'जिथे वृत्ती रझाकारी... तिथे शिवसेनाच वार-करी!'; उद्धव ठाकरेंच्या सभेचा टीझर आला

'जिथे वृत्ती रझाकारी... तिथे शिवसेनाच वार-करी!'; उद्धव ठाकरेंच्या सभेचा टीझर आला

uddhav thackeray Aurangabad sabha : उद्धव ठाकरे यांची ८ जून रोजी औरंगाबादेत सभा, शिवसेनेकडून सभेची जय्यत तयारी

मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची औरंगाबादेत सभा होणार आहे. ८ जून रोजी औरंगाबादेतील मराठवाडा सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या मैदानावर ही सभा होणार असून, शिवसेनेकडून या सभेचे टिझर प्रदर्शित करण्यात आले आहेत. त्याचबरोबर काही पोस्टरही प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

महापालिका निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय पक्ष औरंगाबादमध्ये शक्तीप्रदर्शन करताना दिसत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा झाली. काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा पार पडला. त्यानंतर आता उद्धव ठाकरे औरंगाबादेत सभा घेत आहेत.

'जिथे वृत्ती रझाकारी... तिथे शिवसेनाच वार-करी!'; उद्धव ठाकरेंच्या सभेचा टीझर आला
कश्मिरी पंडितांना वाऱ्यावर सोडणार नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही

राज ठाकरे यांची सभा झाल्यानंतरच शिवसेनेकडून उद्धव ठाकरे यांच्या सभेची घोषणा करण्यात आली होती. ८ जून रोजी होणाऱ्या या सभेला औरंगाबाद पोलिसांनी अटी-शर्थींसह परवानगी दिली आहे. सध्या स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून सभेची तयारी सुरू असून, आता सभेपूर्वीचे टिझर रिलीज करण्यात आले आहेत.

शिवसेनेची मराठवाड्यातील पहिली शाखा औरंगाबाद येथे स्थापन करण्यात आली होती. या शाखेच्या ३७व्या वर्धापन दिनानिमित्त ही सभा होत आहे.

पहिल्या टिझरमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेतील दृश्ये असून, 'संभाजीनगर आम्ही नाव दिलंय. शिवसेनेनं दिलं,' बाळासाहेबांचं विधान आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या आधीच्या सभेची दृश्ये आहेत.

'जिथे वृत्ती रझाकारी... तिथे शिवसेनाच वार-करी!'; उद्धव ठाकरेंच्या सभेचा टीझर आला
"महाविकास आघाडी सेक्युलर आहे की हिंदुत्ववादी?"अबू आझमींचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

दुसऱ्या टिझरमध्ये आदित्य ठाकरे हे दिसत आहे. त्याचबरोबर शिवसेना जातपात मानत नाही, हा बाळासाहेबांचा संवाद आहे. तिसऱ्या टिझरमध्ये हिंदुत्वाबद्दल आणि औरंगाबादच्या नामांतराबद्दल उद्धव ठाकरेंनी केलेल्या भाषणाचा अंश आहे.

औरंगाबादमध्ये होणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या सभेकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे. औरंगाबादच्या नामांतरासह पाण्याच्या मुद्द्यावरून शिवसेनेला विरोधकांकडून लक्ष्य केलं जात आहे. औरंगाबाद शहरातील पाण्याचा प्रश्न बिकट बनला आहे. त्यामुळे विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांना उद्धव ठाकरे काय उत्तर देणार हे महत्त्वाचं असणार आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in