शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर, मलाईदार खाती कोणाकडे?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर खातेवाटप मात्र रखडले होते. मात्र आता खातेवाटप झालेलं आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी खातेवाटप जाहीर केलं आहे. येत्या १७ तारखेपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु होणार आहे, त्यामुळे मंत्र्यांचे खातेवाटप होणं गरजेचं होतं. शिंदे गटाच्या ९ आणि भाजपच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती आता त्यांना खाती मिळाली आहेत.

भाजपला कोणती खाती मिळाली?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस– गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार

राधाकृष्ण विखे-पाटील – महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

सुधीर मुनगंटीवार- वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय

चंद्रकांत पाटील- उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य

ADVERTISEMENT

डॉ. विजयकुमार गावित- आदिवासी विकास

ADVERTISEMENT

गिरीष महाजन- ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण

मंगलप्रभात लोढा- पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास

सुरेश खाडे- कामगार

अतुल सावे- सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण

रवींद्र चव्हाण – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण

शिंदे गटाला मिळालेली खाती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे– सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ

गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा व स्वच्छता

दादा भुसे- बंदरे व खनिकर्म

संजय राठोड- अन्न व औषध प्रशासन

संदीपान भुमरे- रोजगार हमी योजना व फलोत्पादन

उदय सामंत- उद्योग

प्रा.तानाजी सावंत- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण

अब्दुल सत्तार- कृषी

दीपक केसरकर- शालेय शिक्षण व मराठी भाषा

शंभूराज देसाई- राज्य उत्पादन शुल्क

दरम्यान मागचा एक महिना उलटून गेला तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघंच सरकार चालवत होते. कॅबिनेट बैठक देखील दोघंच करत होते. त्यामुळे राज्यातील विरोधक सतत टीका करत होते. आता मंत्र्यांना खाती मिळाली आहेत. शिंदे सरकारचा हा मिनी मंत्रिमंडळ विस्तार आहे त्यामुळे आगामी काळात पुढील विस्तार लवकरच होईल असं एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT