'एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंना एकत्र यायचं असेल, तर...'; उदय सामंत यांचं पुण्यात विधान

Maharashtra cabinet expansion : नामाल्लेख टाळत उदय सामंतांनी उद्धव ठाकरेंना काय केलं आवाहन?, केसरकर विरुद्ध राणे यांच्यातील कलगीतुऱ्यावर उदय सामंत म्हणाले 'मनोरंजन नको का?'
उद्धव ठाकरे, उदय सामंत आणि एकनाथ शिंदे। uday samant on maharashtra cabinet expansion
उद्धव ठाकरे, उदय सामंत आणि एकनाथ शिंदे। uday samant on maharashtra cabinet expansion

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या समेट घडणार का? याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. या विषयावर उदय सामंत यांनी आज भूमिका मांडली. यावेळी त्यांनी शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर आणि राणे कुटुंबीय यांच्यात पुन्हा एकदा कलगीतुरा रंगला आहे. यावरही उदय सामंत यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात वर्णी लागणार का? याबद्दलही भाष्य केलं आहे.

पुण्यात झालेल्या बैठकीनंतर उदय सामंत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, 'आज पुण्यात एक छोटी बैठक झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आठवडाभरात अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. त्याबद्दल पुणेकरांच्यावतीने मुख्यमंत्र्यांचा येत्या १८ जुलैला सत्कार करण्यात येणार आहे. मुंबईत शिंदे यांच्या निवासस्थानी सायंकाळी ७ वाजता सत्कार केला जाणार आहे," अशी माहिती त्यांनी दिली.

"एकनाथ शिंदे आणि आम्ही घेतलेल्या भूमिकेला पुण्यात मोठ्या संख्येनं समर्थन मिळत आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंना एकत्र यायचं असेल, तर त्याबाबत शिंदे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे," अशी भूमिका उदय सामंत यांनी मांडली.

उद्धव ठाकरे, उदय सामंत आणि एकनाथ शिंदे। uday samant on maharashtra cabinet expansion
बदलापुरात शिवसेनेला झटका, तर कल्याणमध्ये शिंदे गटातील आमदार विश्वनाथ भोईर यांची हकालपट्टी
"आम्ही ५० लोक एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहोत. मंत्रीपद मिळो अथवा न मिळो आमच्यातील एकजूट कायम राहणार आहे. मंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेलो नाही. माझ्या बाबतचा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निर्णय घेतील. विरोधक आमच्यात अस्वस्थता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत," असं उत्तर त्यांनी मंत्रिमंडळ विस्तारातील संधीबद्दल दिलं.

देवेंद्र फडणवीस यांच्याकडून एकनाथ शिंदे यांना सूचना करतानाचा, तसेच माईक घेतानाचे व्हिडीओ सगळीकडे व्हायरल झाले आहेत. यावरून विरोधक टीका करत असून, यावर उदय सामंत म्हणाले, "एकनाथ शिंदे यांचं भाजपकडून खच्चिकरण होतंय असं मला वाटतं नाही. माईक किंवा चिठ्ठीबाबत उपमुख्यमंत्र्यांनी खुलासा केला आहे."

"एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत, हे आता सर्वांनी स्वीकारलं पाहिजे. त्यामुळे संघर्ष होणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे," असं आवाहन त्यांनी उद्धव ठाकरे यांना नामोल्लख न करता केलं.

उद्धव ठाकरे, उदय सामंत आणि एकनाथ शिंदे। uday samant on maharashtra cabinet expansion
'राज्यपाल, हे काय सुरू आहे?'; घटनेच्या 'कलम १६४'वर बोट ठेवत संजय राऊतांचा कोश्यारींना सवाल

विनायक राऊत यांनी उदय सामंत यांच्या मेळाव्यात बोलताना टीका केली होती. त्यावर उदय सामंत म्हणाले, "विनायक राऊत हे माझ्या वडिलांसारखे आहेत. विनायक राऊत यांनी कितीही टीका केली तरी मी त्यांच्यावर टीका करणार नाही. ती आपली संस्कृती नाही."

यावेळी त्यांना दीपक केसरकर आणि राणे कुटुंबीयात सुरू झालेल्या राजकीय कलगीतुऱ्यावरून प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, 'एवढं सगळं झाल्यावर मनोरजन नको का? सिंधुदुर्ग ही मनोरंजन नगरी आहे,' असं मिश्किल भाष्य त्यांनी केलं.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in