Maharshtra Breaking News : 'मराठ्यांना फसवलं तर पुन्हा नव्याने लढाई उभारण'; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा!
आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सातव्या दिवशीही सुरु आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांनी औषध उपचार घेण्यास सुरुवात केली आहे. यावर सरकार कोणती भूमिका मांडणार याबाबत मुंबई तक लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊयात.
ADVERTISEMENT
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाबद्दल एकनाथ शिंदे म्हणाले, "20 फेब्रुवारीला अधिवेशन आहे. त्याच्या अगोदर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होईल. सरकार एकदम सकारात्मकपणे काम करतंय. सरकारची भूमिका स्पष्ट आहे. मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळालं पाहिजे, अशी सरकारची भूमिका आहे."
ADVERTISEMENT
"कुणबी नोंदी शोधण्याचे काम शिंदे समिती करतेय. ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या त्यांना प्रमाणपत्र देण्याचं काम सुरू केलं. त्यामुळे सरकार सकारात्मक असताना आंदोलनाची भूमिका घेणं उचित नाही. त्यामुळे त्यांनी आंदोलन मागे घेतलं पाहिजे. सरकार सकारात्मक असताना आंदोलन करायला नको होतं. दुर्दैवाने ते झालं. परंतु आता त्यांना आवाहन आहे की, सरकार सगळ्या गोष्टी करत आहे आणि त्यामुळे त्यांनी आंदोलन मागे घ्यावं", अशी विनंतीही मुख्यमंत्र्यांनी केली.
ADVERTISEMENT
- 01:27 PM • 16 Feb 2024
'मराठ्यांना फसवलं तर...; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा!
'मराठ्यांच्या लढ्यामुळेच मागासवर्ग आयोगाचा अहवाल आला. शिंदेंनी सगेसोयऱ्यांची अधिसूचनाही लक्षात ठेवावी. अधिसूचनेची अंमलबजावणी केल्यानंतरच आंदोलन थांबेल. सगेसोयरेबाबतच्या कायद्याची अंमलबजावणी करावीच लागेल. २० तारखेच्या आत निर्णय घ्या नाहीतर सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी केल्याशिवाय आम्ही कोणालाच सोडणार नाही. छगन भुजबळांना नावं ठेवण्याचंच काम आहे. ज्यांना कुणबी नको त्यांनी वेगळं आरक्षण घ्यावं. मराठ्यांना वेगळं आरक्षण म्हणजे 50% ची मर्यादा ओलांडावीच लागणार. कुणबी दाखल्यांसाठी शिंदे समितीला आणखी 1 वर्ष वाढवू द्या. सगळा मराठा हा कुणबीच आहे. आम्ही कुणबी नाही असं जे म्हणतात त्यांनी पुरावे दाबून ठेवलेत. शिंदे-फडणवीसांमध्ये गोड गैरसमज असेल तर दूर करून घ्या. मराठ्यांना फसवलं तर पुन्हा नव्याने लढाई उभारण.' मनोज जरांगेंनी सरकारला इशारा दिला.
- 12:36 PM • 16 Feb 2024
राष्ट्रीय सहकार साखर संघाच्या अध्यक्षपदी भाजप नेते हर्षवर्धन पाटील!
राष्ट्रीय सहकार साखर संघाच्या अध्यक्षपदी भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर उपाध्यक्षपदी गुजरातचे केतन भाई पटेल यांची बिनविरोध निवड झाली. पन्नास वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच साखर संघावर भाजपचं वर्चस्व प्रस्थापित झालं आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या निवडीनं महाराष्ट्रातील साखर उद्योगाला चालना मिळेल असं सांगितलं जात आहे.
- 12:19 PM • 16 Feb 2024
आमदारांना सुरक्षित करण्यासाठी शरद पवारांची सुप्रीम कोर्टात धाव
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल दिला. त्यानंतर शरद पवार यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मान्यता दिली आहे. या प्रकरणावर तातडीने सुनावणी घ्यावी, अशी मागणी शरद पवारांनी सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे.
शरद पवारांच्या वतीने अभिषेक मनू सिंघवी म्हणाले, "शरद पवार गटाला अजित पवारांकडून जारी करण्यात येणाऱ्या व्हीप म्हणजे पक्षादेशाला सामोरं जावं लागू शकतं. आम्हाला निवडणूक चिन्ह सुद्धा देण्यात आलेलं नाही", असे त्यांनी सांगितले. त्यावर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड म्हणाले की, "आम्ही हे बघू."
नार्वेकरांनी निकाल देताना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे अजित पवारांकडून काढण्यात येणाऱ्या व्हीपचे शरद पवार पवारांच्या गटातील आमदारांनाही पालन करावे लागेल. तिचं भीती शरद पवारांनी सुप्रीम कोर्टाला सांगितली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला वेगळं नाव दिलं असलं तरी चिन्ह दिलेलं नाही.
- 10:44 AM • 16 Feb 2024
'सरकार जनतेला फसवतंय'; नाना पटोलेंची टीका!
'6 दिवसांत सर्वेक्षण कसं पूर्ण केलं? कुठल्या आधारावर सर्वेक्षण करण्यात आलं? सरकार जनतेला फसवत आहे. मराठा आरक्षण देताना ओबीसींना धक्का नको. सरकारने विधीमंडळात सविस्तर चर्चा करावी. शिंदे सरकारने मराठ्यांना फसवू नये. मुख्यमंत्र्यांनी जरांगेंना काय आश्वासन दिलंय?' असं म्हणत नाना पटोलेंनी सुनावलं
- 10:37 AM • 16 Feb 2024
NCP Sharad Pawar : '"भ्रष्टाचार जोडो पार्टी' मध्ये आजच सामील व्हा"
अशोक चव्हाण यांनी भाजपत प्रवेश केल्यानंतर विरोधकांकडून भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. आधी भ्रष्टाचाऱ्याचे आरोप करायचे आणि नंतर पक्षात सामील करून घ्यायचे, असे म्हणत विरोधक भाजपला लक्ष्य करत आहेत.
दरम्यान, आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून भाजप कात्रीत पकडलं आहे. राष्ट्रवादीने (शरद पवार) सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. यात भ्रष्टाचाराच्या प्रकरणात चौकशी सुरू असलेल्या नेत्यांचे फोटो पोस्ट केले आहेत, हे नेते सध्या भाजपमध्ये आहेत. "भ्रष्टाचाराचा एकच नारा, तुरुंगापेक्षा भाजप बरा", असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्याचबरोबर "भ्रष्टाचार जोडो पार्टी' मध्ये आजच सामील व्हा, आणि भ्रष्टाचारमुक्त व्हा..! मोफत!!! केवळ भ्रष्टाचारी नेत्यांसाठी", असे म्हणत राष्ट्रवादीने भाजपच्या वर्मावर बोट ठेवलं आहे.
- 09:41 AM • 16 Feb 2024
'कुणबी नोंदी असणाऱ्यांना मराठा आरक्षणाचा लाभ मिळणार नाही'- मुख्यमंत्री शिंदे
'कुणबी नोदी असणाऱ्यांना मराठा आरक्षणाचा लाभ मिळणार नाही. ज्या मराठा समाजाच्या कुणबी नोंदी नाहीत त्यांना वेगळे आरक्षण देण्यासाठी सरकार निर्णय घेणार. मराठा समाजाला देण्यात येणारे आरक्षण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता देण्यात येणार आहे,' असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
- 09:32 AM • 16 Feb 2024
शिंदे गटाचे कोल्हापुरात आजपासून दोन दिवसीय महाअधिवेशन
शिवसेना शिंदे गटाचे कोल्हापुरात आजपासून दोन दिवसीय महाअधिवेशन होणार आहे. कोल्हापुरात अधिवेशनाची तयारी पूर्ण झाली आहे. अधिवेशन परिसरात बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कटाऊत लागले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज व उद्या असे दिवस कोल्हापूर दौऱ्यावर असतील. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेचे (शिंदे गट) पहिलेच राष्ट्रीय महाअधिवेशन होत आहे. यासाठी मंत्री व नेतेही उपस्थित राहणार आहेत. शहरात ठिकठिकाणी सुमारे 40 स्वागत कमानी, 100 होर्डिंग्ज, 700 फलक उभारले आहेत. चौका-चौकात भगवे झेंडे लावून वातावरण निर्मिती करण्यात आली आहे
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT