Sharad Pawar गटाला मिळालं नवं नाव, निवडणूक आयोगानं दिलं 'हे' नाव
Sharad Pawar : निवडणूक आयोगाकडून अजित पवारांना पक्ष आणि चिन्ह देण्याचा निर्णय दिल्यानंतर आज शरद पवार गटालाही नवं नाव देण्यात आलं आहे. पक्षाच्या नावानंतर आता चिन्ह कोणतं मिळणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
शरद पवार गटाचं नाव ठरलं
ठरलं! शरद पवार गटाचं नाव जाहीर
पक्ष, चिन्ह गेल्यानंतर आता पवारांचा नवा पक्ष
NCP : राज्यातील राजकारणासाठी कालचा दिवस मोठा धक्कादायक होता. कारण निवडणूक आयोगाने (Election Commission) कालच अजित पवार यांच्या गटाला खरी राष्ट्रवादी म्हणून घोषित केले, तर शरद पवार गटाला निवडणूक आयोगाकडून तीन नावं आणि पक्ष चिन्ह सांगण्याची सूचना दिली होती. त्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) गटाकडून 3 नावांचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. त्यापैकी एका नावाला निवडणूक आयोगाकडून मान्यता देण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
तीन नावांचा प्रस्ताव
निवडणूक आयोगाने निर्णय दिल्यानंतर शरद पवार गटाकडून नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी–शरद पवार, नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी–शरदचंद्र पवार, तिसरं नाव नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी–शरदराव पवार या तीन नावांचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. त्यापैकी एका नावाला निवडणूक आयोगाकडून मान्यता देण्यात आली असून 'नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी–शरदचंद्र पवार' म्हणजेच 'राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार गट'असं नाव आता शरद पवार गटाला असणार आहे.
चिन्हाची शक्यता
राष्ट्रवादी पक्ष अजित पवार गटाचा असल्याचा निर्णय देण्यात आल्यानंतर शरद पवार गटाकडून चहाचा कप हे ही चिन्हं घेतले जाऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर चहाच्या कपाव्यतिरिक्त त्यांनी सूर्यफूल आणि उगवता सूर्य हे ही निवडणूक चिन्हं देण्याची मागणी करण्यात आली आहे.
हे वाचलं का?
चिन्ह्यांचाही प्रस्ताव
निवडणूक आयोगाकडून मंगळवारीच राष्ट्रवादी काँग्रेस ही अजित पवार गटाचीच असल्याचा निर्णय देण्यात आला होता. त्या निर्णयानंतरच शरद पवार गटाकडून ज्या प्रमाणे पक्षासाठी नावं देण्यात आली होती, त्याच प्रमाणे त्यांनी चिन्ह्यांचाही प्रस्ताव पाठवला होता.
नावाला मिळाली मान्यता
निवडणूक आयोगाकडून शरद पवार गटाला बुधवारी सायंकाळपर्यंत त्यांच्या पक्षाचे आणि चिन्हं ठरवण्याचा पर्याय दिला होता, त्यामुळे आता आयोगानेही 'नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी–शरदचंद्र पवार' या नावाला मान्यता दिली असल्याचे सांगण्यात आले आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT