Urfi: ‘मेरी डिपी इतनी ढासू.. चित्रा मेरी सासू’, चित्रा वाघांना डिवचलं

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Urfi Javed DP and Tweet: मुंबई: भाजप (BJP) नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी अभिनेत्री उर्फी जावेदच्या (Urfi Javed) कपड्यांवर आक्षेप घेतला आणि दोघींमध्ये वाद सुरू झाला. काही दिवसांपासून दोघींमध्येही तू-तू मैं-मैं सुरू आहे. आता मात्र उर्फीनं हद्दच केली आहे. कारण एक ट्विट (Tweet) करत उर्फीने थेट चित्रा वाघ यांच्यासोबत नातं जोडत त्यांना डिवचलं आहे. जाणून घ्या उर्फी नेमकी काय म्हणाली? (urfi javed has again criticized chitra wagh by tweeting)

चित्रा वाघ यांनी उर्फी वादात राज्य महिला आयोगाला ओढलं. त्यानंतर रुपाली चाकणकरांनीही थेट चित्रा वाघ यांना नोटीस पाठवली. त्यानंतर चित्रा वाघ यांनी उर्फीच्या नाद सोडावा, असा सल्लाही अनेक नेटकऱ्यांनी चित्रा वाघ यांना दिला. पण, चित्रा वाघ अजूनही आपल्या मुद्द्यांवर ठाम आहेत.

तुळजापुरातही त्यांनी उर्फीला धडा शिकवणार असल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर आता परत उर्फीनं नवीन ट्विट केलं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

उर्फीनं ट्विटरवर सलवार सूटमधला फोटो टाकला. तिच्या पहिल्या ट्विटमध्ये ती म्हणाली की, ‘चित्रा वाघ ने मुझे सुधार दिया…लव्ह यू बेस्टी…’

पण, लागलीच तिने दुसरं ट्विट केलं ज्यामध्ये ती म्हणाली की, ‘लेकीन अभी भी बहोत सुधार बाकी हैं. सॉरी चित्राजी, आय लव्ह यू…

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

हे सर्व ट्विट केल्यानंतर उर्फीनं थेट चित्रा वाघ यांच्यासोबत नातं जोडून त्यांना डिवचण्याचाच प्रयत्न केला आहे.

उर्फी ट्विट करत म्हणाली…’मेरी डिपी इतनी ढासू… चित्रा मेरी सासू’

यावर नेटकऱ्यांनीही उर्फीला सुनबाई म्हणत… गंमतीशीर कमेंट केल्या.. एक युजर म्हणतो, ‘जगात एकमेव अशी सून असेल जी सासूला छळतेय. तर दुसरा एक युजर म्हणाला की, ‘ये लढाई बडी लंबी चलेगी क्यूं कि सांस भी कभी बहु थी…’ आता या सगळ्यावर चित्रा वाघ काय प्रतिक्रिया देतात हे बघणं महत्वाचं आहे.

‘माझा नंगानाच चालूच राहील…’

काही दिवसांपूर्वीच उर्फी जावेदने चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर देताना एक विचित्र वक्तव्य केलं होतं.

उर्फी जावेद ही 5 डिसेंबर रोजी मुंबई विमानतळावर स्पॉट झाली होती. त्यावेळी तिला पत्रकारांनी विचारलं होतं की, ‘तुझ्या चाहत्यांना काय सांगशील, जे तुझ्यावर प्रेम करतात?’ त्यावर उत्तर देताना उर्फी जावेद म्हणाली होती की, ‘प्रेमाचं तर माहित नाही, परंतु माझा नंगानाच असाच चालू राहील.’ यानंतर ती हसायला लागली आणि फ्लाइंग किस देत निघून गेली होती.

तिच्या या तारतम्य सोडून केलेल्या वक्तव्यावर सोशल मीडियावर यूजर्संने बरीच टीका केली होती.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT