‘पवारांची पहिली टीम…’, राज ठाकरेंची संतप्त पोस्ट, एकनाथ शिंदेंना इशारा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mns chief Raj thackeray on ajit pawar oath sharad pawar
Mns chief Raj thackeray on ajit pawar oath sharad pawar
social share
google news

Raj Thackeray Reaction After Ajit Pawar Joined Shinde Government : बरोबर एक वर्षानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप घडला. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाला आव्हान देत एकनाथ शिंदेंनी भाजपसोबत सरकार स्थापन केलं. त्यानंतर अजित पवारांनीही असाच निर्णय घेत शरद पवारांना धक्का दिला आहे. शरद पवारांनी याला आपला पाठिंबा नसल्याचे सांगितले असले, तरी अजित पवारांनी मात्र, पक्षातील सगळ्यांचा या निर्णयाला पाठिंबा असल्याचे म्हटले आहे. याच सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संतप्त पोस्ट शेअर केली आहे. राज ठाकरेंनी शरद पवारांवर बाण डागत एकनाथ शिंदेंनाही सूचक इशारा दिला आहे. (Raj Thackeray Gets Angry After Ajit pawar joined Eknath Shinde And Devendra Fadnavis Govt.)

ADVERTISEMENT

अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधीने महाराष्ट्रात सगळ्यांनाच धक्का बसला आहे. या सगळ्या घटनाक्रमावर बोलताना राज ठाकरे यांनी तीव्र शब्दात भूमिका मांडली.

राज ठाकरे यांची पोस्ट काय?

राज ठाकरे म्हणाले, “आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला. उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं, त्याचा पहिला अंक आज पार पडला. पवारांची (राष्ट्रवादीची) पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच”, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. राज ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या नेत्यांना शरद पवार यांचा पाठिंबा असल्याचं म्हटलं आहे. त्याचबरोबर इतरही नेते या सरकारमध्ये सहभागी होतील, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

एकनाथ शिंदेंना सूचक इशारा

राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार आणि शरद पवारांबद्दल बोलतानाच राज ठाकरेंनी शिंदेंच्या शिवसेनेलाही सूचक इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, “तसंही महाराष्ट्र भाजपला शिंदेंना दिलं जाणारं (अवास्तव) महत्व रुचत नव्हतंच, त्यावर अनायसे उतारा शोधला.”

वाचा >> Ajit Pawar : “…म्हणून आम्ही शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झालो”

“ह्यात देशासमोर चित्रं काय उभं राहतंय, तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा झालेला चिखल. ज्या राज्याने देशाचं प्रबोधन केलं, त्या राज्याचं राजकारण इतक्या खालच्या स्तराला गेलं आहे हे पाहून जीव तुटतो आणि महाराष्ट्राच्या पुढे अजून काय काय वाढून ठेवलंय हा विचार करून मनात धस्स होतं”, अशी चिंता राज ठाकरेंनी या राजकीय घडामोडींवर व्यक्त केली आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

वाचा >> अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?

“बाकी महाराष्ट्रातील जनता बेसावध आणि सोशिक आहे ह्याची खात्री असल्यामुळे ह्या सगळ्यांचे सत्तेच्या सिंहासनासाठीचे खेळ असेच सुरु राहणार की येत्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील जनता सत्तेचं हे किळसवाणं राजकारण बंद पाडणार?”, असं म्हणत राज ठाकरेंनी राज्यातील जनतेला सवाल केला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT