Maharshtra Breaking News : 'ओबीसी समाजाला धक्का न लावता मराठा आरक्षण देणार', मुख्यमंत्र्यांचे अश्वासन
मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी आपली भूमिका कायम ठेवली आहे. सलग आठव्या दिवशी ते उपोषणाच्या निर्णयावर कायम आहेत. याशिवाय महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी मुंबई Tak लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
ADVERTISEMENT
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज आठवा दिवस आहे. राज्य सरकार जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत उपोषण कायम राहणार अशी ठाम आणि आग्रही भूमिका जरांगेंनी घेतली आहे. दरम्यान, काल जरांगेंची प्रकृती बिघडली होती. अखेर कोर्टाच्या आदेशानंतर जरांगेंनी डॉक्टरांकडून उपचार घेण्यास सुरुवात केली आहे.
ADVERTISEMENT
मराठा आरक्षणासंदर्भात 20 फेब्रुवारी रोजी विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. यावेळी राज्य सरकार आरक्षणासंदर्भातील कायदा पारित करणार का? याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
ADVERTISEMENT
- 09:05 PM • 17 Feb 2024
'ओबीसी समाजाला धक्का न लावता मराठा आरक्षण देणार', मुख्यमंत्र्यांचे अश्वासन
कोल्हापूरसाठी निधी कमी पडू देणार नाही. हा मी शब्द देतो असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. यावेळी त्यांनी मराठा आरक्षण देण्यासाठी कायद्याच्या चौकटीत बसणारं, टिकणारं, मराठा आरक्षण हे सरकार देणार, विशेष अधिवेशन बोलवले आहे. त्यामुळे कोणालाही व ओबीसी समाजाला धक्का न लावता मराठा आरक्षण देणार असल्याचा शब्दही एकनाथ शिंदे यांनी दिला.
- 09:01 PM • 17 Feb 2024
'कार्यालयाबाहेर मराठा बाणा, आणि आतामध्ये घालीन लोटांगण', एकनाथ शिंदे
जेव्हा ठाकरे कुटुंबावर कोणताही प्रसंग येतो तेव्हा ते काहीही करायला तयार होतात. दिल्लीला गेल्यानंतर अमित शाह यांच्या कार्यालयाबाहेर उद्धव ठाकरे यांनी मराठी बाणा दाखवला आणि आतामध्ये घालीन लोटांगण केल्याचा घणाघातही त्यांनी केला.
- 08:51 PM • 17 Feb 2024
'ज्या मातोश्रीतून डरकाळ्या ऐकू यायच्या तिथून आता रडगाणे ऐकू येतात', एकनाथ शिंदे
ज्यांनी वैचारिक व्याभिचार केला त्यांना घरी बसवलं असल्याचा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केला. बाळासाहेबांचा वारसा सांगायला मनगटात जोर असावा लागतो असंही त्यांनी ठणकावून सांगितले. खुर्चीसाठी तुम्ही सगळं सोडून दिलं. बाळासाहेब ठाकरे असताना मातोश्री हे मंदिर होते मात्र आता मातोश्रीतून आता रडगाणे ऐकू येत असल्याची टीकाही त्यांनी केली.
- 08:42 PM • 17 Feb 2024
'शिवसेना आता कुणाची हे सांगण्याची गरज नाही', मुख्यमंत्री शिंदेंचा पुन्हा ठाकरेंवर निशाणा
शिवसेनेचे महाअधिवेशन पार पडत असतानाच एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, आता शिवसेना कोणाची आहे हे सांगायची गरज नाही. कारण कोल्हापूर जनतेच्या आणि शहर भगवेमय झाल्यामुळे आता शिवसेना कोणाची हे सांगण्याची आता गरज नसल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
- 08:12 PM • 17 Feb 2024
वारकऱ्याचा सेवा करणारा एकमेव मुख्यमंत्री शिंदे- शहाजी बापू पाटील
राज्याचे अनेक मुख्यमंत्री आले आणि गेले मात्र पंढरपुरमध्ये येणाऱ्या वारकऱ्यांच्या सेवा करणारे एकमेव मुख्यमंत्री आज झाले ते म्हणजे एकनाथ शिंदे असल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी सांगिते. यावेळी त्यांनी वारकऱ्यांना विम्याचे कवच देणारे फक्त एकनाथ शिंदेच आहेत असंही त्यांनी यावेळी सांगितले.
- 06:18 PM • 17 Feb 2024
कवी गुलजार यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर, संस्कृत भाषेचे अभ्यासक रामभद्राचार्य यांचाही गौरव
कवी गुलजार आणि चित्रपट निर्माते, गुलजार यांची ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला असून त्यांच्याबरोबरच संस्कृत भाषेचे अभ्यासक जगद्गुरू रामभद्राचार्य यांचीसुद्धा ज्ञानपीठ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
- 04:33 PM • 17 Feb 2024
'एक चेहरे पे, कही चेहरे लगा लेते लोग', मुख्यमंत्री शिंदेंची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या महाअधिवेशनातून टीका करताना,
'एक चेहरे पे, कही चेहरे लगा लेते लोग' म्हणत त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. यावेळी त्यांनी युतीवरही मोठं वक्तव्य केले. यावेळी ते म्हणाले की, 'शिवसेना आणि भाजप युती म्हणून तुम्हाला निवडून दिलं मात्र शिवसेनेने 2019 ला लग्न एका बरोबर केलं आणि संसार एका बरोबर केला असा घणाघातही शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर केला. - 03:23 PM • 17 Feb 2024
'उद्धव ठाकरेंनी मनोहर जोशींचे घर पेटवायला माणसं पाठवली', मुख्यमंत्र्यांचा गौप्यस्फोट
कोल्हापूरात सुरु असलेल्या शिवसेनेच्या महाअधिवेशनातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. आजच्या भाषणातून बोलताना त्यांनी मनोहर जोशी यांची आठवण सांगत. उद्धव ठाकरे यांनी त्यांचे घर पेटवायला माणसं पाठवली होती असा मोठा गौप्यस्फोट केला. एकनाथ शिंदे यांनी यावेळी त्यांना स्टेजवरूनही खाली उतरवण्यात आलं होतं असंही एकनाथ शिंदे यांनी सांगून त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
- 01:10 PM • 17 Feb 2024
Manoj jarange: मराठ्यांचा ज्वलंत प्रश्न आहे त्यामुळे सरकार निवडणुका घेणार नाहीत: मनोज जरांगे
Maratha Reservation: १०वी १२वीची परीक्षा सुरू आहे. त्यामुळे शांततेत आंदोलन करावं, कुठल्या विद्यार्थ्यांची गैरसोय नाही झाली पाहिजे, विद्यार्थी केंद्रापर्यंत गेले पाहिजेत याची काळजी मराठा समाजाने घ्यायची आहे
20 - 21 नंतर मुंबईला जायचं की नाही याचा निर्णय घेऊयात
शिवजयंती धूमधडाक्यात साजरी करा. २०-२१ पर्यंत सरकार काय करतंय हे पाहुयात आणि त्यानंतर मुंबईला जायचं की नाही याचा निर्णय घेऊ.
शांततेत आंदोलन करायचं आहे. आंदोलन करताना काळजी घ्यायची आहे. आपल्यात घुसून कोणी जाळपोळ करतंय का यावर लक्ष ठेवावं.
तेच शिष्टमंडळ, तेच आश्वासन दिलं जातंय. ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांच्यासाठी सगेसोयरे यांचा कायदा आहे, त्याची अंमलबावणी करावी.
सगेसोयरेची अंमबजावणी करा, आम्ही दिलेल्या व्याखेसह अंमलबजाणी करा, हैद्राबाद गॅझेट स्वीकारा.. ज्यांना वेगळं आरक्षण हवंय त्यांनी मागासवर्ग आयोगाच्या अहवालानंतर मिळणार आरक्षण घ्यावं, आम्हाला ओबीसीमधून आरक्षण हवंय.
७५ वर्षात मराठांच्या बाजूने न्याय झाला नाही. सगेसोयरे यांची अंमलबजावणी करावीच लागेल. मला जायचंय शिवजयंतीला, मला उपोषण करत जाऊ दिलं जयंती साजरी करायला तर मी जाईन.. ॲम्ब्युलन्समधून मी शिवजयंती साजरी करायला जाईल. पण मी प्रशासनाला विचारून मी जाईन..
मराठ्यांचा प्रश्न असताना ते निवडणूक घेणार नाहीत. मराठ्यांचा ज्वलंत प्रश्न आहे. त्यामुळे सरकार निवडणुका घेणार नाहीत
- 11:49 AM • 17 Feb 2024
Ajit Pawar: अदृश्य शक्तीच्या आशीर्वादाने पक्ष, चिन्ह मिळाले त्यानुसार अजित दादांनी काम करावे: अनिल देशमुख
Marathi News LIVE Updates: अजितदादांनी बारामतीला जे भाषण दिले आणि जो उल्लेख केला, अदृश्य शक्तीच्या आशीर्वादाने पक्ष, चिन्ह मिळाले त्यानुसार अजित दादांनी काम करावे. अजित दादा पवार साहेबांविषयी का बोलतात, ज्यांनी मोठं-मोठी पदं दिली, अजितदादांना आता पक्ष मिळाला आहे त्यांनी काम करावे, पवार साहेबांविषयी बोलणे टाळावे.
सुप्रिया सुळे या मतदार संघात उत्कृष्ट काम करत आहे, दादांनी सुप्रियाबाबतही बोलणं टाळावे
सुप्रिया ताई बारामती लोकसभा लढणार, जनतेला समजते कोणाला मतदान करावे, सुप्रिया ताईंचा मतदारसंघात चांगला संपर्क आहे. संपूर्ण पवार कुटुंबाचे पवार साहेब प्रमुख आहेत. जे वक्तव्य अजितदादांचे येतात ते जनतेला आवडत नाही. जर पवार साहेबांच्या विरुद्ध चुकीचे आरोप केल्यास ते आवडत नाही. जितेंद्र आव्हाड हे योग्य बोलले.
2013 मध्ये फडणवीस विरोधी पक्षनेते असताना बारामतीमधे धनगर समाजाचे आंदोलन झाले, त्यावेळी फडणवीसांनी आरक्षण देण्याची आश्वासन दिले होते, फडणवीस मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री झाले पण धनगर समाजाला आरक्षण दिले नाही. मंत्रिमंडळच्या अनेक बैठका झाल्या पण निर्णय घेतला नाही.
- 10:54 AM • 17 Feb 2024
Marathi News LIVE Updates: मनोज जरांगेची पत्रकार परिषद सुरू
Maratha Reservation: ज्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत, त्यांच्यासाठी सग्यासोयरेचा कायदा आणावा.. त्यामुळे सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी पाहिजे म्हणजे पाहिजे. त्यासाठी आंदोलन उभारलं आहे. - मनोज जरांगे
- 10:18 AM • 17 Feb 2024
जरांगे पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आली चिमुकली
अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषण करत आहेत. उपोषणाचा आजचा आठवा दिवस आहे. यावेळी आंदोलन स्थळाच्या जवळ राहणारी काव्या ही जरांगे पाटलांना भेटण्यासाठी आली. जरांगे पाटील यांना सलाईन का लावली असा प्रश्न काव्याने केला. तर चिमुकलीला व्यासपीठावर पाहून जरांगे पाटील हे देखील काही क्षण तिच्यासोबत मजेत हास्य-विनोद करताना दिसले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT