'हा गाढवपणा संजय राऊतच करू शकतात', भाजप खासदार अनिल बोंडेंची घणाघाती टीका

राज्यसभा निवडणुकीत काही आमदारांची मतं फुटल्याने शिवसेनेचा दुसरा उमेदवार पराभूत झाला. असाच प्रकार विधानपरिषद निवडणुकीत होईल असा दावा खासदार अनिल बोंडेंनी केला आहे.
'हा गाढवपणा संजय राऊतच करू शकतात', भाजप खासदार अनिल बोंडेंची घणाघाती टीका
what happened in rajya sabha will happen in legislative council election a big claim of bjp mp anil bonde

योगेश पांडे, नागपूर: 'जे राज्यसभेत झालं तेच विधानपरिषदेत होईल. घोडेबाजारात आमदार विकले गेले असा आरोप संजय राऊतांनी केला, हा गाढवपणा संजय राऊतच करू शकतात.' अशी घणाघाती टीका भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी केली आहे.

पाहा खासदार अनिल बोंडे नेमकं काय म्हणाले:

'जे राज्यसभेत झालं तेच विधानपरिषदेत होईल'

'जे राज्यसभेत झालं तेच विधानपरिषदेत होईल.. शिवसेनेचे संजय राऊत यांनी अपक्ष आमदाराचा अपमान केला आहे. घोडेबाजारात आमदार विकले गेले असा आरोप केला. हा गाढवपणा संजय राऊतच करू शकतात आणि तो त्यांनी केला आहे. कोणाचाही अपमान कोणीही करू नये. जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही, तोवर असे आरोप करू नये. मात्र, अपमान करण्याचा गाढवपणा संजय राऊत यांनी केला आहे.' अशी घणाघाती टीका अनिल बोंडेंनी केली आहे.

'या सरकारमुळे महाराष्ट्राचे वाटोळे होत आहे'

'महाराष्ट्रातील जनता वैतागली आहे.. फक्त जनताच नाही तर सर्व पक्षांसह अपक्ष आमदार सुद्धा वैतागलेले आहे. ज्यांचे मंत्री कमिशन घेतात, मुख्यमंत्री जनतेला भेटत नाही. तर जनतेचे काम कसे करणार? त्यामुळे शेतकरी शेतमजूर सगळे वैतागले आहेत. या सरकारमुळे महाराष्ट्राचे वाटोळे होत आहे. लोकांना देवेंद्र फडणीस यांच्या मुख्यमंत्री काळाची आठवण होत आहे. पुन्हा देवेंद्र फडणीस मुख्यमंत्री पाहिजे असे त्यांना वाटत आहे.' असं म्हणत अनिल बोंडे यांनी देवेंद्र फडणवीसांचं तोंडभरुन कौतुक केलं आहे.

'आता शिवसैनिक म्हणायला लागले आहे की संजय राऊत यांनी बोलणं थांबवलं नाही तर शिवसेनाच लंबी होईल. सत्ता ही लोकांसाठी लोकांच्या भल्यासाठी असते. दुर्दैवाने त्यांना सत्तेचा माज आला आहे. त्यामुळे संजय राऊत असे बोलत आहे.' अशी टीकाही अनिल बोंडेंनी केली आहे.

'संजय राऊतांनी स्वतःच्या पक्षाकडे पाहावं, पंकजाताई बद्दल बोलू नये'

'भारतीय जनता पक्षात सर्वांना न्याय दिला जातो. संजय राऊत यांनी स्वतःच्या पक्षाकडे पाहावे. त्यांनी पंकजाताई बद्दल बोलू नये. छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान शिवसेनेने केला आहे. शिवसेनेने मावळ्याला पराभूत करून सामान्य माणसाचा अपमान केला आहे. भाजपमध्ये सर्वांना योग्य सन्मान मिळतो. पंकजा मुंडे आजही मोठ्या असून पुढे आणखी मोठ्या होतील. त्यामुळे त्याची काळजी संजय राऊत यांना करायची गरज नाही.' असं म्हणत अनिल बोंडे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर कोणताही अन्याय होत नसल्याचा दावा केला आहे.

what happened in rajya sabha will happen in legislative council election a big claim of bjp mp anil bonde
'...तर याचे शंभर टक्के परिणाम विधान परिषद निवडणुकीत दिसतील'; देवेंद्र भूयार यांचा इशारा

दरम्यान, राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाल्याने शिवसेनेत बरीच अस्वस्थता पाहायला मिळते आहे. अशावेळी आता भाजपकडून याच परिस्थितीच फायदा उचलण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे या सगळ्याबाबत आता शिवसेना काय भूमिका घेणार आणि एकूण राजकारणाबाबत नेमकी काय दिशा ठरवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in