Manoj Jarange : मनोज जरांगे यांच्यासाठी धाराशिवच्या कार्यकर्त्याचं अनोखं पाऊल, सांगलीतील सभा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Manoj Jarange Sangli Sabha : मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली आज सांगलीत होत आहे. कालपासून मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणबाबत मराठा समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात दौरा सुरु केला आहे.

social share
google news

सांगली : मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली आज सांगलीत होत आहे. कालपासून मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणबाबत मराठा समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात दौरा सुरु केला आहे. काल सोलापूरात त्यांची शांतता रॅली पार पडली. तर, आज सांगलीत त्यांची ही शांतता रॅली होत आहे. सांगली जिल्ह्याच्या सर्व गावातून लाखोंच्या संख्येने मराठा बांधव या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत. सांगली शहराच्या मध्यवर्ती राममंदिर चौकात ही सभा होणार आहे. मनोज जरांगे पाटील हे सोलापूर हून सांगलीसाठी रवाना झाले आहेत. सभेच्या ठिकाणी पोहोचण्याआधी मनोज जरांगे पाटील यांच्या समवेत मिरज शहरातून मोटरसायकल रॅली काढण्यात येणार असून मराठा समाजातील महिला, युवती, विद्यार्थी व असंख्य मराठा बांधव या रॅलीत सहभागी होणार आहेत. या सभेसाठी धाराशिवच्या एका कार्यकर्त्याने आगळी वेगळी बाईक रॅली काढली आहे. नेमकं काय म्हणाला आहे हा मराठा आंदोलक जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ पाहा.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT