'धोका पत्करून शस्त्रक्रिया केलीये, ती...'; उद्धव ठाकरे जिल्हाप्रमुख्यांच्या बैठकीत काय म्हणाले?

Uddhav Thackeray : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी जिल्हाप्रमुख, जिल्हा संपर्कप्रमुख यांच्या बैठकीत पलटवार करण्याचा इशारा
'धोका पत्करून शस्त्रक्रिया केलीये, ती...'; उद्धव ठाकरे जिल्हाप्रमुख्यांच्या बैठकीत काय म्हणाले?

मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा जमिनीवर उतरून शिवसेना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्याचे आदेश दिले. इतर पक्षाकडून पक्षबांधणी जोरात सुरू असून, उद्धव ठाकरे यांनी इतर पक्षाचं उदाहरण दिलं. विविध घटनांचा उल्लेख करत भाजपला प्रत्युत्तर द्या, असं सांगत ठाकरेंनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना कृती कार्यक्रम दिला.

शिवसेनेकडून दुसऱ्या टप्प्यातील शिवसंपर्क अभियानाची सुरूवात केली जात आहे. यापार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे नेते आणि प्रवक्ते यांच्याशी संवाद साधला होता. त्यानंतर आज (३० एप्रिल) कोकण, पश्चिम महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्र येथील शिवसेना जिल्हाप्रमुख व जिल्हासंपर्कप्रमुख यांना उद्धव ठाकरेंनी मार्गदर्शन केलं.

'धोका पत्करून शस्त्रक्रिया केलीये, ती...'; उद्धव ठाकरे जिल्हाप्रमुख्यांच्या बैठकीत काय म्हणाले?
औरंगाबादच्या सभेआधी राज ठाकरेंना झाली बाळासाहेबांच्या 'त्या' तीन सल्ल्यांची आठवण

या कार्यक्रमात उद्धव ठाकरे म्हणाले, "काल प्रवक्त्यांची बैठक झाली आहे. त्यामुळे मी अगदी थोडक्यात बोलणार आहे. अनेक दिवसांनी शिवसंपर्क मोहीम सुरू करत आहोत. इतर पक्ष मुहूर्ताची वाट न बघता संपर्क करत आहेत. येणाऱ्या काही दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका येणार आहेत. त्यामुळे ज्याप्रमाणे कोल्हापुरला हिरारीने पुढाकार घेतला तसं आता करा."

"त्यांच्याकडून एक पद्धत अंवलबली जात आहे. पश्चिम बंगाल, केरळ सारखं आपल्याला हिंदू द्रोही ठरवायचा प्रयत्न केला जातोय. बंगालचं मोठं कर्तृत्व आहे. यावेळी ममता दिदींनी गेल्या वेळपेक्षा अधिक जागा मिळवल्या. आपण नेहमी म्हणतो, महाराष्ट्र दिशा दाखवतो. आता महाराष्ट्राने पुन्हा एकदा दिशा दाखवायची आहे," असं उद्धव ठाकरे म्हणाले.

'धोका पत्करून शस्त्रक्रिया केलीये, ती...'; उद्धव ठाकरे जिल्हाप्रमुख्यांच्या बैठकीत काय म्हणाले?
' राज ठाकरे बाबरी पडली तेव्हा कुठे होते?'; भाजप विरोधी लढ्यांचा उद्धव ठाकरे दिला प्लान

"हिंदूंमध्ये फोडाफोड, महाराष्ट्रात मराठी-अमराठी वाद ही भाजपची चाल आहे. संयुक्त महाराष्ट्र समिती कुणी आणि कशी फोडली? मुंबई आपण लढवून मिळवली. ती जनसंघाने फोडली. जागांसाठी ती फोडली. त्यावेळेला जनसंघाने फोडली. त्यांचं मराठी हिंदुत्वावर प्रेम नाही. यांना सगळं स्वतः करता हवंय," असं ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले.

"बाळासाहेब म्हणायचे जे कर्मानं मरणार, त्याला धर्मानं काय मारायचं. जन्मापासून शिवसेनेकडे नवीन तरुण रक्त आहे. गावांगावातून शिवसैनिकांकडे सातत्याने लक्ष द्या, मग बदल करा. गट प्रमुख, शाखाप्रमुख हे सगळे पदाधिकाऱ्यांच्या याद्या मला पाहिजे. पूर्वी शाखेचे बोर्ड होते. शाखा कार्यालयं होती. ते बघा. असं करत आपल्याला शिवसेना वाढवायची आहे," असंही ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितलं.

"शिवसैनिक अंगार आहे. लोकांना भेटा, त्यांना भेटून धीर द्या. आम्ही तुमच्या सोबत आहोत हे त्यांना समजू द्या. गावाची, जनतेची कामे सुद्धा जरुर घेवून या. शिवसेना इतरांपेक्षा वेगळी आहे, हे दाखवण्यासाठी शिवसंपर्क अभियान आहे. आता मी फिरणार आहे. धोके पत्करून ही शस्त्रक्रिया केलीये, ती तुमच्या सोबत फिरण्यासाठी. आता दौरे करणार. दुसरा टप्पा आता सुरु होईल. तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देतो," असं ठाकरे यांनी जिल्हाप्रमुख, जिल्हा संपर्कप्रमुखांना म्हणाले.

Related Stories

No stories found.