कैलास पाटील यांच्या उपोषणला हिंसक वळण; शहर बंदची हाक, बसेसही फोडल्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

गणेश जाधव : उस्मानाबाद

उद्धव ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी बेमुदत उपोषण पुकारलं आहे. आज त्यांच्या उपोषणाचा साहावा दिवस आहे. जिल्ह्यातील अनेक सामाजिक संघटनांनी त्यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला आहे. तर शंभरपेक्षा जास्त ग्रामपंचायतीकडून देखील पाठिंब्याचं पत्र प्रप्त झालं आहे. अशात उस्मानबाद जिल्ह्यात उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. शनिवारी शिवसैनिकांनी आक्रमक होत अनेक बसेसवर दगडफेक केली आहे. त्यामुळे बसेसचं चांगलचं नुकसान झालं आहे.

कैलास पाटील यांचं उपोषण

उस्मानाबाद जिल्ह्यात विमा कंपनी व सरकारकडून शेतकऱ्यांना मदतीची 1 हजार 200 कोटी रुपये रक्कम थकीत आहे. दिवाळीपूर्वी ही रक्कम शेतकऱ्यांना मिळावी अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी केली होती, ती मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. त्यानुसार ते मागण्या मान्य होईपर्यंत आमरण उपोषण बसले आहेत. आज या उपोषणाचा सहावा दिवस आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

उस्मानाबाद बंदची हाक

आमदार कैलास पाटील यांच्या बेमुदत उपोषणाला सुरु होऊन पाच दिवस पुर्ण झाले आहेत. यादरम्यान त्यांची तब्येत खालावत असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. तसंच आतापर्यंत त्यांचा पाच किलो वजन कमी झालं आहे. त्यामुळे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. जिल्ह्यातील अनेक भागात कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. शुक्रवारी महाविकास आघाडीमधील कार्यकर्त्यांनी मागण्या मान्य व्हाव्या यासाठी रास्ता रोको आंदोलन केलं होतं. तर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शनिवारी उस्मानाबाद बंदची हाक दिली आहे. तरी उस्मानाबाद शहरातील व्यापाऱ्यांनी बंदला उत्सफुर्त प्रतिसाद दिला आहे.

जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये अंदोलनं

कैलास पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून अनेक ठिकाणी आंदोलन होताना पाहायला मिळत आहे. उस्मानाबाद तालुक्यातील काही कार्यकर्त्यांनी पाण्यात उड्या घेत अंदोलन केलं तर काही भागांमध्ये अर्ध जमीनीत गाडून घेऊन आंदोलन करण्यात आले आहे. तर शनिवारी सकाळी तेर, येडशी, पळसप या भागात कार्यकर्त्यांकडून बसेसवर दगडफेक करण्यात आली आहे. त्यामुळं काही काळ बससेवा बंद करण्यात आली होती.

ADVERTISEMENT

कार्यकर्ते चढले टॉवरवर

उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील ईटकूर या गावामध्ये देखील शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी कार्यकर्ते आक्रमक होताना पाहायला मिळाले. या गावातील पदाधिकाऱ्यांनी सिनेस्टाईल आंदोलन केले. कळंब तालुक्यातील पंचायत समितीचे माजी उपसभापती लक्षमण अडसूळ, पाथर्डी येथील पंडीत देशमुख, गंभिरवाडी येथील अशेक अडसूळ हे थेट दुरसंचारच्या टॉवरवर चढून बसले होते. यावेळी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. घटनेचं गांभिर्य लक्षात घेता तहसिलदार मुस्तफा खोंदे हे तातडीने घटनेस्थळी पोहोचले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT