Maharashtra Breaking News : टीम इंडियाच्या विजयी रॅलीला सुरुवात, वानखेडे स्टेडिअमच्या दिशेने निघाला रथ
Maharashtra Live Updates : राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी रंगली आहे. त्याचबरोबर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडीही सुरू झाल्या आहेत... वाचा सगळ्या बातम्या लाईव्ह अपडेट्समध्ये...
ADVERTISEMENT
Maharashtra News Live Updates : लोकसभेच्या निकालानंतर महाराष्ट्रात राजकीय घटना घडामोडींना वेग आला आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी गणित जुळवून आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीचीही तयारी सुरू झाली आहे.
ADVERTISEMENT
महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. राज्यातील विविध मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचे प्रयत्न विरोधकांकडून होताना दिसत आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालामुळे विरोधकांचा आत्मविश्वास वाढल्याचे दिसत आहे.
टीम इंडियाने टी 20 वर्ल्ड कप 2024 अंतिम फेरीत 29 जून रोजी बारबाडोसमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव करुन 17 वर्षांनंतर आयसीसी टी 20 वर्ल्ड कप जिंकला. मात्र त्यानंतर काही दिवस नैसर्गिक स्थितीमुळे भारतीय खेळाडूंना तिथेच वाट पाहावी लागली. मात्र बीसीसीआयने प्रायव्हेट जेट पाठवून टीम इंडियाच्या खेळाडूंना मायदेशी आणण्याची सोय केली. टीम इंडियाचे खेळाडू भारतात दाखल झाल्यानंतर त्याचं स्वागत केलं जाणार आहे. सर्व तयारीही झाली आहे.
या विषयीच्या प्रत्येक घडामोडीची माहिती आपण या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
ADVERTISEMENT
- 05:43 PM • 04 Jul 2024
Team India : टीम इंडियाच्या स्वागतासाठी मुंबई सज्ज, चाहत्यांची तुफान गर्दी
विश्व विजेत्या टीम इंडियाच्या स्वागतासाठी मरीन ड्राईव्ह येथे क्रिकेट चाहत्यांनी एकच गर्दी केली आहे. टीम इंडियाची इथूनच विजयी मिरवणूक काढण्यात येणार आहे. आपल्या क्रिकेट चाहत्यांनी झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी तुफान गर्दी केली आहे.
- 12:50 PM • 04 Jul 2024
Maharashtra News : 'ज्ञानबा हरी, तुकाराम घरी... विरोध केला म्हणून तुकाराम मुंढेंची बदली'- वडेट्टीवार
'मुंबई बिल्डरच्या घशात घालण्याचं काम सुरू आहे. रोज मुंबई लुटली जात आहे. कोण वाचवेल या मुंबईला? धारावी पुनर्विकासाला आमचा विरोध नाही. दुग्धशाळेची 20 हजार कोटींची जमीन अदानीच्या घशात... प्रकल्प केवळ अदानीच्या फायद्यासाठी राबवतात. चोर बिल्डरपासून मुंबईला वाचवा. मुंबई लुटणाऱ्या अदानीला राज्याचे प्रमुख पाठिशी घालतायत.' विधानसभेत वड्डेटीवारांनी सरकारवर टीका केली. दुग्ध शाळेची जागा अदानींना देण्यास विरोध केल्यानेच सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात आली, असा गंभीर आरोप विजय वडेट्टीवार यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. आता विधानसभेत या मुद्द्यावर विजय वडेट्टीवार आक्रमकपणे बोलले ते म्हणाले, 'दुग्ध शाळेची जागा अदानींना देण्यास विरोध केला म्हणून ज्ञानबा हरी, तुकाराम घरी... ज्ञानबा-ज्ञानबा करून महाराष्ट्राला मूर्ख बनवताय. महाराष्ट्राला फसवताय, सोंगाडेपणा करून.'
- 10:56 AM • 04 Jul 2024
Maharashtra News : वसंत मोरे आज उद्धव ठाकरे यांची भेट घेणार
- आज दुपारी साडेबारा वाजता वसंत मोरे उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी मातोश्री येणार असल्याची माहिती आहे
- वसंत मोरे यांच्यासोबत संजय राऊत आणि शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते साजन पाचपुते हे सुद्धा मातोश्रीवर उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी येणार आहेत
- लवकरच शिवसेना ठाकरे गटात वसंत मोरे प्रवेश करण्यास इच्छुक असल्याची माहिती आहे
- त्याआधी आज उद्धव ठाकरे यांच्यासोबत वसंत मोरे मातोश्रीवर चर्चा करतील
- लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस सुद्धा आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी वसंत मोरे यांनी संजय राऊत यांची भेट घेतली होती
- मात्र काँग्रेसने महाविकास आघाडीमध्ये उमेदवार दिल्याने वसंत मोरे यांना उमेदवारी मिळू शकली नाही
- त्यामुळे वंचित बहुजन आघाडीकडून त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती
- आगामी विधानसभा निवडणुकीचा विचार करता वसंत मोरे शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करतील अशी माहिती
- 09:37 AM • 04 Jul 2024
Maharashtra News : स्थानिक नेत्यांना उमेदवारी द्या, महंत सुनील महाराजांची उद्धव ठाकरेंना विनंती
यवतमाळमधील पोहरादेवी येथील महंत सुनील महाराज यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे भेटीची वेळ मागितली आहे. 12 नेत्याच्या शिष्टमंडळासह कारंजा विधानसभा मतदारसंघात उमेदवार देण्यासाठी वेळ देण्याची मागणी केली आहे. गेल्या तीस वर्षापासून बाहेरचा आमदार असल्याने स्थानिक नेत्यांना उमेदवारी द्या अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे
- 08:42 AM • 04 Jul 2024
Maharashtra News : अंबादास दानवेंच्या निलंबनाबाबत आज विधीमंडळात होणार निर्णय!
विधानपरिषदेत शिवीगाळप्रकरणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं निलंबन करण्यात आलं आहे. विधान परिषदेतील शिवीगाळीबाबत अंबादास दानवेंनी पत्राच्या माध्यामातून दिलगिरी व्यक्त केली आहे. या पत्रानंतर आज अंबादास दानवेंच्या निलंबनाबाबत निर्णय जाहीर केला जाणार आहे.
- 08:38 AM • 04 Jul 2024
Team INdia : आली रे आली टीम इंडिया आली! भारतात होणार जंगी स्वागत
टीम इंडियाने टी 20 वर्ल्ड कप 2024 अंतिम फेरीत 29 जून रोजी बारबाडोसमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव करुन 17 वर्षांनंतर आयसीसी टी 20 वर्ल्ड कप जिंकला. मात्र त्यानंतर काही दिवस नैसर्गिक स्थितीमुळे भारतीय खेळाडूंना तिथेच वाट पाहावी लागली. मात्र बीसीसीआयने प्रायव्हेट जेट पाठवून टीम इंडियाच्या खेळाडूंना मायदेशी आणण्याची सोय केली. आता टीम इंडिया भारतात परतली आहे. भारतीय खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ टी 20 वर्ल्ड कप ट्रॉफीसह नवी दिल्ली विमानतळावर पोहचली आहे. बीसीसीआयने सोशल मीडियावर एक व्हीडिओ पोस्ट केला आहे. या व्हीडिओत सारे खेळाडू एकएक करुन वर्ल्ड कप ट्रॉफी पाहत आहेत.
- 08:32 AM • 04 Jul 2024
Maharashtra News : पिंपरी चिंचवडवमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का!
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पिंपरी-चिंचवडचे विधानसभा अध्यक्ष आणि माजी शहर युवक अध्यक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तसेच माजी शहर युवक शहराध्यक्ष विशाल वाकडकर आणि पिंपरी-चिंचवड विधानसभा अध्यक्ष विशाल काळभोर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात कार्यकर्त्यांसह प्रवेश केला. मुंबईत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT