एकनाथ शिंदेंचा निर्णय योग्य की अयोग्य हे जनताच ठरवेल-अजित पवार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात दंड थोपटून बंड पुकारलं. एकनाथ शिंदे यांना साथ लाभली ती शिवसेनेतल्या ४० आमदारांची. तसंच १२ खासदारही शिंदे गटासोबत आहेत. एकनाथ शिंदे हे भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले आहेत. २१ जूनला राज्यात राजकीय भूकंप झाला. २९ जूनला महाविकास आघाडी सरकार उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यामुळे कोसळलं. त्यानंतर ३० जूनला राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आलं. याबाबत आता अजित पवार यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

”हे वागणं बरं नव्हं, कधी कुणावर काय प्रसंग येईल सांगता येत नाही” असं अजित पवार का म्हणाले?

काय म्हटलं आहे अजित पवार यांनी एकनाथ शिंदेंबाबत?

“२१ जूनला एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलं. त्यानंतर शिवसेनेत दोन गट पडले आहेत. आता एकनाथ शिंदे भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले आहेत. या घटनेच्या जास्त खोलात मी जाणार नाही. लोकाशाहीत अशा घटना घडत असतात. मात्र एकनाथ शिंदे यांचा निर्णय योग्य की अयोग्य हे सामान्य जनता निवडणुकीच्या माध्यमातून ठरवेल.” असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

आणखी काय म्हणाले अजित पवार?

महाविकास आघाडी सरकारने नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतक-यांची २ लाखापर्यंत कर्जमापी केली. त्यांना ५० हजार रूपये अनुदान द्यायचा निर्णय घेतला गेला होता. मात्र मार्च २०२०मध्ये कोरोना आल्यामुळे ते अनुदान राहिले. त्यानंतर पुरवणी मागण्यांमध्ये हे अनुदान देण्याचा निर्णय घेतला गोला होता. मात्र त्यानंतर एकनाथ शिंदे यांचं बंड झालं. असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. अजित पवार यांनी हे वक्तव्य केलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दसरा मेळावा हायजॅक करणार का? देवेंद्र फडणवीस यांनी दिलं उत्तर, म्हणाले…

ADVERTISEMENT

शिवसेनेत जून महिन्यात बंड झालं. त्यानंतर शिवसेनेत शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन गट पडले आहेत. शिवसेनेतल्या बंडानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४० आमदार आणि १२ खासदार गेले आहेत. एकनाथ शिंदे हे भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले आहेत. तेव्हापासून एकनाथ शिंदे यांच्यावर सातत्याने टीका केली जाते आहे. एकनाथ शिंदे आणि गटाला गद्दार असं म्हटलं जातं आहे. तसंच उद्धव ठाकरे हे शिवसेनेची आणखी शकलं होऊ नयेत म्हणून प्रयत्न करत आहेत.

ADVERTISEMENT

दुसरीकडे भाजपचे नेते मग ते देवेंद्र फडणवीस असोत किंवा आणखी कुणी ते हेच सांगत आहेत की आम्ही म्हणजे शिवसेना भाजपने युती करून सरकार स्थापन केलं आहे. नारायण राणे यांनीही दसरा मेळावा हा एकनाथ शिंदेच घेतील. उद्धव ठाकरेंकडे दसरा मेळाव्यात बोलण्यासारखं काहीही नाही अशीही टीका केली आहे. एकनाथ शिंदे हे दसरा मेळावा हायजॅक करण्याच्या तयारीत आहेत असंही बोललं जातं आहे. आता या सगळ्या राजकारणात काय काय ट्विस्ट अँड टर्न येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT