Maharashtra Breaking News Live : जरांगे CM शिंदेंना स्पष्टच बोलले, 'मराठा समाजाची नाराजी परवडणारी...'
दहीसरमध्ये ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. आठवड्याभरात मुंबईत दोन गोळीबाराच्या घटना घडल्यामुळे राजकीय वर्तुळासह सामान्य जनतेत खळबळ उडाली आहे. यासंबंधित अपडेट्स आणि राज्यातील इतर घडामोडींचा आढावा घेण्यासाठी मुंबई तकचा हा लाईव्ह ब्लॉग नक्की वाचा.
ADVERTISEMENT
Marathi News LIVE Updates : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गुरूवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मॉरिस नोरोन्हा नावाच्या व्यक्तीने ही हत्या केली. अभिषेक यांच्या हत्येनंतर मॉरिसनेही स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली. आता या प्रकरणी मुंबई पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. मेहुल पारेख आणि रोहित साहू अशी या दोघांची नावं आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ज्यावेळी अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस हे फेसबुकवर लाईव्ह होते त्यावेळी मेहुल पारेख देखील घटनास्थळी उपस्थित असल्याचे बोलले जात आहे. त्याच्या चौकशीतून अनेक गोष्टींचा खुलासा होण्याची देखील शक्यता आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
- 08:42 PM • 09 Feb 2024
जरांगे CM शिंदेंना स्पष्टच बोलले, 'मराठा समाजाची नाराजी परवडणारी...'
मनोज जरांगे पाटील आज बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शुभेच्छा कोणालाही देतो शत्रू असला तरी आणि मित्र असला तरी, त्यामुळे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आहेत. आरक्षणाचं संरक्षण करावं ते त्यांना करावंच लागणार आहे. त्यांच्या हाताने ज्यावेळेस अध्यादेश स्वीकारला त्यावेळेसच त्यांना सांगितलं होतं, गुलालाचा अपमान होऊ देऊ नका. मराठा समुदाय हा खूप मोठा आहे. त्याची नाराजी कुठल्याच सरकारला परवडणारी नाही. कारण आता मराठा पूर्वीचा राहिलेला नाही असं म्हणत शिंदेंना शुभेच्छा देत पाटील यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे.
- 01:51 PM • 09 Feb 2024
अभिषेक घोसाळकरांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी नेते दाखल
ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची काल (गुरूवारी) दहिसर परिसरात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्यांच्या कुटुंबियांना भेट देण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दाखल झाले आहेत. यासह राजकीय वर्तुळातील अनेक नेतेही याठिकाणी दाखल झाले आहेत.
- 01:47 PM • 09 Feb 2024
मॉरिसचं पार्थिव चर्च परिसरात दफन करण्यास विरोध
अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर मॉरिस नोरोन्हाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. आता त्याचं पार्थिव चर्चच्या परिसरात दफन करण्यास IC कॉलनीतील स्थानिकांनी विरोध केला आहे.
- 01:08 PM • 09 Feb 2024
संभाजीनगर येथे मविआ आणि महायुतीचे कार्यकर्ते आमनेसामने
भाजपकडून राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींविरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध केला जात आहे. तर विरोधी पक्षांचे कार्यकर्ते राज्यात सुरु असलेल्या गोळीबाराच्या घटनांविरोधात आक्रमक झाले आहेत. यादरम्यान छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकात महाविकास आघाडी आणि महायुतीचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याने तणाव निर्माण झाल्याचे पाहायला मिळालं. यावेळी दोन्ही गटांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
- 01:06 PM • 09 Feb 2024
मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला
मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला दाखल झाले आहेत. शिंदेंच्या ठाण्यातील घरी दोघांची भेट होत आहे. अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येप्रकरणी दोघांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे.
- 11:25 AM • 09 Feb 2024
अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणाची गृह मंत्र्यांनी पोलिसांकडून घेतली माहिती
अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणाची गृह मंत्र्यांनी पोलिसांकडून माहिती घेतली आहे. नेमकं प्रकरण कोणत्या वादातून घडलं याची माहिती घेतली घेतली असल्याची माहिती आहे. रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशीही देवेंद्र फडणवीस यांनी गोळीबार प्रकरणी चर्चा केल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्यात वर्षा निवासस्थानी जवळपास अर्धा तास चर्चा झाल्याचीही माहिती आहे. आठवड्याभरात दुसरे गोळीबार प्रकरण समोर आल्याने विरोधकांकडून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.
- 11:08 AM • 09 Feb 2024
Marathi News Live Updates : 'CM शिंदेंना काढा, सरकार बरखास्त करा अन्...'; संजय राऊतांना संताप अनावर
"हे अपयश सगळ्यात आधी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचं आहे. त्यांनी अशा प्रकारचं माफिया राज महाराष्ट्रावर लादलंय. हे अपयश घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचं, गृहमंत्री फडणवीसांचं आहे. मोदी आणि शाह हे या राज्याचे गुन्हेगार आहेत. त्यांनी हे सरकार आमच्यावर लादलं आहे. या मुख्यमंत्र्यांना काढून इथे राष्ट्रपती राजवट लावली पाहिजे." असं म्हणत संजय राऊतांनी संताप व्यक्त केला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT