"उद्धव ठाकरे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत..." शरद पवारांनी स्पष्ट केली महाविकास आघाडीची भूमिका

जाणून घ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत काय काय घडलं?
Until Uddhav Thackeray resigns  we will support him Sharad Pawar clarified the role of Mahavikas Aghadi
Until Uddhav Thackeray resigns we will support him Sharad Pawar clarified the role of Mahavikas Aghadi

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात झालेला अभूतपूर्व प्रयोग म्हणजे महाविकास आघाडी. महाविकास आघाडीचा प्रयोग घडू शकेल असं ती अस्तित्वात येईपर्यंतही कुणाला वाटलं नव्हतं. त्यानंतर आता चर्चा सुरू झाली आहे याच महाविकास आघाडीत पडलेल्या फुटीची. महाविकास आघाडी सरकार असल्याने एकनाथ शिंदेंनी थेट उद्धव ठाकरेंच्या विरोधात दंड थोपटत बंड पुकारलं. सत्ताकारणाचा महाभारताचा नवा अध्याय या अनुषंगाने समोर आला.

एकनाथ शिंदे आणि त्यांच्यसोबत असलेले बंडखोर आमदार हे सातत्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला दोष देत आहेत. त्यांच्यासोबत जाण्याऐवजी भाजपसोबतच गेलं पाहिजे यासाठी हे सगळे बंडखोर आग्रही आहेत. तुम्ही समोर या, चर्चा करा तुम्हाला हवं असेल तर महाविकास आघाडीतून बाहेर पडतो ही ऑफर संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना दिली आहे.

अशा सगळ्या वातावरणात आता राष्ट्रवादी काँग्रेस वेगळा विचार करू शकते. कारण यशवंतराव चव्हाण सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक सुरू होती. शरद पवारांच्या उपस्थितीत ही बैठक सुरू होती. जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांनी महाविकास आघाडीत आपण का रहायचं? ही भूमिका घेतल्याचं सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार समजतं आहे. मात्र आता शरद पवारांनी हे स्पष्ट केलं आहे की जोपर्यंत उद्धव ठाकरे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत आपण महाविकास आघाडीसोबत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस ही महाविकास आघाडीसोबतच आहे असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

राष्ट्रवादी काँग्रेसची ही बैठक महाराष्ट्रातल्या सत्ताकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाते आहे. कारण या बैठकीतून महत्त्वाचा निर्णय समोर येऊ शकतो. एकीकडे शिवसेनेसमोर फूट थांबवण्याचं आणि पक्ष वाचवण्याचं आव्हान उभं राहिलेलं असताना शरद पवारांनी जर महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तर राजकीय स्थिती आणखी बिकट होऊ शकते अशी स्थिती आहे. मात्र शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे की जोपर्यंत उद्धव ठाकरे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत आपण महाविकास आघाडीसोबतच आहोत.

अजित पवारांचं हे म्हणणं आहे की आत्ता जी परिस्थिती समोर आली त्यानुसार आमचं असं ठरलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसने उद्धव ठाकरेंना पाठिंबा द्यायचा. शिवसेनेच्या आमदारांमध्ये काही प्रश्न निर्माण झाले आहेत. मात्र शिवसेनेचे प्रवक्ते किंवा नेते त्याबद्दल सांगतील. बंडखोर आमदारांपैकी काही आमदार परत आले आहेत. तिकडे आमदार आहेत त्यांना मुख्यमंत्र्यांनी उद्देशून आवाहन केलं आहे. या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. मात्र पक्षाची भूमिका सरकार टिकवण्याचीच आहे असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in