विधान परिषद निवडणूक : भाजपमध्ये आयाराम-निष्ठावंतांमध्ये रस्सीखेच, पंकजा मुंडेंचं काय होणार?

ऋत्विक भालेकर

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्रात राजकारणात निवडणुकांचं वारं जोरात सुटलंय. राज्यसभा निवडणुकीचं मतदान बाकी असताना आता विधान परिषदेच्या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं गेलंय. दहा जागांवर निवडणूक होत आहे. भाजपच्या सहा आमदारांचा कार्यकाळ संपला आहे. मात्र, आता चार उमेदवार सहज निवडून येतील इतकंच संख्याबळ भाजपकडे असल्यानं आयाराम आणि निष्ठावंतामध्ये रस्सीखेच बघायला मिळणार आहे.

महाराष्ट्रात राज्यसभेची निवडणूक गाजत असताना आता विधान परिषदेच्या निवडणुकीमुळे राज्याचं राजकीय वातावरण ढवळून निघण्याची चिन्ह दिसत आहेत. राज्यसभा निवडणुकीत तिसऱ्या जागेवर उमेदवार उतरवून भाजपने निवडणुकीतील चुरस वाढवली आहे.

Uddhav Thackeray Sabha : उद्धव ठाकरेंच्या सभेवरून भाजपचे शिवसेनेला ‘टोमणे’

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

राज्यसभेप्रमाणेच विधान परिषद निवडणुकीत संख्याबळ पाहता भाजपच्या आधीच्या सहा जागांपैकी चार जागा सहज निवडून येतील असं चित्र आहे. मात्र भाजपने पाचव्या जागेवर उमेदवारी दिल्यास पुन्हा महाविकास आघाडी सरकारचा कस लागणार आहे.

भाजपच्या कोट्यातील सुजितसिंह ठाकूर, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, सदाभाऊ खोत, विनायक मेटे आणि आर एन सिंह यांचा कार्यकाळ 2 जून 2022 रोजी संपला आहे आहे. त्यामुळे या जागा रिक्त झाल्या आहेत. मात्र यापैकी कुणाला पुन्हा संधी मिळणार आणि कुणाला डच्चू दिला जाणार याबाबत भाजपच्या गोटात चर्चा सुरू आहे.

ADVERTISEMENT

खरंतर या सहा नावांपैकी सुजितसिंह ठाकूर यांचं नाव सोडलं, तर इतर सर्व आयात उमेदवार होते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत पुन्हा आयात उमेदवारांचीच वर्णी लागणार की निष्ठावंतांना न्याय मिळणार, याबाबत पक्षांतर्गत कुजबुज सुरु झालीये.

ADVERTISEMENT

Vidhan Parishad : सचिन आहिर आणि आमशा पाडवी यांना संधी? सुभाष देसाईंचा पत्ता कट होणार?

गेल्या काही वर्षात भाजपमध्ये पक्षाबाहेरील लोकांवर पक्षश्रेष्ठी जास्त मेहेरबान असल्याचं दिसून आलंय. त्यामुळे पक्षातील निष्ठावंतांवर अन्याय होत असल्याची भावना पक्षात वाढीस लागली आहे. मात्र पक्षशिस्त आणि वरिष्ठांच्या निर्णयाला आव्हान देण्याची पद्धत भाजपमध्ये नसल्यामुळे याबाबत उघडपणे बोललं जात नाही. राज्यसभा निवडणुकीतही हे दिसून आलंय. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत निष्ठावंतांचा असंतोष दूर करण्यासाठी पक्षाकडून प्रयत्न होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विधान परिषदेतून निवृत्त होणाऱ्या सदस्यांपैकी प्रवीण दरेकर विरोधी पक्ष नेते असल्यामुळे त्यांचं नाव जवळपास निश्चित असल्याचं सांगितलं जात आहे. त्याचबरोबर प्रसाद लाड हे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जातात. तसेच त्यांच्यावर महत्वाच्या संघटनात्मक जबाबदाऱ्या असल्याने त्यांचीही पुन्हा वर्णी लागणार असल्याची माहिती आहे. मात्र सदाभाऊ खोत, विनायक मेटे आणि सुजितसिंह ठाकूर यांना घरचा रस्ता दाखवण्याचे संकेत भाजपच्या गोटातून मिळत आहेत.

या नावांऐवजी आता श्रीकांत भारतीय, हर्षवर्धन पाटील, पंकजा मुंडे, राम शिंदे, कृपाशंकर सिंह आणि चित्रा वाघ यांच्या नावाची चर्चा सुरू झालीये. दरेकर आणि लाड यांना वगळून उर्वरित दोन जागा या सुरक्षित आहेत. या दोन जागांवर कुणाला पाठवायचे हा भाजपसमोर मोठा प्रश्न आहे. कारण पुन्हा दोन जागांवर बाहेरच्यांना संधी दिली, तर उर्वरित दोन जागांवर पक्षातील नावांना संधी देण्यासाठी दबाव वाढू शकतो.

स्वकियांपैकी श्रीकांत भारतीय भाजपचे सह संघटन मंत्री आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांचे OSD (ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी) म्हणून ते कार्यरत होते. राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आणि राज्य निवडणूक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.

तर दुसरीकडे पंकजा मुंडे यांच्यावर राष्ट्रीय कार्यकारिणीची जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र राज्यातील भाजपच्या कोअर कमिटीच्या सदस्या आणि माजी मंत्री म्हणून त्यांनी राज्याच्या राजकारणात परत यावं अशी इच्छा त्यांच्या कार्यकर्त्यांची आहे.

त्यामुळे भाजप पाचवी जागा लढवण्यावर आग्रही असल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र ती निवडून आणण्यासाठी भाजपकडे पुरेशी मतं नाहीयेत. त्यामुळे दोन स्वकियांमधली नावं पुढे करून पाचव्या जागेसाठी कृपाशंकर सिंह किंवा हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जातेय.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT