विदेशी टी शर्ट घालून भारत जोडायला निघाले; अमित शाहांचा राहुल गांधींवर निशाणा

राहुल भारताला जोडण्यासाठी निघाले आहेत, मला वाटते त्यांनी आधी भारताचा इतिहास वाचायला हवा, असं म्हणत अमित शाह यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला.
विदेशी टी शर्ट घालून भारत जोडायला निघाले; अमित शाहांचा राहुल गांधींवर निशाणा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी राजस्थानच्या जोधपूरमधून निवडणूक शंख केला. येथील दसरा मैदानावर भाजपच्या बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांच्या जाहीर सभेला संबोधित करताना त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. अमित शहा यांनी 2018 मधील काँग्रेसच्या निवडणुकीतील आश्वासनांची आठवण करून दिली. शाह यांनीही येथे हिंदुत्वाचे कार्ड खेळले आणि 2023 आणि 2024 च्या निवडणुकीत भाजपला विजयी करण्याचे आवाहन केले.

राहुलबाबा, तुम्ही कुठल्या पुस्तकात वाचलंय?

शाह म्हणाले की, राहुल बाबा आत्ताच भारत जोडो यात्रेला निघाले आहेत. राहुल बाबा परदेशी टी-शर्ट घालून भारत जोडण्यासाठी निघाले आहेत. मी राहुलबाबा आणि काँग्रेसजनांना त्यांच्या संसदेतील भाषणाची आठवण करून देतो. राहुल बाबा म्हणाले होते की भारत हे राष्ट्र नाही. अहो राहुलबाबा, कुठल्या पुस्तकात वाचलात? हे ते राष्ट्र आहे ज्यासाठी लाखो लोकांनी बलिदान दिले आहे. राहुल भारताला जोडण्यासाठी निघाले आहेत, मला वाटते त्यांनी आधी भारताचा इतिहास वाचायला हवा, असं म्हणत अमित शाह यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला.

काँग्रेसवर हल्लाबोल

अमित शाह दोन दिवसांच्या राजस्थान दौऱ्यावर आहेत. जोधपूर विभागाच्या 'बूथ अध्यक्ष संकल्प महासंमेलना'त त्यांनी आज कार्यकर्त्यांना संबोधित केले. शाह म्हणाले की, राजस्थानमध्ये आज ज्या प्रकारचं सरकार चालवलं जात आहे, त्यामुळे आपण सर्वजण दु:खी आहोत. विकासात राज्याला मागे नेण्याचे काम राजस्थानमध्ये चालणाऱ्या सरकारने केले आहे. सध्या देशात राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसची दोन सरकारे आहेत. 2023 मध्ये दोन्ही राज्यांमध्ये निवडणुका आहेत. या दोन राज्यात भाजपचे सरकार स्थापन झाले तर काँग्रेसकडे काहीच उरणार नाही.

गेहलोत साहेब, मी तुम्हाला दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी आलो आहे

शाह म्हणाले की, 2018 च्या निवडणुकीपूर्वी राहुल गांधी आणि अशोक गेहलोत यांनी येथील जनतेला मोठी आश्वासने दिली होती. मला विचारायचे आहे की त्यापैकी एकही आश्वासन पूर्ण झाले आहे का? गेहलोत साहेब, तुमच्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी आलो आहे. 2018 मध्ये तुम्ही आणि राहुल गांधींनी दिलेली खोट्या आश्वासनांना पाच वर्षे पूर्ण होणार आहेत. त्या आश्वासनांचा हिशेब मागण्यासाठी मी आलो आहे, असं शाह म्हणाले.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे काय झाले?

शाह म्हणाले, 10 दिवसांत शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे काय झाले? तरुणांना 3,500 रुपयांच्या बेरोजगार भत्त्याचे काय झाले? 20 लाख तरुणांना रोजगार देण्याचे काय झाले? काँग्रेस केवळ पोकळ आश्वासने देऊ शकते, ती आश्वासने पूर्ण करू शकत नाही. ते म्हणाले की, राजस्थानमध्ये बेरोजगारीचा दर 5.4 वरून 32 टक्क्यांवर पोहोचला आहे.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in