‘ज्या कलावतीच्या घरी जेवलात, त्यांच्यासाठी…’, अमित शाहांनी गांधींना डिवचलं

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

no-confidence motion against center manipur violence amit shah criticize rahul gandhi
no-confidence motion against center manipur violence amit shah criticize rahul gandhi
social share
google news

मणिपूर हिंसाचारावरून (Manipur Voilence) केंद्राविरूद्ध आणण्यात आलेल्या अविश्वास प्रस्तावावर आज दुसऱ्या दिवशी संसदेत चर्चा करण्यात आली. या दरम्यान संसदेत बोलताना गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे नाव न घेता त्यांना सुनावले आहे. ज्या गरीब महिलेच्या (कलावती) घरी जाऊन (राहुल गांधी) हे जेवले होते, त्या गरीब महिलेला अन्नधान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुरवल्याची माहिती अमित शाह यांनी देत राहुल गांधीवर टीका केली. तसेच तिला देखील मोदींवर अविश्वास नसल्याचे विधान करून शाह यांनी विरोधकांच्या कानपिचक्या घेतल्या आहेत. (no-confidence motion against center manipur violence amit shah criticize rahul gandhi)

ADVERTISEMENT

अविश्वास प्रस्तावावर बोलताना अमित शाह यांचा रोख राहुल गांधी यांच्यावर होता. या संसदेत एक असा सदस्य आहे, ज्याला 13 वेळा राजकारणात लाँच करण्यात आले होते. मात्र 13 ही वेळा हा सदस्य अपयशी ठरला,त्यांची एक लॉँचिंग संसदेतही झाली आहे, असा टोला अमित शाह यांनी राहुल गांधी यांचे नाव न घेता लगावला.

हे ही वाचा : Rahul Gandhi: ‘शाहा, अदाणी अन् रावण…’, लोकसभेत परताच तुफान हल्ला, भाषण जसंच्या तसं

पुढे अमित शाह म्हणाले, बुंदेलखंडची एक गरीब महिला आहे, तिचे नाव कलावती आहे. तिच्या घरी हे (राहुल गांधी) जेवायला गेले, त्यानंतर संसदेत येऊन तिच्या गरीबीची त्यांनी माहिती दिली. यानंतक कॉँग्रेसचे सरकार सत्तेत आले. त्यावेळी तुम्ही कलावतीसाठी तुम्ही काय केलंत? असा सवाल अमित शाह यांनी करत तिला घर, वीज, गॅस, अन्नधान नरेंद्र मोदींनी दिले. त्यामुळे ज्या कलावतीच्या घरी तुम्ही जेवणासाठी गेला होतात, तिला देखील मोदींवर अविश्वास नाही, तिला मोदींवर विश्वास असून ती त्यांच्यासोबत उभी आहे, असा टोला अमित शाह यांनी राहुल गांधी यांना लगावला आहे.

हे वाचलं का?

अमित शाह म्हणाले, 1999 मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना अविश्वास ठरावाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे त्यांनी सरकार वाचवण्यासाठी भ्रष्टाचारामध्ये गुंतण्यापेक्षा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अशा संकटकाळात राजकीय पक्ष आणि आघाड्यांचे चारित्र्य समोर येते. युपीएचे चारित्र्य कोणत्याही प्रकारे सरकार वाचवण्यासाठी भ्रष्टाचारात गुंतणे नसून, भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचे चारित्र्य तत्त्वांना चिकटून राहणे आहे, असे अमित शाह म्हणाले आहेत.

1993 मध्ये पंतप्रधान पी. वी.नरसिंह राव यांना देखील अविश्वास प्रस्तावाला सामोरे जावे लागले होते. त्यावेळी कॉँग्रेसने कोणत्याही प्रकारे सत्तेत कायम राहण्याचा निर्णय़ घेतला होता. नरसिंह राव यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला, पण झारखंड मुक्ती मोर्चाच्या (जेएमएम) सदस्यांना तुरुंगात जावे लागले. पुढे नरसिंह रावही तुरुंगात गेले. आज काँग्रेस आणि झामुमो लोकसभेत विरोधी पक्षात बसले आहेत,असे देखील अमित शाह यांनी सांगितले.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : आयुष्मान भारत योजनेत घोटाळा! मृतांवर उपचार, एकाच मोबाईलवर…, कॅगचा मोठा खुलासा

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT