महाराष्ट्राच्या नवीन मुख्यमंत्र्यांची कारकीर्द कदाचित 11 जुलैपर्यंत- अमोल मिटकरी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: महाराष्ट्रामध्ये मागील अनेक दिवसांपासून राजकीय नाट्य सुरु होते. एकनाथ शिंदे मागच्या आठ दिवसांपासून आपल्या बंडखोर आमदारांसोबत राज्याबाहेर होते. आज राज्यात येऊन एकनाथ शिंदेंनी थेट मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. महाराष्ट्राला पहिला धक्का बसला तो एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री होणार तो, आणि दुसरा धक्का बसला तो फडणवीस उपमुख्यमंत्री होणार तो.

यानंतर राज्यभरातून प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी खोचक ट्विट केले आहे. ”महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्र्यांची कारकिर्द कदाचित (30जुन 2022ते 11जुलै 2022).. #श्री देवेंद्र फडणवीस यांचा मास्टर माईंड” अशा आशयाचे ट्विट अमोल मिटकरी यांनी केले आहे.

”श्री फडणवीसांनी मुख्यमंत्री म्हणुन श्री एकनाथ शिंदेंच्या नावाची केलेली घोषणा हा त्यांचा मास्टर स्ट्रोक आहे की शिवसेना संपवण्याचे सोयीस्कर षडयंत्र? हे येणारा काळ ठरवेल.” असेही ट्विट अमोल मिटकरी यांनी केले आहे. ”मी पुन्हा येइल पण “उपमुख्यमंत्री” म्हणुन हे आता राज्यातील जनतेला नव्याने कळलय…” असे ट्विट करत मिटकरींनी फडणवीसांना खोचक टोला लगावला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले होते की मी सरकारमध्ये राहणार नाही. परंतु त्यानंतर भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट करुन सांगितले की देवेंद्र फडणवीस हे राज्याचे उपमुख्यमंत्री शपथ घेतील.

एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपदी बसवून देवेंद्र फडणवीसांनी मोठं मन दाखवलं, असा संदेश ते देऊ पाहात आहेत. परंतु फडणवीसांनी शिवसेनेचा काटा काढला, असे नव्हे, तर फडणवीसांचाच दिल्लीश्‍वरांनी काटा काढला, असे मोठे वक्तव्य कॉंग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केले आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT