MLC Election 2023 : रणजीत पाटलांविरोधात कट्टर समर्थकानेच शड्डू ठोकलाय!

MLC Election 2023 | Amravati graduate constituency Bjp candidate Dr. Ranjeet patil : विजयाच्या इतिहासाची पुनरावृत्ती करणार की अमरावती पदवीधरमधून कोणी नवीन जायंट किलर समोर येणार?
Amravati graduate constituency Bjp candidate Dr. Ranjeet patil
Amravati graduate constituency Bjp candidate Dr. Ranjeet patil Mumbai Tak

MLC Election 2023 | Amravati graduate constituency Bjp candidate Dr. Ranjeet patil: अमरावती: अमरावती (Amravati) विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणुक 30 जानेवारीला होत आहे. यात भाजपचे (BJP) डॉ. रणजीत पाटील (Dr. Ranjeet patil) तिसऱ्यांदा रिंगणात उतरले आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे (Dheeraj Lingade) यांच्याशी त्यांचा सामना आहे. मात्र, पक्षांतर्गत नाराजी, महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) उमेदवार, पक्षातीलच एका कार्यकर्त्याची बंडखोरी अशा आव्हानांचा डोंगर डॉ. रणजीत पाटलांसमोर आहे. त्यामुळे हे चक्रव्यूह ते कसं भेदणार हे पाहणं महत्वाच ठरणार आहे. (MLC Election 2023 | Amravati graduate constituency Bjp candidate Dr. Ranjeet patil)

अमरावती पदवीधर मतदारसंघ कधीकाळी अभ्यासू आमदार प्रा. बी.टी. देशमुखांचा बालेकिल्ला असलेला मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. बी.टी. देशमुख इथून तब्बल सहावेळा विजयी झाले. मात्र, २०१० मध्ये बी.टी. देशमुखांना हरवत डॉ. रणजीत पाटील 'जायंट किलर' ठरले. २०१० आणि २०१६ अशा सलग दोन टर्म रणजीत पाटलांनी अमरावतीचं मैदान मारलं. मात्र, तिसऱ्यांदा मैदानात उतरलेल्या रणजीत पाटलांसमोर आता मोठी आव्हानं आहेत.

Amravati graduate constituency Bjp candidate Dr. Ranjeet patil
विधान परिषद : भाचा की पक्ष? बाळासाहेब थोरांतांची काँग्रेसकडूनच कोंडी!

अमरावती पदवीधर मतदारसंघ एक दृष्टीक्षेप :

मतदारसंघातील जिल्हे : अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ

एकूण उमेदवार : २३

एकूण मतदार : २ लाख ६ हजार १७२

प्रमुख उमेदवार :

  1. डॉ. रणजीत पाटील (भाजप)

  2. धीरज लिंगाडे (काँग्रेस)

  3. प्रा. अनिल अंमलकार (वंचित)

  4. शरद झांबरे (भाजप बंडखोर)

  5. अरूण सरनाईक (अपक्ष)

Amravati graduate constituency Bjp candidate Dr. Ranjeet patil
विधान परिषद: 'MVA'चा सत्यजीत तांबेंना झटका, शुभांगी पाटलांना थेट पाठिंबा

डॉ. रणजीत पाटलांसमोर महाविकास आघाडीच्या धीरज लिंगाडे यांच्यासोबतच आणखी दोन उमेदवारांचं आव्हान आहे. यात अमरावती विभागाचे शिक्षक आमदार किरण सरनाईकांचे बंधू अरूण सरनाईक अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आहेत. यासोबतच डॉ. पाटलांचे एकेकाळचे कट्टर समर्थक शरद झांबरे यांनी त्यांच्याच विरोधात शड्डू ठोकला आहे. भाजपाच्या नाराजांचा पाठिंबा मिळविण्याचा झांबरे यांचा प्रयत्न असणार आहे.

मात्र, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी डॉ. रणजीत पाटीलच विजयी होणार दावा केला आहे. अमरावती पदवीधर मतदारसंघाचा हा निकाल डॉ. पाटलांचं राजकीय भवितव्य निश्चित करणारा असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे २०१० मध्ये 'जायंट किलर' ठरलेले रणजीत पाटील या निवडणुकीत विजयाच्या इतिहासाची पुनरावृत्ती करणार की कोणी नवीन जायंट किलर समोर येणार याचं उत्तर २ फेब्रुवारीच्या मतमोजणीनंतरच मिळणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in