रोहित पवारांवर ED ची वक्रदृष्टी! बारामती अ‍ॅग्रो कंपनीशी संबंधित ठिकाणांवर धाडी

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbai ED Raid on Baramati Agro Company of NCP MLA Rohit Pawar
Mumbai ED Raid on Baramati Agro Company of NCP MLA Rohit Pawar
social share
google news

Baramati Agro Company ED Raid : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे नातू आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या बारामती अ‍ॅग्रो (Baramati Agro Company) या कंपनीवर ईडीने छापा टाकला आहे. आज (5 जानेवारी) सकाळी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) चार जणांच्या पथकांनी बारामती अ‍ॅग्रोच्या आवारात पोहोचून तपास केला. (Mumbai ED Raid on Baramati Agro Company of NCP MLA Rohit Pawar)

ADVERTISEMENT

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्यासंदर्भात बारामती अ‍ॅग्रोच्या आवारात ही तपासणी करण्यात आली असून त्यात मनी लाँड्रिंगचाही आरोप असल्याचे म्हणणे आहे. बारामती अ‍ॅग्रोविरुद्धची ही तपासणी पुणे, बारामती, औरंगाबाद आणि अमरावतीसह एकूण सहा ठिकाणी करण्यात आली आहे. एवढंच नाही तर तपासादरम्यान बारामती येथील कंपनीचा परिसर कव्हर करण्यात आला होता.

वाचा: Sunil Kamble: अजितदादांच्या कार्यक्रमात भाजप आमदाराने पोलिसाच्या थोबाडीत मारली, नेमकं काय घडलं?

रोहित पवार यांच्याविरूद्ध ईडीची ही चौकशी अशा वेळी सुरू आहे जेव्हा त्यांचे काका अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत. 2019 मध्ये मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने नोंदवलेल्या गुन्ह्यात हा तपास करण्यात आला आहे. तसंच, गेल्या वर्षी 22 ऑगस्ट रोजी मुंबई उच्च न्यायालयाने राज्यातील सहकार क्षेत्रातील साखर कारखान्यांची विक्री कशा पद्धतीने केली, याची चौकशी करावी, असे आदेश दिले होते. न्यायालयाने सुनावणीदरम्यान विक्री किंमतीवरही भाष्य केले. ते कवडीमोल भावाने का विकले, असा सवाल न्यायालयात उपस्थित करण्यात आला होता.

हे वाचलं का?

ईडीच्या छापेमारीनंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया काय?

या घटनेनंतर रोहित पवार यांनी ट्विट करत लिहिलं की, ‘हा आहे स्वाभिमानी महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांचा चेहरा… ज्यांनी पिढ्यान् पिढ्या #महाराष्ट्र_धर्म जपला आणि वाढवला… अन्यायाविरोधात प्रसंगी संघर्ष करण्याची शिकवणही या महान विभूतींनी दिल्याने महाराष्ट्र भूमीला संघर्षाचाही प्रदीर्घ इतिहास आहे. म्हणून मराठी माणूस या नात्याने महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी आणि टिकवण्यासाठी प्रत्येकाला संघर्षाचीही तयारी ठेवावी लागेल.’

वाचा: Sharad Mohol : कुख्यात गँगस्टर शरद मोहोळवर गोळीबार, पुणे हादरलं!

किरीट सोमय्यांचे यंत्रणांना कठोर चौकशी करण्याचे आवाहन

भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले की, ‘मी पुन्हा एकदा सर्व तपास यंत्रणांना विनंती करतो की, रोहित पवार आणि बारामती अॅग्रोविरुद्धचा तपास जलद गतीने करावा. शेकडो कोटींचा कन्नड सहकारी साखर कारखाना बारामती अॅग्रोने 50 कोटींना ताब्यात घेतला.

ADVERTISEMENT

वाचा: CM Shinde: ‘मी पुढचे 8 महिने…’, मुख्यमंत्री पदाबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान

बारामती अॅग्रोने बँकेकडून मोठ्या प्रमाणावर कर्ज घेतले होते. खरं तर, 2019 मध्ये, मुंबई पोलिसांनी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (MSCB) घोटाळ्यात अजित पवार आणि इतर 70 विरुद्ध एफआयआर नोंदवला होता, परंतु महानगर दंडाधिकारी न्यायालयात क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता. 23 सप्टेंबर 2019 रोजी पोलिसांनी 5,000 कोटी रुपयांच्या घोटाळ्यात शरद पवार आणि अजित पवार यांची नावे घेतली होती. मुंबई पोलिसांनी पुराव्याअभावी खटला बंद केला होता.’

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT