MOTN: आज जर निवडणुका झाल्या तर काय आहे महाराष्ट्राचा मूड, महायुतीसाठी धोक्याची घंटा?
Mood of the Nation: जर आज महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या तर महाराष्ट्रातील जनतेचा कसा मूड असेल हे जाणून घ्या सविस्तर पणे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
मूड ऑफ द नेशन: देशातील जनतेचा मूड
महाराष्ट्रातील जनतेचा कसा आहे नेमका कल
महायुतीसाठी धोक्याची घंटा, सर्व्हेत नेमका कौल कोणाला?
Mood of the Nation Maharashtra: मुंबई: देशात नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि पुन्हा एकदा मोदी सरकार केंद्रात सत्तेत आलं. मात्र, आता यापुढे अनेक महत्त्वाच्या राज्यांमधील विधानसभा निवडणुका येऊ घातल्या आहेत. अशावेळी देशातील जनतेचा नेमका मूड कसा आहे? हेच आज तकने आपल्या मूड ऑफ द नेशन (Mood of the Nation) या सर्व्हेतून जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यामध्ये आज घडीला जर लोकसभा निवडणुका घेण्यात आल्या तर महाराष्ट्रातील जनता नेमका कोणाला कौल देणार हे याबाबत अंदाज वर्तवण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
मूड ऑफ द नेशन सर्व्हेत जो अंदाज वर्तवण्यात आला आहे त्यामध्ये अंशत: फायदा हा महायुतीला होताना दिसतोय. पण विधानसभा निवडणुकीचा विचार केल्यास जर अशाच पद्धतीचा कल राहिल्यास महायुतीची डोकेदुखी वाढू शकते. हा सर्व्हे 15 जुलै ते 10 ऑगस्ट या काळात करण्यात आला होता. ज्याचा सॅम्पल साइज हा 1 लाख 36 हजार 463 एवढा आहे.
मूड ऑफ द नेशन: लोकसभेसाठी व्होट शेअर कसा बदलत गेला
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती. भाजपने 400 पारचा नारा दिला होता. मात्र, या निवडणुकीत महाराष्ट्राने महायुतीऐवजी महाविकास आघाडीच्या पारड्यात वजन टाकलं होतं. आता तीन महिन्यानंतरही परिस्थिती फारशी बदलेली नाही. किंबहुना जर आता निवडणुका झाल्या तर भाजप प्रणित महायुतीला अधिक मोठा फटका बसू शकतो. कारण लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीच्या मतांची टक्केवारी ही 43.55 टक्के होती. पण आज घडीला जर मतदान झालं तर महायुतीच्या टक्केवारी साधारण दीड टक्क्याने घसरण होत असल्याचं दिसतं आहे.
हे वाचलं का?
दुसरीकडे महाविकास आघाडीला फायदा होत असल्याचं दिसतं आहे. एप्रिल-मे महिन्यात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या मतांची टक्केवारी ही 43.71 टक्के एवढी होती. पण जर आज घडीला महाराष्ट्रात लोकसभेची निवडणूक झाली तर महाविकास आघाडीच्या मतांची टक्केवारी वाढून 44 टक्के एवढी होत असल्याचं सर्व्हेत पाहायला मिळत आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
आज लोकसभा झाल्यास महाराष्ट्रात कोणाला किती जागा मिळू शकतात?
जर आज महाराष्ट्रात लोकसभा निवडणुका झाल्या तर पुन्हा एकदा त्यात महाविकास आघाडीचीच सरशी होत असल्याचं दिसून येत आहे. ज्यामध्ये सर्वाधिक फायदा हा काँग्रेसचा होऊ शकतो. कारण त्यांच्या जागांमध्ये वाढ होऊ शकते. तर दुसरीकडे भाजपच्या जागा देखील वाढत असल्याचं सर्व्हेमध्ये दिसतंय.
दुसरीकडे राज्यातील चारही प्रादेशिक पक्षांना मात्र काही प्रमाणात फटका बसत असल्याचं दिसतं आहे. पण असं असलं तरी आज जरी निवडणुका झाल्या तर महाविकास आघाडीचीच राज्यात सरशी होत असल्याचं दिसून येत आहे.
सर्व्हेनुसार राज्यात आज लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर सर्वाधिक जागा या काँग्रेसला मिळू शकतात. त्यांना राज्यात एकूण 16 जागा मिळतील. तर भाजपला 12 जागा मिळतील. तर शिवसेना (UBT) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) हे दोन्ही पक्ष 14 जागा जिंकू शकतात.
तर महायुतीतील शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या दोन्ही पक्षांना मिळून अवघ्या 6 जागांवरच विजय मिळू शकतो. असा अंदाज सर्व्हेत वर्तवण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT