उद्धव ठाकरेंच्या आदेशानंतर गजानन किर्तीकर यांची शिवसेना नेते पदावरून हकालपट्टी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

उत्तर पश्चिम मुंबई मतदार संघाचे खासदार गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटात जात उद्धव ठाकरे गटाला धक्का दिला. शिंदे गटात याआधी १२ खासदार होते. ती संख्या वाढून आता १३ झाली आहे. शिंदे गटाचं बळ वाढलं आहे अशात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गजनन किर्तीकर यांची शिवसेना नेतेपदावरून हकालपट्टी केली आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी काढलेल्या पत्रकात काय म्हटलं आहे?

शिवसेना नेते गजानन किर्तीकर यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे माननीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने त्यांची शिवसेना नेते पदावरून हकालपट्टी करण्यात येत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मध्यवर्ती कार्यालयातून ही माहिती देण्यात आली आहे असा मजकूर या पत्रकात छापण्यात आला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी भेट घेण्यासाठी गजानन किर्तीकर आले होते. त्यानंतर मुंबईतल्या रवींद्र नाट्य मंदिर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला. मागील अनेक दिवसांपासून खासदार गजानन किर्तीकर शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या. या दरम्यान त्यांची अनेकदा मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी भेटी-गाठी झाल्या होत्या. तसंच किर्तीकर यांच्याकडून राष्ट्रवादी आणि काँग्रेसवरही टीका करण्यात आली होती. मात्र किर्तीकर यांच्याकडून या सर्व चर्चांच सातत्यानं खंडन करण्यात येत होतं. अखेरीस या चर्चा खऱ्या ठरल्या आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

एकनाथ शिंदे – गजानन किर्तीकरांची भेट :

६ सप्टेंबरच्या मध्यरात्री खासदार गजानन किर्तीकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एक गुप्त भेट झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. यावेळी खासदार किर्तीकर हे मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थान गणपती दर्शनाला गेले होते, असे सांगण्यात आले होते. मात्र या भेटीत गणपती दर्शनासह राजकीय चर्चाही झाली असल्याची माहिती समोर आली होती. याच भेटीनंतर खासदार किर्तीकर देखील शिंदे गटात सामील होण्याची शक्यता वर्तवली गेली होती.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT