Rahul Gandhi : स्मृती इराणींवर टीका करणाऱ्यांना राहुल गांधींनी सुनावलं, 'ती' पोस्ट व्हायरल

मुंबई तक

ADVERTISEMENT

rahul gandhi tweet for bjp leader smriti irani vacated her residence at 28 tughlak crescent in delhi
स्मृती इराणी यांनी त्यांचा सरकारी बंगला रिकामा केला आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

स्मृती इराणी यांनी त्यांचा सरकारी बंगला रिकामा केला आहे.

point

राहुल गांधी स्मृती इराणीच्या बचावासाठी पुढे आले

point

राहुल गांधी यांनी काय ट्विट केलं?

Rahul Gandhi Tweet For Smriti Irani : लोकसभा निवडणुकीत अमेठी मतदार संघातून माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा पराभव झाला होता. या पराभवानंतर स्मृती इराणी यांनी त्यांचा सरकारी बंगला रिकामा केला आहे. या घडामोडीनंतर स्मृती इराणी (Smriti Irani) यांना सोशल मीडियावर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले आहे. या ट्रोलिंगनंतर आता राहुल गांधी( Rahul Gandhi) स्मृती इराणीच्या बचावासाठी पुढे आले आहेत. नेमकं त्यांनी काय केलं आहे. ते जाणून घेऊयात. (rahul gandhi tweet for bjp leader smriti irani vacated her residence at 28 tughlak crescent in delhi) 

ADVERTISEMENT

स्मृती इराणी यांनी त्यांचा सरकारी बंगला रिकामा केला आहे. यानंतर सोशल मीडियावर स्मृती इराणी यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले आहे.  या ट्रोलिंगनंतर राहुल गांधी यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये राहुल गांधी लिहतात, 'आयुष्यात जय-पराजय होत असतो. मी सर्वांना आवाहन करतो की स्मृती इराणी किंवा इतर कोणत्याही नेत्याशी अपमानास्पद भाषा वापरणे आणि वाईट वागणे टाळावे. लोकांना तुच्छ लेखणे आणि अपमान करणे हे शक्तीचे नव्हे तर दुर्बलतेचे लक्षण आहे, असे आवाहन राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. त्यामुळे राहुल गांधी स्मृती इराणी यांच्या बचावासाठी पुढे सरसावल्याची चर्चा सुरु आहे. 

हे ही वाचा : Pooja Khedkar: 'चोराला सोडा...' IAS पूजा खेडकरांनी केलेला थेट DCP ला कॉल, नवा कारनामा आला समोर

स्मृती इराणी यांचा लुटियन्स दिल्लीतील 28 तुघलक क्रिसेंट येथे सरकारी बंगला होता. हा बंगला म या आठवड्याच्या सुरुवातीला रिकामा केला होता. दरम्यान लोकसभा निवडणुकीत अमेठी लोकसभा मतदारसंघात काँग्रेस नेते किशोरी लाल शर्मा यांनी दीड लाखांहून अधिक मतांनी स्मृती इराणी यांचा पराभव केला होता.तर स्मृती इराणी यांनी 2019 मध्ये अमेठी मतदारसंघातून काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा पराभव केला होता. राहुल गांधी आणि काँग्रेसच्या समर्थकांनी इराणीच्या पराभवाला 'अपमानास्पद पराभव' असे म्हटले होते.

हे वाचलं का?

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी सरकार 2.0 मधील 17 केंद्रीय मंत्र्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते.  त्यामुळे सरकारी बंगला रिकामा करण्यासाठी मंत्र्यांना 11 जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली होती. याप्रकरणी त्यांना नोटीसही बजावण्यात आली होती.

हे ही वाचा : Vidhan Parishad Election 2024: BJP आमदार गणपत गायकवाड तुरुंगातून आले मतदानाला, पण कोणामुळे वेटिंगवर?

खरं तर नियमानुसार लोकसभा विसर्जित झाल्यानंतर एक महिन्याच्या आत सरकारी बंगला रिकामा करावा लागतो. राष्ट्रपतींनी 5 जून रोजी सतरावी लोकसभा विसर्जित केली होती, त्यामुळे माजी खासदारांना त्यांचे सरकारी घर रिकामे करण्यासाठी 5 जुलैपर्यंतच वेळ होता. पण त्यानंतर 11 जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली होती. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT