'माझ्या कार्यकर्त्याची काळजी घ्या, जगला पाहिजे'; शिंदेंचा थेट डोंबिवलीतील रुग्णालयात फोन

वार गुरुवार वेळ संध्याकाळी साडे पाचची...अचानक डोंबिवलीमधील एका खाजगी हॉस्पिटलमधील डॉक्टरांचा फोन वाजतो..जो Eknath Shinde यांचा
'माझ्या कार्यकर्त्याची काळजी घ्या, जगला पाहिजे'; शिंदेंचा थेट डोंबिवलीतील रुग्णालयात फोन
Eknath ShindeMumbai Tak

मिथीलेश गुप्ता

डोंबिवली: वार गुरुवार वेळ संध्याकाळी साडे पाचची...अचानक डोंबिवलीमधील एका खाजगी हॉस्पिटलमधील डॉक्टरांचा फोन वाजतो...समोरून आवाज येतो हॅलो मी एकनाथ शिंदे बोलतोय.. आमचा कार्यकर्ता आपल्या रुग्णालयात उपचार घेत आहे. त्यांची काळजी घ्या, काही लागलं तर सांगा, माझा कार्यकर्ता जगला पाहिजे ही विंनती. हे संभाषण होत शिवसेनेचे मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचं !

पण आता मोठी राजकीय उलाथापालथ होत आहे. शिंदे यांनी मोठी बंडखोरी केल्यानं विशेषतः ठाणे जिल्ह्यातील शिवसैनिक गोंधळलेला दिसतोय. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणावर घडामोडी घडत असताना देखील शिंदे यांनी आवर्जून आपल्या कार्यकर्त्याची चौकशी केल्यानं डोंबिवलीतील शिवसैनिकांच्या चेहऱ्यावर समाधान होतं पण, शुक्रवारी सकाळी या ज्येष्ठ कार्यकर्त्याचे निधन झाल्याने शिवसैनिक आणखीनच व्यथित झाले.

शिवसैनिक तथा डोंबिवलीतील उपशहरप्रमुख राम मिराशी यांची २१ जूनला अचानक तब्येत बिघडल्याने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अतिदक्षता विभागात मिराशी यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती शिंदे यांना मिळाली. मग क्षणाचाही विलंब न करता गुरुवारी संध्याकाळी साडे पाच वाजता थेट रुग्णालयातील डॉक्टरांना फोन लावला. आमचा कार्यकर्ता आपल्या रुग्णालयात उपचार घेत असून त्याची काळजी घ्या असं शिंदे म्हणाले. ठाणे जिल्ह्यात ज्यांचा दबदबा आहेत असे एकनाथ शिंदे यांनी मोठं बंड पुकारलयं. त्यामुळे ठाणे, कल्याण डोंबिवलीसह इतर जिल्ह्यातील इतर शिवसैनिक अस्वस्थ झाला आहे.

एकीकडे शिंदे यांच्याविरोधात काही शिवसैनिक आक्रमक झालेले असताना दुसरीकडे मात्र ठाणे जिल्हा मात्र शांत आहे. शिवसैनिकांच्या मनाची घालमेल सुरू असतानाच अचानक गुरुवारी दस्तुरखुद्द एकनाथ शिंदे यांचा फोन डोंबिवलीत खणाणला अन् कार्यकर्त्यांच्या जीवात जीव आला.. पण शुक्रवारी सकाळी मिराशे यांचे निधन झाल्याची बातमी समोर आली आणि समस्त शिवसैनिक हळहळले.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in