NCP: शरद पवारांना आणखी एक मोठा धक्का, ‘हा’ आमदार अजितदादांच्या गळाला

मुंबई तक

ADVERTISEMENT

sharad pawar big blow in vidarbha indranil naik support ajit dada ncp maharashtra politics
sharad pawar big blow in vidarbha indranil naik support ajit dada ncp maharashtra politics
social share
google news

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना विदर्भातून (Vidarbha) मोठा धक्का बसला आहे. कारण विदर्भातले नाईक घराण्यातील विद्यमान आमदार इंद्रनील नाईक (Indranil Naik) यांनी अजित दादा (Ajit Pawar) यांना पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे. राजकारणातील मोठे घराणे म्हणून नाईक परिवाराकडे पाहिजे जाते. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून नाईक परिवार हे पवारांसोबत होते. मात्र आता इंद्रनील नाईक यांनी अजित दादांना पाठिंबा दर्शवल्याने शरद पवार गटाला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे. (sharad pawar big blow in vidarbha indranil naik support ajit dada ncp maharashtra politics)

ADVERTISEMENT

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्री पदाची तर इतर 9 मंत्र्यांना मंत्रीपदाची शपथ घेऊन शिंदे-फडणवीस सरकारमध्ये प्रवेश केला होता. या प्रवेशानंतर आता राष्ट्रवादीत दोन गट पडल्याचे चित्र आहे. एक गट शरद पवार यांचा आहे, तर एक गट अजित दादांचा आहे. कालच राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी शरद पवारांना पाठिंबा दर्शवला होता. त्यानंतर आज आमदार इंद्रनील नाईक यांनी अजित दादांना पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे शरद पवार यांना धक्का बसला आहे.

राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे खंदे समर्थक असलेल्या नाईक घराण्यातील विद्यमान इंद्रनील नाईक यांनी अजितदादांच्या तंबूत जाण्याचा घेतला निर्णय घेतला आहे. इंद्रनील नाईक यांनी आज पुसद येथे एक सहविचार सभा घेतली. या सभेत त्यांनी अजित दादांना पाठिंबा दर्शवत असल्याची घोषणा केली. या सभेला माजी मंत्री मनोहर नाईक , सहकार क्षेत्रातील दिग्गज नेते विजय चव्हान यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी इंद्रनील नाईक यांच्या निर्णयाला पाठिंबा दिला.

हे वाचलं का?

हे ही वाचा : NCP: शरद पवारांनी खडसावून सांगितलं तरी रुपाली चाकणकरांनी ऐकलंच नाही!

लहान लहान काम असायची अजित दादा त्यावर दोन मिनिटात तोडगा काढायचे, होत असेल तरी दोनच मिनिट, होत नसेल तरी दोन मिनिटात तोडगा काढायचे. पण शऱद पवार साहेबांच्या यांच्या खालच्या लोकांकडून कोणतेच सहकार्य मिळायचं नाही अशी खंत इंद्रनील नाईक यांनी व्यक्त केली. तसेच ज्य़ा बाजुला कामच होत नसतील त्या बाजूने जायचं की आपण काम होतात त्या बाजूने जायचे, असे म्हणत इंद्रनील नाईक यांनी अजित दादांना पाठिंबा दर्शवत असल्याची घोषणा केली.

मी जन्माला आलो, डोळे उघडले असेल तेव्हापासून पवार साहेबांशिवाय राजकारण बघितले नाही आहे.त्याचा आधार होता आहे आणि आयुष्य भर राहणार आहे. माझा विरोध साहेबांना अजिबात नाही आहे. ना सुप्रिया ताईंना विरोध आहे, त्यांचा आदर आहे आणि राहणार असल्याचे देखील इंद्रनील नाईक म्हणाले आहेत.

ADVERTISEMENT

तसेच ना आपण पक्ष सोडत आहोत, ना दुसऱ्या पक्षात विलीनही होत आहोत, पक्ष तोच आहे. माझे मत हेच आहे. जर प्रफुल पटेल, राम राजे निंबाळकर, दिलीप वळसे पाटील सारखे नेते अजित दादांसोबत जात असतील, तर यामागे काही चुकीचे होतेय, असे मला नाही वाटतं, यासाठी आपण सहकार्य करायला पाहिजे, असे आवाहन देखील इंद्रनील नाईक यांनी कार्यकर्त्यांनी केले.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : अमोल कोल्हे खासदारकीचा राजीनामा देणार, शरद पवार काय करणार?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT