लाइव्ह

Maharashtra Breaking News : ''ज्या आंदोलनात जाता ते बंद पाडतो'', जरांगेंचा 'या' नेत्यावर हल्ला?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Manoj jarange news, manoj jarange rally
त्याला वाटलं तो एकटाच हुशार आहे मी त्याच्या पुढचा आहे.
social share
google news

Maharashtra Breaking news Updates : लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील सर्वच राजकीय पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर विविध बैठका पार पडताना दिसत आहेत. त्याचबरोबर विधान परिषदेच्या रिक्त ११ जागांसाठी निवडणूक होत आहे. १२ जुलै रोजी मतदान होणार आहे. आमदार फुटणार नाही यासाठी खबरदारी घेतली जात आहे. सध्या सर्व पक्षांनी आपपल्या आमदारांना हॉटेलमध्ये एकत्र ठेवले आहे. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय घडामोडी वाढल्या आहेत.

ADVERTISEMENT

तसेच राज्यातील हिट अँड रन प्रकरणावरुन सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली आहे. तर दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली आज बीडमध्ये होणार आहे. त्यामुळे बीडमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत.

महाराष्ट्र आणि मुंबईतील सर्व महत्त्वाच्या घडामोडीचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून वाचा... 

 

ADVERTISEMENT

  • 06:03 PM • 11 Jul 2024

    ''ज्या आंदोलनात जाता ते बंद पाडतो'', जरांगेंचा या नेत्यावर हल्ला?

    गिरीश महाजन माणसाला फसवतो. ज्या आंदोलनात गेला तो आंदोलन कायमच बंद पाडलं. किंवा ती जात आणि आंदोलन फोडलं. त्याला वाटलं तो एकटाच हुशार आहे मी त्याच्या पुढचा आहे
     
    गिरीश महाजन पुढे जाऊन काहीतरी खोडी  करणार, आणि तो पुढे जाऊन म्हणला सगेसोयरे टीकत नाही. मला माहितं होत गिरीश महाजन डाव टाकणार आहे. 
     

  • 02:10 PM • 11 Jul 2024

    Worli Accident : मिहीर शाहने अपघाताच्या दिवशी 2 ठिकाणी दारू प्यायल्याचे उघड!

    मिहीर शाहने अपघाताच्या दिवशी 2 ठिकाणी दारू प्यायल्याचे उघड झाले आहे. बोरिवली ते मरिन ड्राइव्ह येथे ड्रायव्हर राजऋषीने गाडी चालवली. काल मध्यरात्री मिहीर शाह आणि चालक राजऋषीला घटनास्थळी नेत पोलिसांनी रिक्रिएशन केलं. दोघांची समोरासमोर चौकशी करण्यात आली यावेळी मिहीर शाहने गुन्हा कबूल केला. तो म्हणाला की, 'या अपघाताने माझं संपूर्ण करिअर संपलं. माझ्या हातून मोठी चूक झाली, झालेल्या घटनेचा मला पश्चाताप आहे', अशी कबुल मिहीरने पोलिसांसमोर दिली.
     

  • 12:44 PM • 11 Jul 2024

    Maharashtra News : राज्याचा गृहमंत्री युजलेस, साधी संवेदना नाही- संजय राऊत

    “आरोपीला कठोर शिक्षा होत नाही, तो पर्यंत त्या 10 लाखाला किंमत नाही. कावेरी नाखवा यांचा जीव 10 लाखाचा आहे का? राज्याचा गृहमंत्री युजलेस आहे. गृहमंत्र्यांकडून साधी संवेदना नाही” अशी टीका संजय राऊत यांनी केली.

  • 10:36 AM • 11 Jul 2024

    Maharashtra News : पुण्यात वादग्रस्त ठरणाऱ्या IAS पूजा खेडकर सोशल मीडियावरून गायब!

    काही दिवसांपासून पुणे येथील प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी पूजा खेडकर या त्यांच्या वादग्रस्त वागणुकीमुळे प्रचंड चर्चेत आहेत. त्यांच्या प्रकरणात आता थेट दिल्लीने लक्ष घातल्याचं दिसून येत आहे. मात्र यासर्वात आता पूजा खेडकर यांनी त्यांचे सोशल मीडिया अकाउंट्स डिलीट केले आहेत. त्यामुळे याचीही चर्चा चांगलीच रंगली आहे.

  • ADVERTISEMENT

  • 09:01 AM • 11 Jul 2024

    Maharashtra News : समृद्धी महामार्गाला मोठ्या भेगा

     

    नागपूर- मुंबई समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला करून अवघे एक वर्ष झाले आहे. एक वर्ष झाले नाही, तोच या महामार्गाला मोठ्या भेगा पडल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरपासून जवळ असलेल्या माळीवाडा इंटरचेंजनजीक ३ सेंमी रुंदीच्या ५० फूट लांबीच्या भेगा पडल्या आहेत.

     

  • 08:55 AM • 11 Jul 2024

    PM Modi on Mumbai Visit : पंतप्रधान मोदींचा 13 जुलै रोजी मुंबई दौरा

    पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 जुलैला मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. सायंकाळी 5.30 वाजता नेस्को प्रदर्शन केंद्रात विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. त्यानंतर वांद्रे-कुर्ला संकुल येथे सायंकाळी 7 वा इंडियन न्यूजपेपर सोसायटी टॉवरचे उद्घाटन करणार आहेत.

  • ADVERTISEMENT

  • 08:52 AM • 11 Jul 2024

    Maharashtra Politics : विधानपरिषदेच्या मतांची फाटाफूट होऊ नये म्हणून विशेष काळजी

    विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलै रोजी मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीत 11 जागांसाठी 12 उमेदवार मैदानात उतरले आहेत. विधानपरिषद निवडणुकीत मतांची फाटाफूट होऊ नये, यासाठी भाजप, ठाकरे गट आणि अजित पवारांची राष्ट्रवादी, आणि शिंदे गटाने आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतलाय. केवळ काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने हॉटेल वारीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतलाय.

  • 08:46 AM • 11 Jul 2024

    Beed News : मनोज जरांगेंची आज बीडमध्ये शांतता रॅली

    मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती आज बीड मध्ये मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅली निघणार आहे. या रॅलीची तयारी पूर्ण झाली आहे. सकाळी 11 वाजता शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मुख्यमार्गावरून छत्रपती शिवाजी महाराज चौकात रॅलीचा समारोप होणार आहे. त्यानंतर जरांगे पाटील यांचं भाषण होईल. 

    जरांगे पाटील यांनी सगेसोयरे संदर्भात सरकारला दिलेल्या अल्टीमेटम 13 तारखेला संपत आहे. याच पार्श्वभूमीवर आज बीडमध्ये शांतता रॅली निघणार आहे. या रॅलीच्या अनुषंगाने मराठा समन्वयकांनी पार्किंग ॲम्बुलन्स नाष्टा पाणी याची व्यवस्था केली आहे. तसेच स्वयंसेवकांची देखील नियुक्ती केलीय. यात महिला स्वयंसेवकाचा देखील समावेश करण्यात आला आहे.

follow whatsapp

ADVERTISEMENT