मुंबईचं महापौर पद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव, भाजपच्या गोटातून 'या' नगरसेविकेचं नाव सर्वात आघाडीवर
Mumbai mayoral post is reserved for a woman from the general category : मुंबईचं महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीला काठावरचं बहुमत मिळालंय. मात्र, महापौर भाजपचा होणार की शिंदेंच्या शिवसेनेचा? याबाबत अजून स्पष्टता आलेली नाही. मुंबईचा महापौर ठरवण्यासाठी महायुतीच्या नेत्यांच्या दिल्लीत बैठका सुरु आहेत. दरम्यान, महापौर भाजपचा झाल्यास कोणाची वर्णी लागण्याची शक्यता आहे? जाणून घेऊयात..
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मुंबईचं महापौर पद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव,
भाजपच्या गोटातून 'या' नगरसेविकेचं नाव सर्वात आघाडीवर
Mumbai mayoral post is reserved for a woman from the general category : राज्यातील 29 महानगरपालिकेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या होत्या. दरम्यान, आज सर्व 29 महानगरपालिकांच्या महापौर पदासाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या आरक्षण सोडतीची माहिती देखील समोर आली आहे. मुंबईचं महापौरपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव करण्यात आलंय. दरम्यान, आता मुंबई महापालिकेच्या महापौरपदी कोणती महिला विराजमान होणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे.
मुंबईचं महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीला काठावरचं बहुमत मिळालंय. मात्र, महापौर भाजपचा होणार की शिंदेंच्या शिवसेनेचा? याबाबत अजून स्पष्टता आलेली नाही. मुंबईचा महापौर ठरवण्यासाठी महायुतीच्या नेत्यांच्या दिल्लीत बैठका सुरु आहेत. दरम्यान, महापौर भाजपचा झाल्यास कोणाची वर्णी लागण्याची शक्यता आहे? जाणून घेऊयात..
मुंबईच्या महापौरपदासाठी कोणत्या नगरसेविकेचं नाव चर्चेत?
मुंबईचं महापौरपदासाठी आता सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाल्याचं समोर आलंय. मात्र, हे पद जर सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी जाहीर झाल्यास भाजपकडून प्रभाकर शिंदे हे प्रमुख दावेदार मानले जात होते. अनुसूचित जाती (SC) प्रवर्गासाठी राखीव झालं असतं तर आशाताई मराठे यांचे नाव आघाडीवर होतं. मात्र, आता सर्वसाधारण महिलेसाठी मुंबईचं महापौर पद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झालं असून भाजपच्या नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांचं नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. तेजस्वी घोसाळकर मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 2 मधून निवडून आल्या आहेत. त्यांनी ठाकरे गटाच्या धनश्री कोलगे आणि काँग्रेसच्या मेनका गिरीश सिंह यांचा पराभव केलाय. याशिवाय रितू तावडे, शितल गंभीर या दोन महिला नगरसेविकांचं नाव देखील महापौरपदासाठी चर्चेत आहे.










