MNS: ‘आमदार राजू पाटलांनी मनसेवर दावा केला तर?’, राज ठाकरे म्हणाले..

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Raj Thackeray on Raju Patil: पनवेल: केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेना (Shiv Sena) हे आणि धनुष्यबाण (Bow and arrow) हे चिन्ह शिंदे गटाला दिलं. त्यानंतर अनेकांनी निवडणूक आयोगावर टीका केली आहे. फक्त आमदार आणि खासदार यांच्या जोरावर पक्ष आणि चिन्ह एखाद्या गटाला कसं काय दिलं जाऊ शकतं? असा सवाल अनेक जण विचारत आहे. असाच सवाल विचारताना राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी एका पत्रकार परिषदेत मनसेचं (MNS) उदाहरण देऊन विचारला होता. ज्यावर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) उत्तर दिलं आहे. (what if mla raju patil claim on mns party know raj thackeray said about on this)

अजित पवारांनी पत्रकार परिषदेत म्हटलं होतं की, फक्त आमदार आणि काही खासदारांच्या बहुमतावर निवडणूक आयोगाने असं निर्णय देणं योग्य नाही. समजा, मनसेचा एक आमदार आहे. आता त्याने म्हटलं की, मनसे पक्षच माझा, इंजिन चिन्ह पण माझं.. तर कसं होईल?

याचबाबत पनवेलमध्ये आयोजित एका कार्यक्रमात राज ठाकरेंना सवाल विचारण्यात आला. ज्यावर राज ठाकरेंनी उत्तर देताना म्हटलं की, ‘म्हातारी मेल्याचं दु:ख नाही कारण काळ सोकावतो. राज्यात जे सगळं चालू आहे त्यावर मी 22 तारखेला शिवतीर्थावर सविस्तर बोलणार आहे.’ असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

Raj Thackeray: राज ठाकरे प्रचंड संतापले, मनसे नेत्यांना दमच भरला; म्हणाले…

यावेळी राज ठाकरेंनी राज्यातील सर्वच राजकीय पक्षांवर देखील जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्रातील राजकारणाचा चिखल झालाय असं म्हणत राज ठाकरेंनी यावेळी संताप व्यक्त केला. महाराष्ट्र नवनिर्माण पनवेल सेनेच्या वतीने राजभाषा सप्ताह आयोजित करण्यात आला होता. यावेळी मनसे अध्यक्ष राज यांच्या प्रकट मुलाखतीने समारोप करण्यात आला, यावेळी त्यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली.

ADVERTISEMENT

राज ठाकरे: उत्तम व्यंगचित्रकार ते रोखठोक राजकारणी! कसा आहे त्यांचा राजकीय प्रवास?

ADVERTISEMENT

पाहा राज ठाकरे नेमकं काय म्हणाले

‘म्हातारी मेल्याचं दु:ख नाही कारण काळ सोकावतो. राज्यात जे सगळं चालू आहे त्यावर मी 22 तारखेला शिवतीर्थावर सविस्तर बोलणार आहे. मला कुठला ट्रेलर आणि टिझर दाखवायचा नाही, मी डायरेक्ट 22 तारखेला सिनेमाच दाखवायचा आहे.’ असं म्हणत राज ठाकरेंनी त्यांचा गुढीपाडव्याच्या सभेत नेमका रोख कशावर असणार हे स्पष्ट केलं.

‘महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.. असा महाराष्ट्र कधी नव्हता. ज्या काही गोष्टी असतील त्या आमनेसामने होत्या. त्या दिवशी मी विधानसभेत गेलो होतो ना. बाळासाहेबांचं तैलचित्राचं अनावरण होतं. खाली सगळे बसले होते, पण मला कळतच नव्हतं कोण कोणत्या पक्षाचा आहे ते.’

‘मला त्या आमच्या राजू पाटील यांना विचारायचं आहे, घेता का म्हणून… एकदा बघा.. हात घेऊन बघा, मग काय जळतं ते कळेल तुम्हाला. दिवसरात्र आम्ही बर्नोल लावून असतो.’ असा टोलाही राज ठाकरेंनी लगावला.

‘राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता मतदारांना काही किंमत असेल असं वाटत नाही. तुम्ही फक्त नोकर आहात, मतदान करा, आम्हाला काय करायचं ते करू. कोण कुठे झिम्मा खेळतो, कोण कुठे फुगडी खेळतो समजत नाही.’ अशा शब्दात राज ठाकरेंनी टीका केली आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT