Rajasthan निवडणुकीत अशोक गेहलोत का हरले? अगदी जवळच्या व्यक्तीकडून पोलखोल!

रोहित गोळे

ADVERTISEMENT

why did ashok gehlot lose in rajasthan elections person close to him revealed all the secrets inside rajasthan assembly election 2023
why did ashok gehlot lose in rajasthan elections person close to him revealed all the secrets inside rajasthan assembly election 2023
social share
google news

Rajasthan assembly election result 2023: भारतीय जनता पक्षाने (BJP) राजस्थान विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव केला आहे. राजस्थानमध्ये विधानसभेच्या 199 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने 116 जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसने येथे 69 जागा जिंकल्या असून एका जागेवर ते आघाडीवर आहेत. दरम्यान, पराभव स्वीकारत मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्रा यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. (why did ashok gehlot lose in rajasthan elections person close to him revealed all the secrets inside rajasthan assembly election 2023)

ADVERTISEMENT

यावेळी अशोक गेहलोत यांनी म्हटले की, ‘कदाचित आम्ही आमच्या योजना जनतेपर्यंत नीट पोहोचवू शकलो नाही. आता राजस्थानमध्ये अशोक गेहलोत यांचा की काँग्रेसचा पराभव का झाला याबाबत विश्लेषण सुरू झालं आहे. पण या सगळ्या दरम्यान, अशोक गेहलोत यांच्या एका निकटवर्तीयाने संपूर्ण पराभवाचा ठपका गेहलोत यांच्यावरच ठेवला आहे.

आम्ही बोलत आहोत लोकेश शर्माबद्दल. अशोक गेहलोत हे मुख्यमंत्री असताना लोकेश शर्मा यांचे ओएसडी (विशेष कर्तव्य अधिकारी) होते. लोकेश शर्मा यांनी ट्वीट करून अशोक गेहलोत यांच्यावर अनेक आरोप केले आहेत.

हे वाचलं का?

हे ही वाचा>> Rajasthan Elections 2023 : गेहलोतांच्या भूमीत मोदींची ‘जादू’, भाजपने कसा बदलला ‘गेम’?

लोकेश शर्मा यांनी स्पष्ट शब्दात लिहिलं आहे की, ‘हा काँग्रेसचा पराभव नसून अशोक गेहलोत यांचा आहे. अशोक गेहलोत यांनी मुख्यमंत्री असताना पक्षात मरगळ आणली.’ मात्र, अद्यापपर्यंत या आरोपांबाबत अशोक गेहलोत किंवा राजस्थान काँग्रेसकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोतांवर त्यांच्याच निकटवर्तीयाकडून गंभीर आरोप

लोकशाहीत जनता ही माय-बाप असते आणि त्यामुळे जनादेशाचा स्वीकार आम्ही नम्रतेने करतो.

मी निकालामुळे दुखावलो आहे, परंतु आश्चर्यचकित नाही.

ADVERTISEMENT

काँग्रेस पक्ष निःसंशयपणे राजस्थानमधील प्रथा बदलू शकला असता, परंतु अशोक गेहलोत यांना कधीही बदल नको होता. हा काँग्रेसचा नसून अशोक गेहलोत यांचा पराभव आहे.

ADVERTISEMENT

पक्षाने गेहलोत यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली, त्यांना मोकळेपणाने काम करण्याची संधी दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार ते प्रत्येक जागेवर निवडणुकीसाठी उमेदवार दिले गेले.

पण त्यांचा अनुभव किंवा जादू कामी आली नाही आणि प्रत्येक वेळेप्रमाणे काँग्रेस त्यांच्या योजनांच्या बळावर जिंकू शकली नाही किंवा गुलाबी प्रचारानेही काम झालं नाही.

सलग तिसर्‍यांदा मुख्यमंत्री असताना गेहलोत यांनी पक्षात पुन्हा एकदा मरगळ आणली. आजपर्यंत त्यांनी केवळ पक्षाकडून फक्त गोष्टी घेतल्याच आहेत. पण गेहलोत यांना त्यांच्या कार्यकाळात पक्षाला पुन्हा सत्तेत आणता आले नाही.

हायकमांडशी फसवणूक, शीर्षस्थ नेत्यांपर्यंत योग्य अभिप्राय न पोहोचू देणं, कोणी आपला पर्याय होऊ न देणं याची काळजी घेणं, अपरिपक्व आणि स्वार्थी लोकांच्या भोवऱ्यात असताना सतत चुकीचे निर्णय घेणे, सर्व अभिप्राय आणि सर्वेक्षणांकडे दुर्लक्ष करणे, स्पष्ट पराभव होणार हे आपल्या आवडत्या उमेदवारांना तिकीट मिळवून देण्याचा आग्रह.

आजचे हे निकाल निश्चित होते. हे मी स्वतः मुख्यमंत्र्यांना यापूर्वी सांगितले होते, त्यांना अनेकवेळा इशाराही दिला होता, पण त्यांना कोणताही सल्ला किंवा सत्य सांगणारी व्यक्ती नको होती.

मी सतत सहा महिने प्रवास केला, राजस्थानच्या गाव-खेड्यांमध्ये गेलो, लोकांना भेटलो, हजारो तरुणांशी संवादाचे कार्यक्रम आयोजित केले, सुमारे 127 विधानसभा मतदारसंघ कव्हर केले आणि ग्राउंड रिपोर्ट्स मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवले, ग्राउंड रिअ‍ॅलिटी जाणून घेत सगळे रिपोर्ट्स समोर ठेवले जेणेकरून वेळेत सुधारात्मक पावले उचलून निर्णय घेता येतील, ज्यामुळे पक्षाचे पुनरागमन सुनिश्चित होईल…

हे ही वाचा>> BJP Maharashtra : भाजपचे नेते भिडले, पक्षाच्या विधानसभा प्रमुखालाच मारले; व्हिडिओ व्हायरल

मी स्वतः निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती, आधी बिकानेरमधून आणि नंतर भिलवाडा येथून मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून, जी जागा आपण 20 वर्षांपासून गमावत होतो, परंतु हा नवा प्रयोग करू शकलो नाही, आणि बीडी कल्लाजींसाठी मी निवडणूक लढवली. पण 6 महिनाभरापूर्वी मी सांगितले होते की तिथे 20 हजारांहून अधिक मतांनी निवडणूक हरू आणि तेच झाले. अशोक गेहलोत यांच्या बाजूने असे निर्णय घेण्यात आले की पर्याय तयारच होऊ शकले नाही…

25 सप्टेंबरची घटनाही पूर्णपणे प्रायोजित असताना हायकमांडच्या विरोधात बंड करून अवमान केला गेला आणि त्याच दिवसापासून खेळ सुरू झाला होता…

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT