...तर मी आता राजीनामा द्यायला तयार; उद्धव ठाकरेंचं बंडखोर एकनाथ शिंदेंना खुलं आव्हान

Uddhav Thackeray Live speech : शिवसेनेविरोधातील बंडाखोरीने उद्धव ठाकरे झाले भावूक
...तर मी आता राजीनामा द्यायला तयार; उद्धव ठाकरेंचं बंडखोर एकनाथ शिंदेंना खुलं आव्हान
Uddhav ThackerayMumbai Tak

शिवसेनेविरोधात झालेल्या बंडखोरीनंतर मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता थेट खुलं आव्हान दिलं. माझ्यासमोर या आणि मुख्यमंत्री म्हणून तुमचं नेतृत्व नकोय हे सांगा, असं उद्धव ठाकरे म्हणाले. त्यामुळे आता सरकारच्या भवितव्याचा चेंडू एकनाथ शिंदेंच्या कोर्टात गेला आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, "काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही माझ्यावर विश्वास दाखवला. अशात मी माझ्या लोकांना म्हणजेच शिवसेनेतल्याच लोकांना मी नको असेन तर काय करायचं? उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी नकोत, असं सांगितलंत तर मी आत्ता राजीनामा द्यायला तयार आहे. तुमचा विश्वास नसेल तर मी आजच माझा मुक्काम वर्षा निवासस्थानावरून मातोश्रीवर हलवतो."

"जे काही बोलायचं आहे ते समोर येऊन बोला, आडून आडून का बोलायचं आहे. मला वेदना होत आहेत का? होय मला वेदना होत आहेत. जे आमदार समोर नाहीत त्यांनी समोर यावं मी राजीनामा देतो. लाचारीचा प्रसंग माझ्यावर आलेला नाही. जोपर्यंत माझ्यासोबत शिवसेना प्रमुखांना जोडलेला शिवसैनिक आहे, तोपर्यंत मी कोणत्याच आव्हानाला घाबरत नाही. आज मी माझ्या शिवसैनिकांनाही हे आवाहन करतो आहे असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

"ज्या शिवसैनिकांना हे वाटतं की मी शिवसेना चालवू शकत नाही तर मी शिवसेनेचं पक्ष प्रमुख पदही सोडायलाही तयार आहे. मी मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री होत असेल तर मला आनंद आहे. एकदा ठरवा, तुम्ही सांगा सरळ की मुख्यमंत्रीपद सोडा मी हे पद सोडायला तयार आहे. पदं येत असतात आणि जातात. या पदांवर जे काही काम करता ती आपली कमाई असते."

उद्धव ठाकरे यांचं भाषण ऐकण्यासाठी खालील व्हिडीओवर क्लिक करा

"संख्या कुणाकडे किती आहे? हे गौण आहे. लोकशाहीत या सगळ्या गोष्टी असतात. तिकडे गेलेल्या शिवसैनिकांनी मला सांगावं मी मुख्यमंत्रीपद सोडायला तयार आहे. वेळ आली तर शिवसेना प्रमुखपदही सोडायला तयार द्यायला आहे."

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in