लाइव्ह

Maharshtra Breaking News Live : आमदार गणपत गायकवाडांच्या ड्रायव्हरला पोलिसांनी केली अटक

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

काही दिवसांपूर्वी पत्रकार निखील वागळे, वकील असीम सरोदे यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. यावरुन संजय राऊत यांनी पोलीस आयुक्तांवर टीका केली. 'गुंडांची परेड काढणाऱ्या आयुक्तांनी या हल्लेखोरांची परेड का नाही घेतली,' असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

ADVERTISEMENT

 

 

ADVERTISEMENT

  • 05:30 PM • 11 Feb 2024

    'निखील वागले यांच्यावर हल्ला ही दुर्दैवी घटना'; शरद पवारांचं वक्तव्य!

    'पुण्यात एका व्यक्तीवर हल्ला केला. गाडीवर हल्ला केला. गाडी फोडण्यात आली याचा अर्थ असा की आजचे राज्यकर्ते झुंडशाहीच्या मार्गाने जाऊ इच्छितात. ही लोकांना पटणारी नाही. महाराष्ट्रात या प्रवृत्तीला योग्य वेळी योग्य जागा दिल्याशिवाय राहणार नाही. अत्यंत चिंताजनक स्थिती आहे. ज्या पक्षाने हे उद्योग केले याची दखल राज्य आणि केंद्राने घ्यायला हवी होती ती घेतली नाही ही दुर्दैवी घटना आहे.' असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं.

  • 05:27 PM • 11 Feb 2024

    शिवजयंतीनिमित्त राज्यात साजरा होणार 'स्वराज्य सप्ताह'!

    यावर्षी शिवजयंतीनिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामध्ये नागरिकांनी उत्साहाने सहभागी व्हावं असं आवाहन अजित पवारांनी केलं. 'स्वराज्य सप्ताह' असं नाव या कार्यक्रमाला दिलं असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

  • 05:09 PM • 11 Feb 2024

    आमदार गणपत गायकवाडांच्या ड्रायव्हरला पोलिसांनी घेतलं ताब्यात

    ठाणे गुन्हे शाखा पथकाने आमदार गणपत गायकवाड यांचा ड्रायव्हर रंजीत यादव याला नगरवरून ताब्यात घेतले. आज सकाळी उल्हासनगर चोपडा न्यायालयात त्याला हजर केले आहे. न्यायालयाने त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. रंजीत यादव हा 15 ते 20 वर्षापासून गणपत गायकवाड यांचा वाहन चालक आहे.

     

  • 05:08 PM • 11 Feb 2024

    मनसेकडून लोकसभेची तयारी सुरु

    मनसे 21 लोकसभा मतदारसंघातील मतदारांची माहिती गोळा करणार आहे. राजदूत यांच्याकडून ही माहिती घेऊन ऍपवर भरली जाणार आहे. २० तारखेपर्यंत पहिला टप्पा पूर्ण करा असे आदेश मनसेच्या वरिष्ठ स्तरावरून देण्यात आले आहेत. या ऍपच्या माध्यमातून मतदारांच्या भावना मनसे जाणून घेणार आहे.

  • ADVERTISEMENT

  • 01:48 PM • 11 Feb 2024

    अकोला येथील जिल्हा परिषद उर्दू माध्यमिक विद्यालयाच्या छतावर 4 मृत नवजात अर्भक आढळल्याने खळबळ

    अकोला येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या छतावर 4 नवजात अर्भकांचा मृतदेह आढळून आल्याचे वृत्त समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले, मात्र पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या एकच नवजात अर्भक दिसत आहे. बाकीचे मासाचे गोळे असण्याची शक्यता आहे. परंतु वैद्यकीय अधिकारी सांगेपर्यंत याची पुष्टी करता येणार नाही, मात्र या घटनेने संपूर्ण शहर आणि जिल्ह्यातील सर्वांनाच हादरवून सोडले आहे कारण ज्या ठिकाणी नवजात बालकांचे अवशेष होते तेथून महिला जिल्हा रुग्णालय फक्त 500 किंवा 1000 यार्ड अंतरावर आहे. पोलिसांनी या प्रकरणी पंचनामा करून सर्व नवजात बालकांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी वैद्यकीय महाविद्यालयात पाठवले असून याप्रकरणी गुन्हा दाखल करून ही घटना कोणी घडवली याचा तपास सुरू केला आहे.

  • 12:53 PM • 11 Feb 2024

    विदर्भात वादळी वाऱ्यासह गारपीटीचा इशारा!

    आज (11 फेब्रुवारी) lMD मॉडेलच्या मार्गदर्शनानुसार, पुढील 24 तासांत विदर्भाच्या काही भागांत आणि आजूबाजूला विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा, पाऊस, हलक्या ते मध्यम गडगडाटाची शक्यता आहे. त्याचा अधिक परिणाम पूर्व विदर्भावर होऊ शकतो. अशी माहिती पुण्या भारतीय हवामान विभागाचे प्रमुख् के एस होसाळीकर यांनी सोशल मीडियावर दिली आहे.

  • ADVERTISEMENT

  • 11:51 AM • 11 Feb 2024

    शरद पवार गटाचा पुण्यात आज मेळावा

    शरद पवार गटाचा पुण्यात थोड्याच वेळात मेळावा सुरु होत आहे.शरदचंद्र पवार संजीवनी आरोग्य मित्र प्रदेश डॉक्टर सेलचा कार्यक्रम आहे. शरद पवार आरोग्यदूत अभियानाची सुरुवात शरद पवारांच्या उपस्थितीत होणार आहे.आमदार रोहित पवारही कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
     

follow whatsapp

ADVERTISEMENT