'उद्धव ठाकरेंनी स्वत: पक्ष चालवावां, आपली माणसे प्रेमाने सांभाळावी', बाळा नांदगावकरांचा सल्ला

राज्यसभा निवडणुकीतील पराभवानंतर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आपला पक्ष स्वत: चालविण्याचा सल्ला दिला आहे. पाहा नेमकं काय म्हणाले नांदगावकर:
'उद्धव ठाकरेंनी स्वत: पक्ष चालवावां, आपली माणसे प्रेमाने सांभाळावी', बाळा नांदगावकरांचा सल्ला
uddhav thackeray should run his own party take care of his people with love advises bala nandgaonkar

तुळजापूर: राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेच्या एका उमेदवाराला पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. अशावेळी त्यांच्या मनसेने शिवसेनेवर तोंडसुख घेतलं आहे. 'पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः पक्ष चालवायला हवा. अजूनही वेळ गेलेली नाही. आपली माणसे प्रेमाने सांभाळावी लागतात. आजूबाजूच्या लोकांनी पक्ष चालवू नये.' अशी शेलक्या शब्दात मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी आज (11 जून) सहकुटुंब तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांना सल्ला तर दिलाच पण संजय राऊत यांचे नाव न घेता टीका देखील केली.

बाळा नांदगावकरांची शेलकी टीका

'पूर्वी बाळासाहेबांच्या आदेशाने सर्व घडत होते. मात्र आता ते दिवस राहिले नाहीत. आपली माणसे प्रेमाने सांभाळावी लागतात. पण सध्या काही लोक स्वतःला पक्षप्रमुख समजून पक्ष चालवत असल्याने हीच का ती शिवसेना? असं म्हणण्याची वेळ आलेली आहे.' असा टोला बाळा नांदगावकर यांनी राज्यसभेच्या पराभवानंतर शिवसेनेला लगावला आहे.

'राज्यसभेच्या निकालापासून शिवसेना आत्मचिंतन करून धडा घेईल ही अपेक्षा आहे आणि विधान परिषदेत योग्य ते घडेल.' अशी आशाही बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केली आहे.

यावेळी पत्रकारांनी शिवसेना-मनसे युतीच्या विषयाबाबत देखील त्यांना प्रश्न विचारला. तेव्हा बाळा नांदगावकर यांनी सेना-मनसे विषय इतिहास जमा झाल्याचं म्हणत याबाबत अधिक भाष्य करणं टाळलं

'मनसेचं कार्यक्षेत्र महाराष्ट्रापुरतंच मर्यादित राहणार'

दरम्यान, यावेळी बाळा नांदगावकर यांनी मनसेची पुढची वाटचाल कशी असणार हे देखील स्पष्ट केलं. ते म्हणाले, 'महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र बाहेर राजकीय विस्तार करणार नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच कार्यक्षेत्र हे महाराष्ट्रापुरतंच मर्यादित राहणार.'

'खरं तर यूपी, बिहार आणि झारखंड या राज्यातून मनसे पक्ष स्थापनेची मागणी होत आहे. मात्र आम्ही महाराष्ट्रातच लक्ष घालणार आहोत. जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवून आदर्श निर्माण करणार आहोत.'

'महाराष्ट्र नवनिर्माण सेना ऐवजी हिंदू नवनिर्माण सेना करा अशी मागणी होते आहे. मात्र आम्ही महाराष्ट्र पुरतेच काम करणार.

मनसेची वाढ महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यात झाली आहे.' असं बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे.

uddhav thackeray should run his own party take care of his people with love advises bala nandgaonkar
'दोन मतांसाठी गुडघे टेकून...', 'त्या' दर्शनाची आठवण करुन देत राजू पाटलांची शिवसेनेवर टीका

'आगामी महानगरपालिका व इतर निवडणुका मनसे स्वबळावर लढवणार'

मनसे आपली लढाई स्वबळावर लढाई लढणार आणि निवडूनही येणारं. असं म्हणत बाळा नांदगावकर यांनी आगामी निवडणुकीसाी स्वबळाची घोषणा केली आहे.

'आम्ही आधीही 'एकला चलो रे' होते आणि आजही 'एकला चलो रे' आहोत. कार्यकर्त्यांना स्वबळावर निवडणुका लढवाव्या असे स्पष्ट आदेश दिले आहेत.'

'शेतकरी विद्यार्थी कामगार महिला यांच्या मागण्या मान्य होताना दिसत नाहीत. महाविकास आघाडी सरकारविषयी लोकांमध्ये आपुलकी राहिली नाही.' असंही बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in