. विरोधकांना सद्बुधी देवो. देशात महाराष्ट्र हे ग्रोथ इंजिन आहे. लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, लाडक्या पत्रकारांचे मला आर्शिवाद आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.
- 11:01 AM • 07 Sep 2024
Ganesh Chaturthi 2024 : सोनाली कुलकर्णीच्या घरी बाप्पाचं जल्लोषात स्वागत
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या घरी ही मोठ्या उत्साहात लाडक्या बाप्पाचे आगमन झालं आहे. यावेळी सोनालीने टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला. दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्साह कायम आहे. गेली पाच वर्षे ती घरीच मूर्ती बनवत आहे, असं सोनालीने सांगितलं. यंदा सोनाली कुलकर्णीने बाल रूपातील गणपती बाप्पाची मूर्ती साकारली आहे.
- 10:53 AM • 07 Sep 2024
Ganesh Chaturthi 2024 : पुण्यातील मानाचा पहिला गणपती कुठे विराजमान होणार?
पुण्यातील मानाचा पहिला गणपती कसबा गणपती यंदा सिद्धटेक मंदिरात विराजमान होणार आहे. सिद्धटेक मंदिराची प्रतिकृती या ठिकाणी उभारण्यात आली आहे. मानाच्या कसबा गणपतीची मिरवणूक ही पालखीमधून निघते. ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक निघणार आहे.
- 09:39 AM • 07 Sep 2024
Ganeshostav 2024 : चिंचपोकळीच्या चिंतामणीचं यंदाचं 105 वं वर्ष; मंडळामार्फत जगन्नाथ पुरी मंदिराचा देखावा साकार
चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची म्हणजेच चिंचपोकळीच्या चिंतामणीची सकाळीच प्राणप्रतिष्ठापना आणि आरती पार पडली. यंदाचा चिंचपोकळीच्या चिंतामणीचे हे 105 वं वर्ष आहे. मुंबईतील जुन्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळापैकी एक असेल हे मंडळ यंदाच्या वर्षी या मंडळांनी जगन्नाथ पुरी मंदिराचा देखावा साकार केला आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा 20 फुटाची चिंचपोकळीच्या चिंतामणाची गणेश मूर्ती आहे.
ADVERTISEMENT