Opposition Meeting in Patna : रणनीती काय ठरली? शरद पवार म्हणाले,…
आज पाटण्यात 17 विरोधी पक्षांची एकजूट बैठक पार पडली. यामध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री भगवंत मान, मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्यासह सहा राज्यांचे मुख्यमंत्री आणि अखिलेश यादव, उद्धव ठाकरे, मेहबुबा मुफ्ती यांच्यासह पाच राज्यांचे माजी मुख्यमंत्री सहभागी झाले होते.
ADVERTISEMENT
Opposition Meeting in Patna News : संसदेत विरोधी बाकावर बसणाऱ्या 17 विरोधी पक्षातील नेत्यांची बैठक बिहारची राजधानी पाटण्यात पार पडली. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आयोजित केलेल्या या बैठकीत सर्व नेत्यांनी आगामी काळातील कृती कार्यक्रमावर चर्चा केली. बैठकीनंतर शरद पवारांनी भूमिका मांडताना आमच्या भूमिकेचं देशातील जनता स्वागत करेल, असा विश्वास व्यक्त केला.
ADVERTISEMENT
आज पाटण्यात 17 विरोधी पक्षांची एकजूट बैठक पार पडली. यामध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री भगवंत मान, मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्यासह सहा राज्यांचे मुख्यमंत्री आणि अखिलेश यादव, उद्धव ठाकरे, मेहबुबा मुफ्ती यांच्यासह पाच राज्यांचे माजी मुख्यमंत्री सहभागी झाले होते.
या बैठकीला राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेही उपस्थित होते. 2024 च्या लोकसभा निवडणुकीची रणनीती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला सत्तेवरून हटवण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. या बैठकीत विरोधी पक्षनेत्यांच्या आपसातील संघर्षाच्या बातम्याही समोर आल्या. मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी केजरीवाल यांनी सर्व पक्षांना केंद्र सरकारकडून काढण्यात आलेल्या अध्यादेशाला विरोध करण्याचे आवाहन केले. त्यानंतर ओमर अब्दुल्ला यांनी केजरीवाल यांना कलम 370 हटवण्याच्या वेळी पाठिंबा न दिल्याची आठवण करून दिली.
हे वाचलं का?
रक्त सांडले तरी चालेल… -ममता बॅनर्जी
पाटणा येथील बैठकीनंतर संयुक्त पत्रकार परिषदेत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, “आम्ही सर्व पक्ष एक आहोत. मी नितीशजींना पाटणा येथे बैठक घेण्याचा प्रस्ताव दिला होता. कारण पाटण्यापासून सुरू होणारे आंदोलन मोठे रूप धारण करते. आम्हाला विरोधी म्हणणे योग्य नाही. आम्हीही देशभक्त आहोत आणि रक्त सांडले तरी चालेल, देशाच्या स्वातंत्र्यासाठी आम्ही लढणार आहोत”, असेही ममता बॅनर्जी यावेळी म्हणाल्या.
शरद पवार बैठकीनंतर काय म्हणाले?
“बैठकीत काय झालं हे इतर सहकाऱ्यांनी सांगितलं आहे. आज देशातील प्रश्न आपण बघतोय. जिथे बिगर भाजपा सरकारं आहेत, तिथे भाजप असो, आरएसएस असो वा सामाजिक तणाव निर्माण करण्याचे प्रयत्न ठिकठिकाणी केले जात आहे. त्यामुळे भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांचा सामना करायचा असेल, तर मिळून करावा लागेल. राष्ट्रीय हितासाठी आपसातील मतभेद बाजूला ठेवून आम्ही पुढे जाण्याचं निश्चित केले आहे. मला विश्वास आहे की पाटण्यातून ज्याची सुरुवात होते, ती नवनिर्माण आणते”, असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला.
ADVERTISEMENT
याच मुद्द्यावर पवार पुढे म्हणाले, “मला आठवतंय की जयप्रकाशजींच्या नेतृत्वाखाली एक संदेश येथून दिला गेला होता आणि संपूर्ण देशात वेगळं वातावरण तयार झालं होतं. अनेक आंदोलने जी येथून सुरू झाली, ती देशाच्या इतिहासाने स्वीकारली. आजच्या स्थितीत जी नितीश कुमार यांनी बैठक बोलावली. आणि सगळे साथी इथे आले. यावेळी जी चर्चा झाली. काय ठरवायचं यावर आम्ही चर्चा केली. आम्ही सोबत मिळून काम करण्याचे ठरवलं आहे. येथून आमची नवी वाटचाल सुरू झाली आहे. आणि मला पूर्ण विश्वास आहे की, याचं स्वागत देशातील जनता करेल”, असं शरद पवार यांनी सांगितले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT