Eknath Shinde : "रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला, कारण.."

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना टोला
The speed of the Mercedes faded before the speed of the rickshaw  tweets Eknath Shinde
The speed of the Mercedes faded before the speed of the rickshaw tweets Eknath Shinde

२१ जूनला शिवसेनेच्या नेतृत्वाविरोधात फारकत घेत एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत २९ आमदारांना घेऊन उठाव केला. काँग्रेस राष्ट्रवादीसोबत न जाता आपण आपला नैसर्गिक मित्र असलेल्या भाजपसोबत गेलं पाहिजे ही या सगळ्यांची मुख्य मागणी होती. २१ जूननंतरच्या पुढच्या काही दिवसात एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचे आणखी १० तर अपक्ष १२ आमदार येऊन मिळाले. त्यानंतर ठाकरे सरकार अल्पमतात आलं त्यानंतर पडलं.

या राजकीय घडामोडी घडल्यानंतर भाजपने एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा दिला त्यानंतर एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. या सगळ्यानंतर आता एक ट्विट करत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासाठी उद्धव ठाकरे जे मर्सिडिज चालवत जायचे त्याचा संदर्भ दिला आहे.

्कायय आहे एकनाथ शिंदे यांचं ट्विट?

"रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला.. कारण हे सर्वसामान्यांचं सरकार!!" हे ट्विट एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. एकनाथ शिंदे त्यांच्यासह आलेल्या आमदारांना घेऊन जेव्हा गुवाहाटीत होते तेव्हा रिक्षावाला म्हणून त्यांना हिणवलं गेलं होतं. तसंच संजय राऊत यांनी त्यांच्याविषयी तसंच इतर आमदारांविषयी अपशब्द वापरले होते. यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी हाच संदर्भ घेऊन उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

महाविकास आघाडीचं सरकार गेलं. हे सरकार असताना उद्धव ठाकरे हे कायम बाहेर पडत असताना त्यांची मर्सिडिज कार घेऊन बाहेर पडत असत. पंढरपूरच्या विठ्ठलाच्या पूजेलाही ते कार चालवत गेले होते. त्याचाच संदर्भ घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा टोला लगावलाय. १६४ मतं प्राप्त करून त्यांनी बहुमतही सिद्ध केलं. तसंच विधानसभा अध्यक्षपदाची निवडही झाली.

महाविकास आघाडीचं सरकार पडल्यानंतर जेव्हा शिंदे-फडणवीस सरकार आलं तेव्हा हे आता लोकांचं सरकार आहे असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांनी जेव्हा विश्वासदर्शक ठराव जिंकला तेव्हा त्यांच्या अभिनंदनपर प्रस्तावाच्या वेळी भाषण करताना त्यांनी बंड का केलं हे देखील सांगितलं तसंच आम्ही बंड केलं नाही तर उठाव केला असंही त्यांनी सांगितलं. आता आज त्यांनी हे सामान्यांचं सरकार आहे असं म्हटलं आहे. त्यांनी केलेल्या या ट्विटची चांगलीच चर्चा होते आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in