India alliance : शरद पवारांबद्दल विरोधी पक्ष का आहेत टेन्शनमध्ये?
विरोधकांची आघाडी असलेल्या इंडियाची पुढील बैठक मुंबईत होणार आहे. पण, या बैठकीसाठी तारीख निश्चित झालेली नाही.
ADVERTISEMENT
India Alliance Meeting : विरोधी पक्षाच्या आघाडीची म्हणजे इंडियाची पुढील बैठक मुंबईत होणार आहे. पण, विरोधी पक्षांच्या आघाडीच्या भारताच्या तिसऱ्या बैठकीचा ‘मुहूर्त’ निघत नाहीये. याच कारण म्हणजे दिग्गज नेत्यांच्या तारखांबाबत होत असलेली अडचण. काही नेत्यांनी 25-26 ऑगस्टला मुंबईत येण्यास असमर्थता व्यक्त केली आहे. त्यामुळे विरोधकांची ही महत्त्वाची बैठक सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली जाण्याची शकता आहे.
ADVERTISEMENT
शरद पवार अध्यक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी संघटनेची पुनर्स्थापना आणि डॅमेज कंट्रोलसाठी शरद पवार ऑगस्टच्या मध्यापासून संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. शरद पवार हे इंडिया आघाडीतील अशा नेत्यांपैकी एक आहेत, जे पुढील महिन्यात म्हणजे ऑगस्टमध्ये उपलब्ध असणार नाहीत.
शरद पवार पंतप्रधान मोदी एकाच व्यासपीठावर
1 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी टिळक पुरस्काराच्या निमित्ताने पुण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शरद पवार आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदी आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर असणार आहेत. हा कार्यक्रम पूर्वनिश्चित आहे. राष्ट्रवादीतील बंडखोरीनंतर शरद पवार आणि पंतप्रधान पहिल्यांदाच मंचावर एकत्र दिसणार आहेत. पवारांच्या या कार्यक्रमामुळे काही विरोधी पक्षांमध्ये गदारोळ सुरू असून नेत्यांनी अंतर्गत शंका उपस्थित केल्या आहेत.
हे वाचलं का?
पवारांबाबत विरोधी पक्षांमध्ये टेन्शन का?
शुक्रवारी विरोधी पक्षांच्या महाआघाडीच्या सदस्यांची बैठक झाल्याचे बोलले जात आहे. यावेळी अनेक नेत्यांनी चिंता व्यक्त केली, तर काहींनी शरद पवार हे महाविकास आघाडीतील ज्येष्ठ नेते असल्याचेही सांगितले. त्यांनी मोदींसोबत स्टेज शेअर केल्यास महाविकास आघाडीवर परिणाम होईल, असं म्हटलं जात आहे.
वाचा >> अरेरे देवाSSS! केसरकरांनी कोल्हापुरात पूर न येण्याचं असं कारण सांगितलं की डोक्याला लावाल हात
मुंबईत बैठक कधी
एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, 25-26 ऑगस्टची तारीख अद्याप विचाराधीन आहे, परंतु आम्ही एक समान तारीख शोधण्याचा प्रयत्न करीत आहोत; ज्यामध्ये सर्व नेते उपलब्ध असतील. यासाठी सर्वांची चर्चा सुरू आहे. शुक्रवारी महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले की, मविआच्या नेत्यांनी ऑगस्टमध्ये रॅली काढण्याची योजना आखली आहे. पावसाळ्यामुळे या मोर्चांना विलंब होत आहे. MVA मध्ये समाविष्ट असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने (UBT) येत्या शनिवारी पुन्हा बैठक बोलावली आहे.
ADVERTISEMENT
विरोधकांच्या मुंबई बैठकीची जबाबदारी उद्धव ठाकरे यांच्याकडे
सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी काँग्रेस खूप सक्रिय झाली आहे. 26 सदस्यांच्या विरोधी आघाडीसाठी पक्ष सध्या एकसूत्री अजेंड्यावर काम करत आहे. मात्र, महाराष्ट्र विधानसभेत काँग्रेस सदस्यांची संख्या कमी आहे. विरोधी आघाडीच्या मुंबई बैठकीच्या आयोजनाची जबाबदारी उद्धव ठाकरेंच्या पक्षाने घेतली आहे. वास्तविक, अजित पवारांच्या बंडखोरीमुळे राष्ट्रवादीत गोंधळाची परिस्थिती आहे. अशा स्थितीत महाविकास आघाडीच्या सभांमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रमुख नेते म्हणून प्रोजेक्ट केले जात आहेत.
ADVERTISEMENT
वाचा >> ITR e filing process : 15 मिनिटांत स्वतःच इन्कम टॅक्स रिटर्न कसा भरायचा?
तारीख अंतिम नाही
बैठकीच्या तारखेबद्दल एका नेत्याने सांगितले की, “आम्हाला सांगण्यात आले आहे की शिवसेना (उद्धव गट) बैठकीच्या तारखांच्या संदर्भात समन्वय करत आहे. ही बैठक 25-26 ऑगस्टला होणार असल्याचे आम्हाला सांगण्यात आले. आता त्या दिवशी शरद पवार उपलब्ध नसल्याचं समजतंय. 26 पक्षांशी समन्वय साधणे हे साधं काम नाही. आणखी एका नेत्याने सांगितले की, पाटण्यात बैठकीची योजना तयार होत असतानाही तारीख निश्चित करण्यासाठी आम्हाला खूपच कसरत करावी लागली होती.
इंडियाची पहिली बैठक पाटणा येथे जूनमध्ये झाली होती. या महिन्याच्या सुरुवातीला बंगळुरू येथे दुसरी बैठक झाली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT