NCP Mla Disqualification Verdict Live : नार्वेकरांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना अपात्र का केलं नाही?
Ncp mla disqualification case : राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरण निकाल... अजित पवार की शरद पवार... कोण जिंकलं?
ADVERTISEMENT
NCP Mla Disqualification Verdict Latest live Update : राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणासंदर्भातील महत्त्वाचा निकाल गुरुवारी (15 फेब्रुवारी) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला. निकाल पाहण्यासाठी खालील व्हिडीओवर क्लिक करा, तसेच यासंदर्भातील सर्व अपडेट खाली वाचा...
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
- 09:22 PM • 15 Feb 2024
'शरद पवार गटाने आमच्या गटात सामील व्हावे', मंत्री धर्मरावबाबा आत्राम
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अजित पवार गट मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा निर्णय दिल्याच्या निर्णयानंतर राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी प्रतिक्रिया देत शरद पवार गटाने आमच्यामध्ये सामील व्हावे आणि शरद पवार यांनी मार्गदर्शकाची भूमिका बजावावी असं मत त्यांनी व्यक्त केले आहे. काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या आमदारांना आपल्या गटात घेण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मात्र शरद पवार गटात उरलेल्या 8 ते 10 आमदारांनी आमच्या गटात सामील होऊन राज्याच्या विकासासाठी पुढाकार घेतला पाहिजे त्याचबरोबर शरद पवारांचेही आम्हाला मार्गदर्शन लाभेल असं मतही त्यांनी व्यक्त केले.
- 08:25 PM • 15 Feb 2024
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर जरांगे पाटील उपचार घेण्यास तयार
मुंबई उच्च न्यायालयात जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविरोधात सुनावणी पार पडली. त्यांच्या त्या आदेशानंतर मनोज जरांगे पाटील उपचार घेण्यास तयार झाले आहेत. त्यांना सलाईन लावून उपचार सुरु करण्यात आले आहेत. जरांगे पाटील यांच्यावर जालन्यातून आलेल्या डॉक्टरांच्या पथकाकडून त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहे.
- 06:20 PM • 15 Feb 2024
नार्वेकरांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना अपात्र का केलं नाही?
राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला. शरद पवार गटाने दाखल केलेल्या याचिका नार्वेकरांनी फेटाळून लावल्या. त्याचबरोबर अजित पवार गटाने केलेल्या याचिकाही नार्वेकरांनी फेटाळल्याने शरद पवार गटाचे आमदार अपात्रतेच्या कारवाईतून वाचले.
नार्वेकर म्हणाले...
"अलिकडे वेगवेगळ्या पक्षांसोबत युती आणि आघाडी होतं असते, अशा प्रत्येक घटनेसाठी दहाव्या अनुसूचीचा वापर करता येत नाही. अजित पवार आणि शरद पवार या दोन गटात पक्षांतर्गत वाद आहे. त्यामुळे दहाव्या अनुसूचीनुसार कारवाई करू शकत नाही."
"10व्या अनुसूचीचा वापर पक्षातील बहुमताला धमाकावण्यासाठी करता येणार नाही. त्याचा चुकीचा वापर करता येणार नाही", असंही नार्वेकर यांनी निकाल देताना म्हटलं.
नार्वेकरांनी दिलेल्या निकालाने शिवसेना प्रकरणाच्या निकालाची आठवण सगळ्यांना झाली. राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणातही असाच निकाल दिला होता. नार्वेकर यांच्याकडून असाच निर्णय अपेक्षित होता, अशी प्रतिक्रिया शरद पवार गटातून उमटली आहे.
- 06:16 PM • 15 Feb 2024
“राष्ट्रवादी पक्ष ज्यांनी पळवला हे आज...”; आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अजित पवार यांचाच राष्ट्रवादी पक्ष असल्याचा निर्णय दिला. या निर्णयानंतर आता राजकीय वर्तुळातून टीका-प्रतिक्रिया येत आहेत. यावेळी आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'राष्ट्रवादी पक्ष ज्यांनी पळवला हे आज पक्षाचे मालक असा निकाल आज अध्यक्ष यांनी दिला आहे,' असं आदित्य ठाकरे म्हणाले.
- 06:12 PM • 15 Feb 2024
शिवसेनेप्रमाणेच लागला राष्ट्रवादी काँग्रेसचा निकाल!
अजित पवारांच्या आमदारांना अपात्र करता येणार नाही कारण त्यांच्याकडे बहुमत आहे असे राहुल नार्वेकर म्हणाले. तसंच, शरद पवार गटाचे सर्व आमदारही पात्र असल्याचे त्यांनी सांगितले. पण, अजित पवार पवार गट खरा राष्ट्रवादी पक्ष असेल. असा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला.
- 06:12 PM • 15 Feb 2024
'कायद्याची पायमल्ली कशी करायची हे नार्वेकरांकडून शिका', जितेंद्र आव्हाड यांची टीका
कायद्याची पायमल्ली कशी करायची याचे उत्तम उदाहरण म्हणजे आजचा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा निकालाकडे पाहता येईल. पक्षातील वाद आणि अध्यक्ष ठरवण्याचं काम तुमच्याकडे येत नाही हे तुम्ही दीड दोन वर्षानंतर सांगत आहात तर मग इतके दिवस काय करत होता असा सवाल आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. यामुळे राज्यातील राजकारणाची पायमल्ली होत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
- 05:47 PM • 15 Feb 2024
'दोन्ही गटाचेही आमदार पात्र', राहुल नार्वेकरांचा निकाल
विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रतेवर निकाल देत विधीमंडळातील बहुमत हे अजित पवार गटाचे असून राष्ट्रवादी काँग्रेस ही अजित पवार गटाचीच असल्याचा निकाल देण्यात आला. अजित पवार गट हाच मूळ राष्ट्रवादी असल्याचे सांगत अजित पवार गटाचे आमदार पात्र असल्याचाही निकाल देण्यात आला. या निर्णयामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला असला तरी शरद पवार गटाचे आमदारही पात्र असल्याचे सांगितले. अजित पवार गट हाच मूळ राष्ट्रवादी पक्ष असल्याचेही नार्वेकर यांच्याकडून निकाल देण्यात आला आहे.
- 05:22 PM • 15 Feb 2024
शरद पवार गटाला धक्का, 'राष्ट्रवादी काँग्रेस' अजितदादांचाच
अजित पवार गटाला शरद पवार गटापेक्षा जास्त आमदरांचा पाठिंबा असल्यामुळे अजित पवार गट हा मूळ राष्ट्रवादी पक्ष असल्याचा निर्णय राहुल नार्वेकर यांनी दिला. यावेळी त्यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवारांचा असल्याचेही त्यांनी सांगितले. या निर्णयामुळे शरद पवार गटाला धक्का बसला आहे.
- 05:17 PM • 15 Feb 2024
'राष्ट्रवादीत 29 जूनपर्यंत शरद पवारांच्या नेतृत्वाबाबत कोणतेही वाद नव्हते', राहुल नार्वेकर
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही घटनेबाबत कोणतेही वाद नाहीत. मात्र राष्ट्रीय कार्यकारिणीतील पवार गटाला बहुमत स्वीकारलं जाऊ शकत नाही असंही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले. यावेळी प्रतिनिधी निवड केल्याचेही पवार गटाकडे कोणतेही पुरावे नाहीत हे ही त्यांनी स्पष्ट केले. 29 जूनपर्यंत पवारांच्या नेतृत्वाबाबत राष्ट्रवादीत कोणताही वाद नव्हता असंही निकाल देताना त्यांनी सांगितले.
- 05:10 PM • 15 Feb 2024
'राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाचा घटनेनुसार नेतृत्व निवडल्याचा दावा'- राहुल नार्वेकर
राष्ट्रवादी काँग्रेसचे 30 जून रोजी दोन गट पडल्यानंतर दोन्ही गटांनी घटनेनुसार नेतृत्व निवडल्याचा दावा केल्याचे राहुल नार्वेकर यांनी सांगितले. मात्र संख्याबळावर निर्णय देण्यात येणार असल्याचेही राहुल नार्वेकर यांनी सांगितले.
- 05:06 PM • 15 Feb 2024
'मूळ पक्ष आम्हीच असा दोन्ही गटाकडून दावा', राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल देताना सांगितले की, पक्ष घटना, नेतेपदाची रचना, विधीमंडळाच्या बहुमतावर पक्ष ठरवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांही हे ही सांगितले की, राष्ट्रवादीच्या घटनेबाबत कोणताही वाद नाही मात्र आमदारांच्या संख्याबळावरच निर्णय देण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केले. मूळ पक्ष आम्हीच असा दोन्ही गटाकडून केला गेल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
- 04:54 PM • 15 Feb 2024
'राष्ट्रवादी'च्या आमदार अपात्रता निकाल वाचनाला सुरुवात
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता निकाल वाचनाला सुरुवात झाली झाली असून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडून स्वतंत्र दोन निर्णय देण्यात येणार आहेत. एकूण 5 याचिकांवर हा निर्णय देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
- 02:49 PM • 15 Feb 2024
राज्यसभेचा उमेदवारी अर्ज अशोक चव्हाण यांनी महाराष्ट्रातून केला दाखल
भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील राज्यसभेसाठी तीन जणांना उमेदवारी जाहीर केली. यात नांदेडचे काँग्रेसमधून भाजपत दाखल झालेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि भाजपचे निष्ठावंत डॉ. अजित गोपछडे यांचा समावेश आहे. काँग्रेस सोडल्यानंतर अशोक चव्हाण यांनी महाराष्ट्रातून राज्यसभेची उमेदवारी अर्ज केला दाखल.
- 02:27 PM • 15 Feb 2024
'बैठकीला गैरहजार असलेल्या आमदारांनी...'; बाळासाहेब थोरात नेमकं काय म्हणाले?
'मविआचं जागावाटप लवकरच ठरेल. हे तर सरकार न चालवू शकणारे मुख्यमंत्री आहेत. आमचे सर्व 44 आमदार आमच्यासोबत आहेत. पुढच्या आठवड्यात मविआच्या नेत्यांची चर्चा होईल. बैठकीला गैरहजार असलेल्या आमदारांनी परवानगी घेतली आहे.' असं बाळासाहेब थोरातांनी स्पष्ट सांगितलं आहे.
- 02:02 PM • 15 Feb 2024
मनोज जरांगेंची प्रकृती आणखी खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची अपडेट
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज (15 फेब्रुवारी) सहावा दिवस आहे. जालन्यातील जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे जरांगे उपोषण करत असून, दिवसेंदिवस त्यांची प्रकृती ढासळू लागली आहे. जरांगे यांच्या नाकातून रक्तस्त्राव होता. त्यानंतर त्यांना सलाईन लावण्यात आली, मात्र जरांगेंनी सलाईन काढून टाकली. दरम्यान, त्यांच्या तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरांनीही चिंता व्यक्त केली. उपोषण सोडलं नाही तर त्यांच्या तब्येतीला धोका आहे. मेंदू पॅरलाइज होऊ शकतो, असंही डॉक्टर म्हणाले.
- 01:14 PM • 15 Feb 2024
काँग्रेसकडून हंडोरेंनी भरला अर्ज
राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने चंद्रकांत हंडोरेंना उमेदवारी दिली आहे. आज काँग्रेस नेत्याच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
- 01:10 PM • 15 Feb 2024
प्रफुल पटेलांनी भरला अर्ज
राज्यसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रफुल पटेल यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष तटकरे यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
- 12:59 PM • 15 Feb 2024
बबनराव घोलप यांनी ठाकरे गटाला ठोकला 'राम राम', दिला राजीनामा
उद्धव ठाकरे गटाचे नेते बबनराव घोलप यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. कोणत्या पक्षात जायचं याचा निर्णय अद्याप केलेला नाही, असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं.
- 12:47 PM • 15 Feb 2024
"घटनाबाह्य योजना माननीय सर्वोच्च न्यायालयाने..."; आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
"एक घटनाबाह्य योजना माननीय सर्वोच्च न्यायालयाने रद्द केली. आता महाराष्ट्राला आशा आहे की, इथली घटनाबाह्य राजवट पण अशीच रद्द केली जाईल. निवडणूक रोख्यांची अपारदर्शक योजना रद्द करण्याच्या आजच्या निर्णयाचं मी मनापासून स्वागत करतो. आता आम्हाला आशा आहे की यापुढे पारदर्शकता बाळगली जाईल आणि आदेशातील प्रत्येक शब्द वेळेत पाळला जाईल." असं आदित्य ठाकरे ट्वीट करत म्हणाले.
- 10:32 AM • 15 Feb 2024
काँग्रेसच्या बैठकीला काही आमदार राहणार गैरहजर, कारण...
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, "सगळे वरिष्ठ, आजी-माजी आमदार, खासदार या सगळ्यांचं शिबीर लोणावळ्यामध्ये आहे. या शिबिराच्या निमित्ताने आम्ही जात आहोत. इथूनच आम्ही सगळे तिकडे जाणार आहोत. त्यापूर्वी ही आमची नियोजित मीटिंग आहे", अशी माहिती नाना पटोले यांनी दिली.
काँग्रेसचे काही आमदार बैठकीला अनुपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. यासंदर्भात नाना पटोले यांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, "माझं हंबर्डेंबरोबर बोलणं झालं आहे. त्यांच्या मुलांचं लग्न असल्याने ते अनुपस्थित राहणार आहेत. पण, मतदानाला ते हजर राहतील. जवळकरांसोबतही माझं बोलणं झालं आहे, ते शिबिराला येणार आहेत. प्रत्येकांच व्यक्तिगत कुठल्या कामामुळे ते अनुपस्थित राहणार आहेत, ते आमची परवानगी घेऊन राहणार आहेत."
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT