Advertisement

"नेते श्रद्धाळू होत असतील तर..." दगडूशेठ गणपती दर्शनावरून फडणवीसांचा शरद पवारांना टोला

जाणून घ्या देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं काय म्हटलं आहे?
This is a good thing if leaders believe in God Says Devendra Fadnavis About Sharad Pawar
This is a good thing if leaders believe in God Says Devendra Fadnavis About Sharad Pawar

आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे पुण्यात होते. पुण्यात त्यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला भेट दिली. मात्र गणपतीचं बाहेरून दर्शन घेतलं मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केला नाही. याबाबत देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस यांनी नेते श्रद्धाळू होत असतील तर चांगलीच गोष्ट आहे असं म्हणत शरद पवारांना टोला लगावला आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

"मला असं वाटतं की चांगली गोष्ट आहे. श्रद्धा वाढणं हे कुठल्याही समाजात चांगलंच असतं. श्रद्धा वाढली की समाजात चांगल्या गोष्टी होतात. नेते श्रद्धाळू झाले की कार्यकर्तेही त्यांना पाहून श्रद्धाळू होतात. श्रद्धा जरूर वाढली पाहिजे पण अंधश्रद्धा नाही." असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना टोला लगावला आहे.

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे आज पुण्यात होते. या ठिकाणी गेल्यानंतर ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर भागात गेले होते. गणपती मंदिराच्या जवळ जाऊनही शरद पवार यांनी गणपतीचं मंदिरात जाऊन दर्शन घेतलं नाही. त्यांनी बाहेरून बाप्पाला हात जोडले त्यानंतर त्या ठिकाणी ते थांबले नाहीत निघून गेले. आता शरद पवार यांनी असं का केलं? अशी चर्चा पुण्यात सुरू झाली होती.

This is a good thing if leaders believe in God Says Devendra Fadnavis About Sharad Pawar
शरद पवारांनी मंदिरात जाऊन का घेतलं नाही दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन?

दर्शन न घेण्याबद्दल काय म्हणाले शरद पवार?

आज नॉनव्हेज जेवण घेतल्याने आपण मंदिरात गेलो नाही, नॉनव्हेज खाल्ल्यानंतर मंदिरात जाणं योग्य वाटलं नाही म्हणून गेलो नाही असं याबाबत शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

गजानन काळे यांची शरद पवारांवर टीका

राज ठाकरे हिंदू, हिंदुत्व, देव धर्म ह्यावर बोलले त्यानंतर सर्व महाविकास आघाडीचे झाडून नेते मंदिरात जाताना दिसले. आज पवार साहेब देखील दगडू शेठ गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी गेले होते. पण त्यांनी बाहेरूनच दर्शन घेतलं. राज ठाकरेंनी नास्तिक म्हटल्यापासून त्यांचा आस्तिक होण्याचा प्रवास चांगला आहे. मात्र शरद पवारांनी दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मंदिर गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेतलं असतं तर आणखी आनंद झाला असता. राज ठाकरेंचं वक्तव्य शरद पवारांनी खूपच गांभीर्याने मनावर घेतल्यचं दिसतं आहे असंही गजानन काळे यांनी म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in